01/09/2020
गणपती बाप्पा मोरया।।।पुढेच्या वर्षी लवकर या।।
राज्यात विघ्नहर्त्याला साधेपणाने भावपुर्ण निरोप
नांदुरा देशप्रेरणा वृत्त - आज अनंत चतुर्दशी गणरायाला राज्यात गणेशभक्तांनी अत्यंत साधेपणाने या देशावरील व राज्यावरील कोरोनाचे संकट नष्ट करुन सुखसमृदधी नांदू दे असे साखळे घालत भावपुर्ण निरोप दिला। गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सावात सार्वजनिक कार्यकम आणि समाज प्रबोधनाची रेलचेल असते तसेच गणेशाची विसर्जन मिरवणूक हा तर संपुर्ण देशवासीयांचा आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो। परंतु यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे गणरायाचा हा उत्सव अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात आला। सार्वजनिक मंडळांनी देखील भव्य देखावे, मनोरंजनाचे कार्यकम रदद करुन रक्तदान शिबिरासारखी संकल्पना अंमलात आणली। त्याचबरोबर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली,धुळे, औरंगाबाद, नागपुर या मोठया शहरांमध्ये मानाच्या गणपतींचे विसर्जन देखील अत्यंत साधेपणाने आणि सार्वजनिक विसर्जन कुंडात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात आले।
दरवर्षीचा गणेशविसर्जन मिरवणुकीतला ढोल ताशा व भव्य देखावे त्याला पाहण्यासाठी ठिय्या देवून बसणारा प्रेक्षक वर्ग गर्दीनी फुललेले रस्ते आज मितीस सुनसान होते। प्रत्येक जिल्हयात प्रशासन, नगरपालिका, समाजसेवी संस्था यांनी विसर्जन कुंड, फिरते विसर्जन कुंड तयार करुन नागरिकांना गणेश विसर्जनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या। एकंदरीत सगळयांनीच कारोनाची महामारी घेवून जावे हेच मागणे मागत आज गणरायाला निरोप दिला।
🙏🙏