14/05/2023
मुंबईतल्या घरातील देव्हाऱ्यातल्या तांब्यावरच्या नारळाला कोंब आला तर त्याची व्यवस्थित देखभाल करुन...
.. तो जीव धरलेला कोंब, व्यवस्थित बांधून, ४५०-५०० किलोमीटर लांबवरील आपल्या गावाला १२/१५ तासांचा प्रवास करून घेऊन जाणारा,...
.. अख्ख्या भावकीशी लढून मिळालेल्या गुंठाभर जागेत त्या झाडाची मायेने, प्रेमाने, आपुलकीने लागवड करणारा..
निसर्गालाच देव मानणारा भोळा-भाबडा कोकणी माणूस, कधीतरी स्वत:ची वृक्षसंपदा बेचिराख व्हावी म्हणून रिफायनरी सारख्या विषारी प्रकल्पाला पाठिंबा देईल का..?