26/06/2024
▪︎ जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वर्षा घुट्टे व डब्ल्यू.एच.ओ.विदर्भ कोऑर्डिनेटर डॉ. मोनाली कदम
यांची आश्रमास सदिच्छा भेट....
▪︎ आरोग्य सेवा प्रदान करण्याऱ्यासाठी विवेकानंद आश्रमासारख्या संस्थांची गरज असल्याचे प्रतिपादन...
विवेकानंद आश्रम ही खऱ्या अर्थाने मानवसेवा करणारी संस्था आहे. संस्थेचे शिक्षण, कृषि, ग्रामीण विकास व समाजाला भौतिक व आध्यात्मीक उन्नती साधण्यासाठी सुरू असलेले सर्व उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. या सर्व उपक्रमांमध्ये आरोग्य सेवेचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा घुट्टे व डब्ल्यू. एच. ओ. विदर्भ कोऑर्डिनेटर डॉ. मोनाली कदम यांनी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेटी प्रसंगी काढले. संस्थेने जागतिक आरोग्य संघटनेच्या साह्याने ग्रामीण भागात शासनाच्या मदतीने शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पुरविण्यासाठी सहकार्य करावे. जिल्ह्यात क्षयरोगाचे रूग्ण असून त्यांच्यासाठी सुध्दा संस्थेने पुढाकार घ्यावा असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेच्या नर्सिंग कॉलेज मधून पदवी घेवून बाहेर पडणारे विद्यार्थी हे समाजात आरोग्य दूत म्हणून काम करणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी कृषी पदवीधरांसाठी आरोग्यसेवेसाठी नर्सिंग पदवीधर उपलब्ध असणार आहेत. निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांची रूग्णसेवा व त्यांचे जीवनकार्य अव्दितीय होते. त्यांनी निर्माण केलेला विवेकानंद आश्रमात हजारो विद्यार्थी संस्कार, स्वावलंबन व गुणवत्ता धारण करून आपले जीवन घडवित असल्याची माहिती संस्थेच्या वतीने त्यांना देण्यात आली. आश्रमाच्या वतीने त्यांचे शाल, श्रीफल, महाराजश्रींचे ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.