01/01/2024
💁🏻♂️ *सामान्यांचे नेतृत्व : राजेंद्र म्हापसेकर*
_*DSN | Digital News Paper*_
💁🏻♂️ *आता प्रतीक्षा आमदारकीची.... वाढदिवसानिमित्त होतंय अभिष्टचिंतन*
✒️ *प्रतिनिधी : आपा राणे*
दोडामार्ग : राजेंद्र म्हापसेकर याहीपेक्षा राजन या नावाने सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे माजी जि. प. उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे नेते राजेंद्र म्हापसेकर.... आपल्या मित्रपरिवारात तर ते "दादा" म्हणून परिचित...मात्र त्यांचा रुबाब अतिशय साधा आणि भोळा. त्यांचा आज "वाढदिवस" या निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठीच हा लेख प्रपंच...
अती सामान्य कुटुंबात जन्मलेला हा नेता, पहिल्या पासूनच समाजकारणात रंगणार, त्यात त्यांना राजकारणातही रस मात्र घरची परिस्थिती तशी हालाखीची, वडील मुंबईत कामाला मात्र कमावणारे हात दोन तर खाणारी तोंडे अनेक अशी परिस्थिती. त्यामुळे पहिल्यापासूनच संघर्ष हा वाट्याला आलेला त्यातच पाटये सारख्या दुर्गम भागात जन्म (हे गाव सध्या बुडीत क्षेत्रात गेलेले आहे), या गावात ना कसली सुविधा ना सोय, पावसाळ्यात तर तालुक्यापासून हा गाव कायमच दुरावलेला मात्र अशातही राजेंद्र म्हापसेकर यांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण सावंतवाडी येथे जाऊन जिद्दीने पूर्ण केले.
याच महाविद्यालयीन जीवनात त्यांची नेतृत्व गुणांची झलक दिसू लागली, गाव तसा मागासलेला यासाठी त्यांनी गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. यातच त्यांनी आपल्या गावातील गोर गरिबांना मदत करणे अडलेल्याच्या मदतीला धावून जात आपली सामाजिक बांधिलकी दाखवुन दिली मात्र यात आर्थिक कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली अशातच तिराळी जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते त्या ठिकाणी अगोदर रोजंदारीवर काम त्यांनतर मुकादम नंतर ठेकेदार असा आपला चढता आलेख ठेवला, यातच त्यांना गावच्या विकासासाठी त्यांच्या मित्र परिवाराने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला त्यांनी ती निवडणूक लढवत आपल्या नेतृत्व गुणांवर प्रस्थापितांना धक्का देत यशस्वी मजल मारली त्यांनी उपसरपंच प्रभारी सरपंच अशी पदे भूषवत गावाच्या विकासास विशेष हातभार लावला व एक सच्चा राजकारणी जो समाजकारण ९०% व राजकारण १०% करतो असा युवा नेता तालुक्याला मिळाला.
यातच १९९९ साली सावंतवाडी तालुक्या पासून दोडामार्ग तालुका विलग करण्यात आला आणि दोडामार्ग प. स. अस्तित्वात आली यावेळी पहिल्याच निवडणुकीत राजेंद्र म्हापसेकर यांनी बाजी मारली, मात्र त्यावेळी सेना - भाजपा युती असल्याने त्यांना उप सभापती पदावर समाधान मानावे लागले. यांनंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात संघाचे संस्कार झाल्याने ते नेहमीच भाजपा या पक्षाशी बांधील राहिले, अनेक आमिषे तसेच बंधने पक्ष सोडण्यासाठी त्यांच्यावर लादण्यात आली मात्र ते कायम भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिले. पुढे प स मधून ते जि प निवडणूक लढवत दोनवेळा जि प वर निवडून गेले त्यांचा पक्षाने सन्मान करताना त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदीही विराजमान होण्याची संधी दिली. परकियापेक्षा स्वकीयांकडूनच जास्त हल्ले झेललेला हा नेता आणखी कणखर बनला यातच त्यांना विधानसभा लढवा अशी आग्रही मागणी होऊ लागली यात त्यानी जास्त स्वारस्य न घेता पक्षाने संधी दिली तर निश्चित लढवू असे सांगितले सावंतवाडी विधानसभा मतदार संघात त्यांनी तिन्ही तालुक्यात जम बसवला होता. यात त्याना आमदारकीसाठी संधी मिळेल अशी आशा होती मात्र पक्षाने त्यांना थोडे थांबण्याचे सांगितले आणि मनात कोणतीही निराशा कटुता न घेता हा मोठ्या मनाचा नेता थांबला हे विशेष.
कायम दुसऱ्याला मदत करणे, संकटकाळी धावून जाणे हे त्यांच्यातील उपजत गुण, यामुळेच काही वर्षांपूर्वी आंबोलीत दोडामार्ग मधील तीन तरुण बुडाले होते त्यावेळी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शोधकार्यात भाग घेतला होता, त्यावेळी त्यांचा अनेक संस्था आणि मंडळा कडून जाहिर सत्कार करण्यात आला होता.
*अधिक बातमी :* 👉
https://kutumbapp.page.link/yrRfFB3RcvV48JX77
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
01
💐💐 *माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...* 💐💐
💐💐 *शुभेच्छूक* 💐💐
💐 *श्री सुधीर आबा दळवी,तालुकाध्यक्ष, भाजपा दोडामार्ग*
💐 *श्री. एकनाथ नाडकर्णी, माजी जि.प. उपाध्यक्ष व भाजपा नेते*
💐 *श्री. शंकर देसाई, उपतालुकाध्यक्ष, भाजपा दोडामार्ग*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
राजकारणात असतानाही विरोधकांना न दुखवता त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत देत विजय मिळवण्यात दादांचा विशेष हातखंडा असून दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा विशेष दबदबा आहे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी मंत्री विनोद तावडे, माजी खासदार नितेश राणे, माजी खासदार प्रमोद जठार यांचे ते निकटवर्तीय असून लवकरच सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दादांची। "आमदार"-म्हणून एन्ट्री होईल हे निश्चित....त्यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त डी एस एन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीस शुभेच्छा....🎂💐🎂💐
*शब्दांकन : प्रमोद गवस, संपादक डी एस एन*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *DSN च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा हजारो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 9765446118*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖