Thoughts

Thoughts Social Political Educational

युवा आकाश आनंद होणार बसपचे नवे राष्ट्रीय अध्यक्षAkash Anand
10/12/2023

युवा आकाश आनंद होणार बसपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
Akash Anand

आजचा दिन विशेष:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम पुतळा कोल्हापूर येथील बिंदू चौकात मराठा नेते भाऊ बागल यांनी  उभारला या ...
09/12/2023

आजचा दिन विशेष:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम पुतळा कोल्हापूर येथील बिंदू चौकात मराठा नेते भाऊ बागल यांनी उभारला या घटनेला आज 71 वर्ष झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा.महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली.
09/12/2023

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा.
महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली.

रेल्वेच्या फर्स्ट क्लास मध्ये बसून नातवाला जगातलं फर्स्ट क्लास संविधान समजवणारा हा समाज आहे बाबासाहेब आंबेडकरांचा❤️✊- प्...
08/12/2023

रेल्वेच्या फर्स्ट क्लास मध्ये बसून नातवाला जगातलं फर्स्ट क्लास संविधान समजवणारा हा समाज आहे बाबासाहेब आंबेडकरांचा❤️✊

- प्रसाद देठे

06/12/2023

हिवाळी अधिवेशनात आलो की पावसाळी 🤔 - आमदार

विद्यार्थी हितासाठी.धडक मोर्चा...
06/12/2023

विद्यार्थी हितासाठी.
धडक मोर्चा...

 #आंबेडकर.
04/12/2023

#आंबेडकर.

*डॉ.आंबेडकर आणि तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांची आंबेडकरांच्या मृत्यूपूर्वी शेवटची भेट...*बाबासाहेबांना मिळाली *बोधिसत्...
04/12/2023

*डॉ.आंबेडकर आणि तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांची आंबेडकरांच्या मृत्यूपूर्वी शेवटची भेट...*
बाबासाहेबांना मिळाली *बोधिसत्व*💙 पदवी...
वाचा सविस्तर👇

डॉ.आंबेडकर आणि तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांची आंबेडकरांच्या मृत्यूपूर्वी शेवटची भेट Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps By शो....

03/12/2023
205 फूट उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा..आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा शहरात राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडक...
03/12/2023

205 फूट उंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा..

आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा शहरात राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा उभारण्यात आला आहे,सद्या तरी बाबासाहेबांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.याची उंची 205 फूट इतकी आहे ( चबूतरा 80 फूट आणि मूर्ती 125 फूट = 205 फूट )

हा पुतळा ब्राँझ धातूपासून बनवण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिनी करण्यात येणार आहे होते पण काहि कारणास्तव ते पुढे ढकलण्यात आले आहे.2024 मध्ये या पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.

प्रविण साळुंके Pravin Salunke
नालासोपारा(बुद्धभूमी)

डॉ.आंबेडकर आणि तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांची आंबेडकरांच्या मृत्यूपूर्वी शेवटची भेट...बाबासाहेबांना मिळाली  #बोधिसत्व...
02/12/2023

डॉ.आंबेडकर आणि तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांची आंबेडकरांच्या मृत्यूपूर्वी शेवटची भेट...

बाबासाहेबांना मिळाली #बोधिसत्व💙 पदवी...
वाचा सविस्तर👇

डॉ.आंबेडकर आणि तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांची आंबेडकरांच्या मृत्यूपूर्वी शेवटची भेट Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps By शो....

27/11/2023

प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्तीचा विचार आहे
संविधान हेच भारताचे पुराण आणि कुराण आहे

समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता तत्व बुद्धाचे महान आहे
विविधतेने नटलेल्या देशात लोकशाहीचा आधार आहे

जाळले तरी प्रत्येकाच्या हक्कासाठी पेटते आहे
हा कायदा नाही मनुचा, ही घटना भारताची आहे

"संविधान दिन चिरायू होवो!"


✒️Mr. Bhuru
(अभिषेक उ. नारनवरे)

सुजात आंबेडकर मुंबईत बोलतांना.
26/11/2023

सुजात आंबेडकर मुंबईत बोलतांना.

संविधान दिन
26/11/2023

संविधान दिन

सत्य कधी लपत नाही ! पै. सिकंदर शेख  महाराष्ट्र केसरी.मागील वर्षीच्या पराभवाचा घेतला बदला.
10/11/2023

सत्य कधी लपत नाही !
पै. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी.
मागील वर्षीच्या पराभवाचा घेतला बदला.

09/11/2023

जयभीम💙

09/11/2023

ब्राह्मण आणि इतर उच्च जातींच्या तुलनेत मराठा समाजातील शैक्षणिक पिछाडी हा सामाजिक बहिष्कारापेक्षा वैयक्तिक आणि सामुदायिक निवडींचा परिणाम आहे.

The educational lag within the Maratha community, in comparison to Brahmins and other upper castes, is attributed to personal and community choices rather than social exclusion.
Rahul Sonpimple

08/11/2023

संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा लढा तीव्र करण्यासाठी,
वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन आजचं join करा...! ❤️😊

...अमेरिका वाया ब्रिटन असा शैक्षणिक प्रवास करत एक पंचवीस वर्षीय तरुण पोरगा भारतात परतो. डोक्यावर बऱ्यापैकी स्टुडंट लोन. ...
07/11/2023

...अमेरिका वाया ब्रिटन असा शैक्षणिक प्रवास करत एक पंचवीस वर्षीय तरुण पोरगा भारतात परतो. डोक्यावर बऱ्यापैकी स्टुडंट लोन. खांद्यावर पोराबाळांची, बायकोची जवाबदारी. मनात क्रांतीची कित्येक स्वप्ने.
समोर एका उदार राजाच्या अनुदार राज्यात नोकरी करण्याचे आव्हान. तिकडं राजाच्या डोक्यात त्या तरुण मुलासाठी एक मोठी जवाबदारी म्हणजे आपल्या राज्याच्या आर्थिक खात्याची जवाबदारी टाकण्याची विद्रोही ईच्छा. आणि यातून मुलावर झालेला आत्मघाती हल्ला. मग राजाला आणि मुलालाही जाणवलेली एक नामुष्की....
...ही नामुष्की वाऱ्यासारखी काम करते. क्रांतीचा वनवा पूर्ण भारत पसरवण्यात. पंचवीसतला तरूण मग पुन्हा मुंबईत परतो. कालांतराने त्याचा एकमेव सहारा म्हणजे त्याच्या मोठा भाऊ सुध्दा जग सोडून जातो. आणखी दोन माणसांची जवाबदारी तरूणावर येते. तो ही कसलाही संकोच न करता ती शेवटपर्यंत पार पाडतो. स्तंभ लेखक, लेखक, ट्यूशन टीचर, फायनान्शियल अडव्हाझर आणि मग प्रोफेसर मिळेल ते काम करतो...
..वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी भारतात लोकशाही मुल्ये रूजवण्याची आणि प्रत्येकाला आपले राजकीय हक्क मिळवेत म्हणून टिळक शिंदे वगैरे मोठ्या प्रस्थापित नेत्यांना झुंज देतो...

पुढे तो आपल्यासारख्या एका दनकट विद्रोही महाराजाच्या संपर्कात येतो. दोघे मिळून एका जगण्या योग्य अशा राष्ट्राची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी झटू लागतात. तरुण आता तुमचा लिडर. माझा वारसदार. म्हणून राजाही निघून जातो जग सोडून. तरूण आता थांबणार नसतो, सामज्रशाहीला भिडतो, महाडात लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी मैदानात लढतो.

दरम्यान पाच पैकी चार मुलं त्याला गमावावी लागतात. कित्येक रात्री उपाशी काढाव्या लागतात. तरी मोठ्या काटकसरीने मिळालेल्या मदतीचा मान ठेवत, बायकोच्या त्यागाची जाण ठेवत, एका विषारी प्रदेशात तो तरुण विद्यार्थी एक श्वास घेण्याइतपत जागा निर्माण करतो.
आपली तीशी येऊस्तोर आपण काय करतोय?
थोडंस जरी त्याच्यासारखं जगता आलं तर मिळवलं.

विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्छा. जयभीम 💙🌻

 #37तू गोळवलकर तू सावरकर😡मी  #दाभोळकर मी  #आंबेडकर 💙तू संघोट्याची औलाद प्रियेमी  #राज्यघटनेचा  #श्वास प्रिये📚तू गोडसेवाद...
01/11/2023

#37
तू गोळवलकर तू सावरकर😡
मी #दाभोळकर मी #आंबेडकर 💙
तू संघोट्याची औलाद प्रिये
मी #राज्यघटनेचा #श्वास प्रिये📚
तू गोडसेवादी अन हिंदुत्व😡
मी #बंधुत्वतुल्यसम #गांधीत्व

तू माफीनाम्याची आस प्रिये😏
मी #भगतसिंगचा फास प्रिये✊
तू फितुर चाकरी ब्रिटिशांची
मी धगधग ज्वाला #क्रांतीची🔥

तू जखम हलाहल फाळणीची
मी रक्ताने लिहली #घटना ग📚
तू बाजीरावची मस्तानी
मी #ज्योतिरावची #सावित्री प्रिये❤️
तू बुधवार पेठचा गुलदस्ता
मी #पंचशीलचा सच्चा रस्ता ग

तू साध्वी प्रज्ञाचा श्राप प्रिये
मी #करकरेचे हौताम्य प्रिये🇮🇳
तू हिंसाचार अन दुराचार
मी सत्यनिष्ठा अन सदाचार...

आज १ नोव्हेंबर, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिवस.
डॉ नरेंद्र दाभोळकर यांना २० अॉगस्ट २०१३ ला भररस्त्यावर टिपून मारले...!!
२०१३ पासून महाराष्ट्रात कॉग्रेस, राष्ट्रवादीचे आघाडी सरकार...!!
नंतर भाजप शिवसेनेचे युती सरकार...!!
आणि आता शिवसेना, कॉग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चे महाविकास आघाडीचे सरकार आहे...!!
महाराष्ट्र पोलीस आणि नंतर सीबीआय चौकशी करूनही अद्यापही डॉ नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी सापडले नाहीत...!!
गृहखाते नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असते आणि हा तपासही गृहखात्याच्या अखत्यारीत येतो...!!
डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येची चौकशी तात्काळ आणि योग्य मार्गाने करा अशी मागणी त्यांचे चिरंजीव हमीद दाभोलकर आणि कन्या मुक्ता दाभोलकर यांनी सातत्याने लाऊन धरली आहे तरीही मारेकरी सापडले नाहीत हे कशाचे लक्षण आहे...??
सरळ सरळ या हत्येमागे मोठे षडयंत्र दडलेले आहे हे ८ वर्षानंतर सिद्ध होते आहे...!!
हा संघर्ष न्यायीक नाही तर राजकीय आहे...!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथला प्रत्येक संघर्षाला क्रांती विरुद्ध प्रतिक्रांतीच्या लढ्याची पार्श्र्वभूमी असते,त्याप्रमाणे विवेकाचा आवाज बंद करण्यासाठी इथल्या प्रतिकांतीवादी शक्तींनी डॉ नरेंद्र दाभोळकर सरांची हत्या केली आहे...!!
न्यायालय न्याय केव्हा देईल,.??
न्यायालया समोर इथली तपास संस्था योग्य पुराव्यानिशी घटनेचा चौकशी अहवाल सादर करेल तेव्हा..!!
तपास यंत्रणांवर वरदहस्त कुणाचा...??
वरील तपास यंत्रणांवर वरदहस्त हा इथल्या राजकीय पुढाऱ्यांचा आहे आणि म्हणूनच मग निश्पक्ष तपास होतं नाही आणि म्हणूनच मग आरोपी सापडतं नाही...!!
ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र संबोधले जाते त्या महाराष्ट्रात विवेकाचा आवाज कुणी बंद केला..??
जे नेते स्वत:ला पुरोगामी आणि सेक्युलर विचारधारेचे म्हणून जनते समोर ओरडून ओरडून भाषणे करुन सांगतात त्यांचं पुरोगामित्व कुठं आहे...??
धर्मांध पक्षाच्या नेत्यांकडून आणि गृहमंत्र्यांकडून दाभोलकर सरांच्या खुन्यांची योग्य चौकशी कुणालाही अभिप्रेत नव्हतीच, मात्र पुरोगामी आणि सेक्युलर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर विवेकवादी डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा योग्य तपास करु शकतं नसतील तर...
महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेने आता हेही लक्षात घ्यावे की,इथे जे पुरोगामी, पुरोगामी आणि सेक्युलर म्हणून राजकीय प्लॅटफार्मवर मिरवितात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालविली आहे...!!
हे ढोंगी बगळे प्रतिक्रांतीवादी छावणीत सहभागी झालेले आहेत...!!
आजच्या डॉ नरेंद्र दाभोळकर सरांच्या जयंती दिनी महाराष्ट्रातील जनतेने पुरोगाम्यांचा पांघरलेला बुरखा फाडून यांच्या कपटनितीचा भांडाफोड केला तरीही विवेकाचा आवाज बुलंद होईल यात तिळमात्र शंका नाही...!! हे ढोंगी बगळे इथल्या मातीशी आणि माणसांशी बेइमानी करीत आहेत हे लक्षात घ्यावे...!!
डॉ नरेंद्र दाभोळकर सरांच्या जयंतीदिनी त्यांच्या विवेकाला अभिवादन...!!
#जयभीम.
#दाभोळकर_जिवंत_आहे


#नरेंद्रदाभोळकर

31/10/2023

विद्यार्थी एकता जिंदाबाद!
विद्यार्थी ,युवक एकतेचा विजय असो!

कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन आदेश ,शासनाने प्रसिद्ध केला आहे.

बुद्धाच्या वाटेवर असणारी असंख्य माणसे, भिमसागर
25/10/2023

बुद्धाच्या वाटेवर असणारी असंख्य माणसे, भिमसागर

दीक्षाभूमी नागपूर , Nagpur
25/10/2023

दीक्षाभूमी नागपूर
, Nagpur

16/10/2023

दीक्षाभूमी च्या अवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे?

भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळेल...📚आज चंद्रपुरातील दीक्षाभूमी येथे 67 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याप्रसंगी मी ...
16/10/2023

भीम पुतळ्यात नाही, भीम पुस्तकात मिळेल...📚
आज चंद्रपुरातील दीक्षाभूमी येथे 67 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याप्रसंगी मी बघितलेले सर्वात सुंदर दृश्य...
पुतळ्यात पाहू नको पुस्तकात पाय...भीम जिवंत हाय अजुनी भीम जिवंत हाय.

Dhammachakra - धम्मचक्र
14/10/2023

Dhammachakra - धम्मचक्र

07/10/2023

शासनाच्या #खाजगीकरण व #कंत्राटीकरण विरोधातील #नांदेड येथील ऐतिहासिक महामोर्चा चे एक दृश्य...
#कंत्राटी_भरती #नांदेड

06/10/2023

जयभीम

03/10/2023

...मानूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पन माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं ! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया... पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा...कुट्ट्टंबी... आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली मानसं भेटतील !

आपन कित्तीबी वरडुन बोललो - घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलन्यात 'सत्याचा अंश' नसंल तर जगाच्या बाजारात त्या बोलन्याला घंटा किंमत मिळत नसती... त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्‍हायचा... आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत... पन त्याच्या विचारात 'निर्मळ'पना व्हता - शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती - रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती - मानवतेची कास व्हती - 'सत्याची' ताकद व्हती..

गोळ्या घालुन मारला बाबाला... पन तरीबी जित्ता र्‍हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय.
खायचं काम नाय गड्याहो...
ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो 'विचार' संपवायला पन 'गांधी' उसळी मारून वर येतच र्‍हानार.

सलाम महात्म्या सलाम... कडकडीत सलाम..

- किरण माने.

03/10/2023

Address

Mahagaon, Arjuni Morgaon
Gondia
441701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thoughts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thoughts:

Videos

Share


Other Digital creator in Gondia

Show All