Rajniti Bhrastachar-राजनिती भ्रष्टाचार

  • Home
  • India
  • Boisar
  • Rajniti Bhrastachar-राजनिती भ्रष्टाचार

Rajniti Bhrastachar-राजनिती भ्रष्टाचार सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसा

*भाग - 1*       ✍️ पालघर :- अनिल रावते, पंचायत समिती सदस्य, राहणार - बोईसर (दांडीपाडा ) आणि त्याचे भूमाफिया साथिदार हुसै...
03/04/2024

*भाग - 1*

✍️ पालघर :- अनिल रावते, पंचायत समिती सदस्य, राहणार - बोईसर (दांडीपाडा ) आणि त्याचे भूमाफिया साथिदार हुसैन मेमन, अस्फाक लाखा व अन्य पाच सहकाऱ्यांवर crpc 354 अंतर्गत वेगवेगळ्या कलमांतर्गत बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल......

एका विशिष्ट पक्षात कार्यरत असलेला अनिल रावते, पंचायत समिती सदस्य या नामक व्यक्तीने काही भूमाफिया यांस हाताशी धरून परराज्यातील गरीब गरजू लोकांना खोटे दस्तावेज बनवून रेखा लोखंडे तक्रारदार या महिलेची आदिवासी जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असता सदर महिलेने विरोध दर्शवल्यानंतर अनिल रावते यांनी संबंधित बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे लोखंडे कुटुंबियांवर 307 अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता असे रेखा लोखंडे व तिच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले. परंतु रेखा लोखंडे या महिलेने ठाणे कारागृहातून आल्यानंतर कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या आगळीकीबाबत संबंधित पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी तक्रार अर्ज करून दाद मागण्याचा प्रयत्न चालू असता साधारणपणे सात ते आठ महिन्यानंतर बोईसर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. शिरीष पवार यांनी तक्रारीची दखल घेत तपास अधिकारी श्री मणिकरी यांस लेखी सूचना देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. रेखा लोखंडे हिच्या जमिनीशी अनिल रावतेचा कोणताही संबंध नसताना देखील अश्फाक लाखा, हुसेन मेमन यांस पुढे करीत व खोटे दस्तावेज अनिल रावतेकडून बनवून व सदर दस्तावेजांचा आधार घेत रेखा लोखंडे व तिच्या कुटुंबीयांना धमकावित खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्या बाबत तिघांकडून बोलले जात असे. रेखा लोखंडे यांनी दिलेली माहिती अशी की, अनिल रावते यांनी पदाचा दुरुपयोग करीत रेखा लोखंडे हिच्यावर यापूर्वी खोट्या तक्रारी करून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आलेला होता. रेखा लोखंडे कडून सांगण्यात आले की, माझ्यासारख्या अन्य अशिक्षित लोकांच्या जमिनीमध्ये जबरदस्ती चाळी बेकायदेशीर उभ्या करून रूम, गाळे विकून स्थानिकांची आर्थिक फसवणूक करून अनिल रावते राहत असलेला बंगला लोकांच्या जमिनी विकून बनवला असल्याचे सांगण्यात आले. बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 143, 147, 148, 149, 354, 324, 504, 506 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत 37 (1), 37 (3),135 नुसार अनिल रावते, अशपाक लाखा, हुसेन मेमन, विक्रम धोडी, संतोष धोडी,अनंत झा, गणू झा व अनंत झा ची पत्नी या आठ जणांवर गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे.

✍️ पालघर : संपादक आशाद बन्ने शेख यांना दिल्लीत राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...      बोईसर येथून प्रकाशि...
29/02/2024

✍️ पालघर : संपादक आशाद बन्ने शेख यांना दिल्लीत राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

बोईसर येथून प्रकाशित होणारे हिंदी साप्ताहिक जगत भारती आणि जे.बी. न्यूज़ चे संपादक आणि एकता सामाजिक संस्थेचे सरचिटणीस आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष आशाद बन्ने शेख यांना दिल्लीत राष्ट्र का गौरव सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 25.02. 2024 रोजी दिल्लीतील हॉटेल रॅडिसन येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यादरम्यान देशभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली, त्यापैकी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील आशाद बन्ने शेख यांची पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून निवड करण्यात आली.
पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात सुधारणा केल्याबद्दल श्री शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्य प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री ओंकार सिंग मरकम, विशेष पाहुणे म्हणून चित्रपट कलाकार दीपक सारस्वत, मध्य प्रदेशातील कुमारी डॉ. दिव्या पाटीदार, अविनाश तिवारी, श्री इंदरपाल, पद्मश्री अर्जुनसिंग दुर्वे, ज्येष्ठ कवी अकबर ताज मन्सुरी यांचा समावेश होता. आणि त्यांच्या हस्ते सुवर्णपदके, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी श्रेया एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आणि अध्यक्ष डॉ. विजय कुमार यादव यांनी देशभरातील सर्व पुरस्कार विजेत्यांचा मनापासून गौरव केला.

✍️ *पालघर : मौजे - मोगरबाव, दहिसर तर्फे तारापूर येथील स्थानिक शेतकरी श्री.बळवंत हरी पाटिल व श्री.रविंद्र काशिनाथ पाटील य...
09/02/2024

✍️ *पालघर : मौजे - मोगरबाव, दहिसर तर्फे तारापूर येथील स्थानिक शेतकरी श्री.बळवंत हरी पाटिल व श्री.रविंद्र काशिनाथ पाटील यांचा 03 पिढ्यान पासूनचा रस्ता भाड्याच्या गुंडांच्या सहाय्याने पाटील कुटुंबावर दबाव टाकणारा राजेश सदानंद आकरे - बिमसी रिटायर याच्यावर कारवाई कधी ?????*
मौजे - मोगरबाव, परनाळी तर्फे तारापूर तलाठी सजा कुरगाव यांचे कार्य क्षेत्रामध्ये बीमसी रिटायर राजेश आकरे याच्याकडून सदर मिळकतीमध्ये भावेश तामोरे, राहुल तामोरे व सात ते आठ खुनशी भाड्याचे गुंड आणून त्यांच्या सहाय्याने राजरोसपणे मुरूम भराव सायंकाळी 07 ते 07:30 वाजे पर्यंत चालू असून तेथील 03 पिढ्यांपासून वास्तव्य करणारे स्थानिक शेतकरी पाटील यांचा बेकादेशीर पद्धतीनें सर्व नियम धाब्यावर बसवून व अधिकारी वर्ग हा माझ्या खिशात आहे अशी भाषा करून जाण्या - येण्याचा पिढीजात रस्ता बंद करून दादागिरी करीत आहे. सूत्रांकडून अशी महिती मिळाली की, हा राजेश आक्रे इसम सुधिर भंडारी याला हाताशी धरून एका आदिवासी समाजाच्या मिळकती मधून बेकायदेशीर पद्धतीने मुरूम उत्खनन करून भरावाचे काम करीत आहे आणि महत्त्वाची माहिती अशी की,सुधिर भंडारी हा स्वतःच्या महिंद्रा थार गाडीमध्ये प्रेसची पाटी लाऊन मी पत्रकार आहे असे स्थानिक जनतेमध्ये भासवत आहे. त्यानी कधी, कोणत्या वृत्तपत्र व दैनिकला काम करून पत्रकारितेचे कार्ड मिळविलेले आहे याची देखील सखोल चौकशी होणे जरुरीचे आहे कारण खेड्या पाड्यातील जनतेच्या अशिक्षित पणाचा फायदा सुधिर भंडारी सारखे लोक घेत असतात अशा भुरट्या पत्रकारावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्वरित नियमानुसार कारवाई होणे न्यायास धरून आहे. पुन्हा कोणीही प्रेसची पाटी लावण्याचा प्रयत्न करणार नाही.
तसेच राजेश आकरे यांनी घेतलेल्या मिळकतीमध्ये यापूर्वी बेकायदेशीर स्टील उतरवलेले होते त्यावेळेस सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर काही पत्रकारांनी पाहणी करीत स्थानिक एलसीबी चे अधिकारी श्री विभुते यांस मोबाईलद्वारे संपर्क करून माहिती दिली असता सदरचे स्टील हे बोईसर मधील एका भंगार विक्रेत्याचे असल्याचे निष्पन्न झाल्यावर तातडीने हलवण्यात येऊन विलेवाट लावण्यात आली असे समजते. नक्की राजेश आकरे आहे कोण ? राजेश आकरेकडे संपत्ती आली कुठून ? बीएमसी मध्ये आकरे हा इसम मुंबई येथे कोणत्या पदावर कार्यरत होता ? त्याचा पगार किती ? याची देखील चौकशी होणे गरजेची आहे. यांनी मिळवलेली आर्थिक माया कोणत्या पद्धतीने मिळविलेल्या आहेत. सूत्रांकडून असे समजते की हा शेतकरी नसताना शेतकरी दाखला कोणी दिला व कसा मिळविला ? याची सखोल चौकशी संबंधित खात्याकडून होणे नियमावर धरून आहे. गरीब स्थानिक पाटील कुटुंबाला दादागिरी करीत रस्ता बंद करून त्या ठिकाणी दहशत खुनशी गुंडांच्या सहाय्याने माजवणारा राजेश आकरे याची सखोल चौकशी होऊन बेकायदेशीर उत्खनन करून मुरूम भराव करणाऱ्या सुधीर भंडारी सारख्या समाजकंठकांवर महसूल विभागाकडून कारवाई होणार का ? ट्रकने भराव करण्याची वेळ शासनाकडून नियमानुसार किती वाजेपर्यंत दिलेली आहे ? सर्व नियम धाब्यावर बसवून अंधाराचा फायदा सुधीर भंडारी सारखे इसम घेत उशिरापर्यंत भराव करीत असतील अशा ट्रक, आयवा सारख्या वाहनांवर संबंधित मंडळाधिकारी श्री.सुनिल राठोड व तलाठी संजय चुरी कारवाई करून ट्रक जप्त करणार का ? असे स्थानिकांमधून बोलले जात आहे. स्थानिक पाटील कुटुंबीयांनी संबंधित महसूल खात्याला वेळोवेळी माहिती देत लेखी पत्रव्यवहार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी होताना का दिसून येत नाही ? याचे नक्की कारण काय ? स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर कोणा राजकीय नेत्याचा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव आहे का ???
मा. पालघर तहसीलदार रमेश शेंडगे सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? जर पाटील कुटुंबांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील न्याय मिळत नसेल तर पाटील कुटुंब स्वतःच्या न्याय हक्कासाठी तहसीलदार कार्यालय पालघर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे कुटुंबासमवेत आमरण उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पाटील कुटुंबीयांनी कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाच्या आगळीकीबाबत 112 वर संपर्क करून न्याय मागितला असता स्थानिक पोलीस ठाण्याकडून आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नसल्याचे पाटील कुटुंबाकडून सांगण्यात आलेले आहे..

✍️ *भाग :-  02 रा*✍️ *पालघर : -  ग्राम पंचायत सरावली हद्दितील ताराचंद्र लखपत गुप्ता याची चाळ तोडण्याचे पालघर तहसीलदारांच...
08/02/2024

✍️ *भाग :- 02 रा*

✍️ *पालघर : - ग्राम पंचायत सरावली हद्दितील ताराचंद्र लखपत गुप्ता याची चाळ तोडण्याचे पालघर तहसीलदारांचे आदेश मंडळ अधिकारी, बोईसर यांस असताना शासनाच्या भूखंडावर असलेल्या चाळीवर तोडक कारवाई का नाही ? आशिर्वाद कोणाचा ?, दबाव कोणाचा ?*

तहसीलदार रमेश शेंडगे पालघर यांनी दिनांक - 15/09/2023 रोजी ताराचंद्र गुप्ता याची चाळ तोडण्याचे तलाठी - मंडळ अधिकारी यांस आदेश दिलेले असताना दिनांक 06/02/2024 रोजी करण्यात आलेल्या कारवाई वेळी प्रजापतीवर कारवाई करुन ताराचंद्र गुप्ता या इसमाचे बांधकाम का वाचवण्यात आले याबाबत संशय निर्माण होत असून तहसीलदार, पालघर - मंडळ अधिकारी व तलाठी, बोईसर यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न चिन्ह रामयज्ञ प्रजापतीकडून उपस्थित केला जात आहे.रामयज्ञ प्रजापती यास संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली असता सांगण्यात आले की, सदर बांधकाम करीत असता काही पत्रकार, दलाल यांच्याकडून आर्थिक रकमेसाठी ब्लॅकमेल केले जात होते. जर आम्ही मागितलेली रक्कम आम्हाला मिळाली नाही तर तुझे बांधकाम अधिकारी वर्गाला सांगून तोडायला लावू तसेच काही राजकीय लोकांनी ताराचंद्र गुप्ता, काही पत्रकार यांच्या सांगण्यावरून प्रजापती यास कार्यालयात बोलाऊन दम देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. प्रजापतीहा प्रत्येकाच्या हाता - पाया पडून बाजू सोडवत गेला.पण ताराचंद्र गुप्ता याच्या सांगण्या वरुन एका पत्रकार बंधूने व त्याच्या टीमने मिळून तर करच केला. त्या त्रास देणाऱ्या पत्रकारांची नावे, पक्षाच्या प्रतिनिधींची नावे व छोट्या - मोठ्या दलालांची नावे पुढील बातमीत आकड्या सहीत प्रसिद्ध कऱण्यात येणार आहेत.
आज अवध नगर येथे किती राजकीय पक्षांशी निगडीत असलेल्या प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच दलालांची अवैध्य ईमारती - चाळींची बांधकामे, हॉस्पिटल, दवाखाने, पक्ष तसेच पर्सनल कार्यालये,भंगार गोडाऊने असून त्याबाबत तक्रारी बऱ्याच वेळा काही लोकांनी केलेल्या असतानाही अधिकारी वर्गाच्या जवळचा ( अंगचा ) असेल तर कारवाई लगेच........ परंतू (जांगचा ) असेल तर चाल - धकल, बघू असे का ? बऱ्याच तक्रारी आजही प्रलंबित आहेत. खोटे दाखले जोडून काही बांधकामे ऊभी करण्याची प्रक्रिया आजही चालू आहे. काही विशिष्ठ समाजाचे दलाल सरकारी भूखंडावर बांधकामे ऊभी करून गोर गरीब जनतेची फसवणुक करीत आहेत त्यावेळेस सरकारी अधिकारी अशा विकासक, दलालांवर कारवाई करीत गुन्हे दाखल का नाही करीत ? यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बांधकामे तुटली त्यावेळेस लोकांचा आक्रोश बघायला मिळालेला आहे. सरकारी भूखंडांवर शासनाचे बोर्ड का लावले जात नाहीत ? आज अवध नगर तसेच पंचक्रोशीत एकाच रात्रित बांधकामे ऊभी राहीली का ? म्हणजे कुठेतरी अधिकारी, कोतवाल, सम्बन्धित ठिकाणच्या ग्राम पंचायत मधिल सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा अवैध्य बांधकामांशी संबंध आहेच ना ? की नाही ? जर अधिकारी वर्गाला हे माहीत असताना लोकांची फसवणुक करणाऱ्यांवर दलाल, विकासाकांवर फौजदारी गुन्हे दाखल का केले जात नाहीत ? असे किती दिवस चालणार ? अधिकारी वर्ग यांना पाठीशी का घालतात ? जर छोट्यांबरोबर बरोबर आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्यांवर वेळीच सम्बन्धित अधिकारी वर्गाकडून कारवाई करण्यात आली नाही तर पुढील बातमीत चालू असलेल्या सर्व बांधकामांचे फोटो प्रदर्शित केले जाणार..... कारण प्रत्येक बांधकामांवर कोणाचा ना कोणाचा वरदहस्त आहेच......
*महावितरण चे अधिकारी लगेचच विज पुरवठा बंद करतात हा कुठला न्याय ? जर पेपर्स बघून नविन मीटर कनेक्शन देतात मग सम्बन्धित अधिकारीच्या पत्रावर खुलासा का मागवत नाहीत ? आज किती विज पुरवठा म्हणजेच मीटर अनधिकृत आहेत. यांचे देखील साटे लोटे नाही ना ?*
*जर ताराचंद्र गुप्ता आणि चालू असलेल्या ईतर इमारतींच्या बांधकांमांवर अधिकारी वर्गाकडून त्वरीत कारवाई करण्यात आली नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे*
*जिल्हाधिकारी साहेब आणि उप विभागीय तथा उप विभागीय दंडाधिकारी ( प्रांत ) साहेब सदर प्रकरण गांभीर्याने लक्ष घालून ताराचंद्र गुप्ता व इतर चालू असलेल्या सरकारी भूखंडांवरील बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पारित करून सहकार्य करणार का ? .........✍️

✍️ *भाग :-  01 ला* ✍️✍️ *पालघर : -  ग्राम पंचायत सरावली हद्दिमधील दुर्गा माता गल्लीमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश...
06/02/2024

✍️ *भाग :- 01 ला* ✍️

✍️ *पालघर : - ग्राम पंचायत सरावली हद्दिमधील दुर्गा माता गल्लीमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील आणि विश्वनाथ घरत यांनी अधिकारी वर्गावर दबाव निर्माण करून कऱण्यात आलेली एकतर्फी तोडक कारवाई*......
तहसीलदार पालघर यांनी वादी - प्रतिवादी यांना तक्रारी अर्जावर लेखी नोटीस काढून आपल्या दालनामध्ये दोन्ही पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत बोलाविले होते. त्यावेळी नमूद दिनांका रोजी उपस्थीत होते. परंतू त्या दिनांका नंतर वादी - प्रतिवादी यांस पुढची तारीख न देता काही महिन्यानंतर तहसीलदार रमेश शेंडगे यांनी मंडळ अधिकारी, बोईसर यांस जावक क्र./महसूल/जमिनबाब - 2/कावि.1275/23 अन्वये दिनांक : 15/09/2023 रोजी लेखी आदेश काढून अर्जदार ताराचंद्र लखपत गुप्ता व रामयज्ञ रामप्यारे प्रजापती दोघांवर कारवाई करण्यासाठी कळविले होते. परंतू आज दिनांक : 06/02/2024 रोजी सकाळी 11 नंतर प्रजापती या इसमाच्या राहत्या घरावर एकतर्फी तोडक कारवाई मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्फत करण्यात आली. वरीष्ठ अधिकारी यांस एकांतात विचारणा केली असता त्यांनी बविआ चे आमदार राजेश पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ घरत यांचा आम्हा अधिकारी वर्गावर दबाव असून त्यांच्या दबावा खाली कारवाई करीत असल्याचे स्पष्ठ केले.
*वरीष्ठ अधिकारी वर्गाने दिलेली माहिती बरोबर आहे की चुकीची याची निःपक्ष चौकशी होणार का ?
*स्थानिक अधिकारी वर्गाने केलेली एकतर्फी तोडक कारवाई बरोबर आहे की अन्यायाची आगळीक करणारी आहे याची चौकशी होऊन चूकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
*बहुजन विकास आघाडीचा ताराचंद्र गुप्ता हा कार्यकर्ता असल्यामुळे अधिकारी वर्गाने आदेश असतानाही पक्षाच्या दबावामुळे कारवाई केली नाही का ?
*शासकिय अधिकारी वर्गाकडे राजकीय नेत्यांच्या दलालांच्या अवैध्य बांधकामाबाबत तक्रारी प्रलंबीत असतानाही कारवाई का केली जात नाही असे सर्व सामान्य जनतेतून बोलले जात आहे तर अशा पक्षाच्या दलालांच्या बांधकामांवर अधिकारी वर्ग तातडीने कारवाई करणार का ? की पाठीशी घालणार ?
*स्थानिक अधिकारी वर्गावर दबाव निर्माण करून कारवाई करायला भाग पाडणाऱ्या पदाधिकारींवर पक्ष श्रेष्ठी कारवाई करणार का ?
कारण सर्व सामान्य जनतेतून सरपंच, पंचायत समिती , जिल्हा परीषद ,आमदार, खासदार, मंत्री निवडून आणले जातात मग हेच लोकप्रतिनिधी आप आपापसातील अंतर्गत वादामुळे गरीब जनतेची घरे तुडवीत असतील तर हे बरोबर आहे का ? कारण ताराचंद्र गुप्ता यांनी लोकांना भाड्याने रूम दिलेले असतानाही व याची माहिती अधिकारी वर्गाला असूनही तसेच तोडण्याचे आदेश असतानाही कारवाई का नाही ?
*बहुजन विकास आघाडी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे ताराचंद्र गुप्ताच्या चाळीवर कारवाई करण्यात आली नाही का ?
*कायदा सर्वांसाठी सारखा असताना हा दूजाभाव का ?
*अधिकारी वर्गाला पगार राजकीय पक्षाचे पुढारी देतात की, सर्व सामान्य जनतेतून मिळालेल्या टॅक्स मधून.... हेच काही समजत नाही !!!
सर्व सामान्य जनतेतून असे बोलले जात आहे की, आदेश दोघांविरोधात असतानाही कारवाई एकावरच का ? जर दुसऱ्या पक्षकारावर कारवाई अधिकारी वर्गाकडून तातडीने करण्यात आली नाही तर वरीष्ठ अधिकारींकडे दाद मागितली जाणार असल्याचे प्रजपतिकडून बोलले जात आहे.....

*▪️पालघर। बोईसर मे महाराष्ट्र शासन की जमीनों पर अतिक्रमण और अनाधिकृत निर्माण का सिलसिला जोरो से चल रहा है ।*https://rajn...
03/02/2024

*▪️पालघर। बोईसर मे महाराष्ट्र शासन की जमीनों पर अतिक्रमण और अनाधिकृत निर्माण का सिलसिला जोरो से चल रहा है ।*

https://rajnitibhrashtachar0.blogspot.com/2024/02/blog-post.html

*निलेश विचारे*
*9834032131*

महाराष्ट्र शासन की जमीनों पर अतिक्रमण और अनाधिकृत निर्माण का सिलसिला जारी। बोईसर ग्रामपंचायत का आशीर्वाद भू-माफ....

✍️ *पालघर : बोईसर ग्राम पंचायत बाजार कर ठेक्या संदर्भात मा.उच्च न्यायालय,मुंबई ( हायकोर्ट ) यांच्याकडे राजेश चौहान यांनी...
01/11/2023

✍️ *पालघर : बोईसर ग्राम पंचायत बाजार कर ठेक्या संदर्भात मा.उच्च न्यायालय,मुंबई ( हायकोर्ट ) यांच्याकडे राजेश चौहान यांनी बोईसर बाजार कर वसुलीसाठी दाखल केलेली याचिका मा.उच्च न्यायालयाच्या, मुंबई खंडपिठाने दिनांक : 27/10/2023 रोजी ठेकेदार राजेश चौहान यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली*....

बोईसर ग्राम पंचायतीचा बेकायदेशीर पध्दतीने ठेका मिळविलेल्या ठेकेदार राजेश चौहान व पडद्या मागिल काळ्या यादीतील ठेकेदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे बोईसरचा ठेका वसूल करण्याबाबत केलेला अर्ज मुंबई हायकोर्ट यांनी निकाली काढलेला आहे याची सर्व व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. कारण मा. न्यायलयाने संबंधित ठेकेदार राजेश चौहान यांस बोईसर बाजारात वसूल करण्यासाठी कोणतेही आदेश दिलेले नसताना व सर्व आदेश ठेकेदाराच्या विरुद्ध असतानाही काही सत्तेतील स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने गरीब,वंचित थैलेवाल्यांकडून जबरदस्ती कर वसुली केला जात आहे व त्यांना ठेकेदार पावतिही देत नाही याकडे ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, उप सरपंच व शासनाने नेमलेले ग्राम विकास अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत ? ग्राम पंचायतीवर कोणाचा दबाव आहे का ? या ठेकेदारास पाठबळ कोणाचे ? जो ठेकेदार मा.न्यायालयाचा आदेश मानत नाही याला नक्की कवच कुंडले कोणाची ? याची सविस्तर चौकशी होऊन या ठेकेदारावर कारवाई करून याचा परवाना रद्द करीत काळ्या यादीत टाकण्यात यावे असे जनतेतून बोलले जात आहे. या सर्व विषयांकडे वरीष्ठ अधिकारी गांभिर्याने लक्ष देणार का ?
वेळोवळी बाजार कर ठेक्याबबत न्यायालइन प्रक्रियेत होत असलेल्या सुधारणा व मा. न्यायलयाने वेळोवेळी दिलेले सर्व आदेश आम्ही जनते समोर प्रसिध्द करीत आहोत. आपले सर्वांचे आशिर्वाद राहू देत.

आपले
महेश शांताराम धोडी
निलेश आर. विचारे

28/10/2023

✍️ पालघर : बोईसर येथिल काटकर पाडा येथे बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या 05 ते 06 कार्यकर्त्यांवर सत्तेतील दोन प्रतिष्ठीत नेत्यांच्या सांगण्यावरून 60/65 स्थानिक गुंडांकडून प्राण घातक हल्ला तीन जण गंभीर जखमी तर 02 ते 03 जणांना किरकोळ दुखापत.....
मंगळवार दिनांक : 24/10/2023 रोजी रात्री देवी विसर्जन करून येत असता कुंदन सिंह, संतोष तिवारी व अन्य 04 ते 05 जण चालत घरी गणेश नगर येथे जात असता 10 ते 15 जणांनी रस्त्यात काटकर पाडा येथे अडऊन देवी विसर्जनातील गाण्याच्या विषयावरून वाद जाणिवपूर्वक घालण्याचा प्रयत्न केला परंतू काटकर पाडा येथील मुले ओळखीची असल्या कारणाने चर्चा करत असता काही जणांनी आरोप, प्रत्यारोप करायला सुरुवात केली त्यावेळेस वाद चिघळला आणि अचानक चारही बाजूंनी 40 ते 45 मुलांनी घेरून बजरंग दलाच्या कार्कर्त्यांवर जिवघेणा हल्ला केला त्यावेळेस तिथे असलेल्या कोणी एका इसमाने सदरची माहिती पोलिसांना दिल्याने कोणताही विलंब न करता तातडीने बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले म्हणुन अनर्थ टळला नाही तर एक - दोघांचा जीव जाणे नाकारता येत नव्हते. कारण एकाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे तर कुंदन सिंह आणि संतोष तिवारी यांच्यावर दांडक्याने, लाथा - बुक्क्यांनी हल्ला करण्यात आलेला असल्याचे समजते. परंतू या हल्ल्याच्या घटने मागचे कारण काय ? यांना मारण्याची सुपारी देणारे स्थानिक नेते कोण ? या कटामागचे राजकारण काय ? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पोलिस ठाण्याचे वरीष्ठ वरीष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेत गुन्हा नंबर 0467 अन्वये 25/10/2023 रोजी भारतीय दंड संहिता 1860 नुसार 307,143,145,147,148,149,323,504,506 अंतर्गत मयूर काठे, नितीन डंबाले, सागर वळवी, विशाल भालेराव, प्रशांत कोरडा, स्वप्निल भावर, सागर यमगर आणि त्यांचे सोबत असलेले 15 ते 20 यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या मुलांना पुढें करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांची नावे तपासात निष्पन्न झाले नंतर पोलिस प्रशासनाचे अधिकारी या नेत्यांवर कारवाई करीत अटक करणार का ? असा प्रश्नचिन्ह जनतेमध्ये निर्माण होत आहे. तसेच काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही हल्ला करणाऱ्या मुलांना गुजरात राज्यात स्थानिक दोन नेत्यांकडून पळविण्यात आले असल्याचे समजते.
यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत संयोजक श्री.चंदन सिंह यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली माहिती अशी की, जर पोलीस प्रशासना कडून आरोपींना अटक करण्यात आली नाही किंवा राजकिय दबावामुळे पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर संबंधित पोलीस ठाणे किंवा पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोठ्या जन संख्येने बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल व याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रात उमटतील असे सांगण्यात आले...

@ *बोईसर ग्राम पंचायत बाजार कर ठेका रद्द* @✍🏻 *बोईसर ग्राम पंचायतीचा बाजार कर वसुली लिलाव 2023 - 2024 रद्द* झाला याबाबत ...
27/10/2023

@ *बोईसर ग्राम पंचायत बाजार कर ठेका रद्द* @

✍🏻 *बोईसर ग्राम पंचायतीचा बाजार कर वसुली लिलाव 2023 - 2024 रद्द* झाला याबाबत दैनिक लोकसत्ता, सकाळ व पुढारी या वृत्तपत्रांनी दखल घेत जनतेसमोर प्रसिध्द केलेल्या दिनांक : 24,25,26/10/2024 रोजीच्या बातम्या.....
✍🏻 बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार बंधुना महेश धोडी, निलेश विचारे यांच्या वतीने धन्यवाद 🙏🏻🙏🏻

✍️ *महत्त्वाची सूचना : दिनांक - 26/10/2023 रोजी* न्यायालयाच्या समोर कोणताही पुढील निर्णय झालेला नाही पुढील तारीख 06/11/2023 असून मा. न्यायालया समोर वादी - प्रतिवादिंच्या वकीलांमर्फत युक्तिवाद होणार आहे. ठेकेदारास कोणीही कर देऊ नये, तो पर्यन्त बोईसर ग्राम पंचायत कर वसुली करणार असून या बातमीद्वारे सर्व व्यापारी वर्ग व ग्रामस्थांना माहिती देत आहोत.

✍🏻 बोईसर ग्राम पंचायतीचा बाजार कर वसुली लिलाव 2023 - 2024 रद्द झाला याबाबत दैनिक लोकसत्ता वृत्त पत्राने दखल घेत जनतेसमोर...
25/10/2023

✍🏻 बोईसर ग्राम पंचायतीचा बाजार कर वसुली लिलाव 2023 - 2024 रद्द झाला याबाबत दैनिक लोकसत्ता वृत्त पत्राने दखल घेत जनतेसमोर प्रसिध्द केलेली दिनांक : 24/10/2024 रोजीची बातमी ..... ✍🏻 बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार बंधुला महेश धोडी, निलेश विचारे कडून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

✍️ बोईसर बाजार कर वसुली ठेका यावर मा. न्यायालय, पालघर यांनी ठेकेदार राजेश चौव्हान वादी यांचा दावा ना मंजूर केला याबाबत म...
21/10/2023

✍️ बोईसर बाजार कर वसुली ठेका यावर मा. न्यायालय, पालघर यांनी ठेकेदार राजेश चौव्हान वादी यांचा दावा ना मंजूर केला याबाबत मा.न्यायालयाने प्रसिध्द केलेल्या आदेशाचे पुरावे......✍️
बोईसर ग्राम पंचायतीच्या हद्दिमधील स्थानिक रहिवासी, व्यापारी वर्ग व ग्राम पंचायत सदस्य यांस या बातमी द्वारे सुचित करीत आहोत की, बेकायदेशीर पध्दतीने बोईसरचा वसुली ठेका मिळविण्यात आलेला होता त्यावर मा. न्यायालयाचे न्यायमूर्ती सतिश कदम साहेब यांनी दिनांक : 20/10/2023 रोजी आदेश पारित केले की, वादी राजेश चौहान यांनी दाखल केलेला दावा नामंजूर केला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. बातमी सोबत मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत सर्वांसाठी प्रदर्शित करीत आहोत. तरी ठेकेदारास कोणीही कर रक्कम देऊ नये. यापुढे बाजार कर रक्कम ग्राम पंचायत बोईसर यांस व्यापारी वर्गानी द्यावी असे आपणास सुचित करीत आहोत....
आपले
महेश शांताराम धोडी
निलेश आर. विचारे

✍️ आज पून्हा एकदा निर्णय सत्याचाच - सत्याला त्रास होतो परंतू निर्णय कधिही सत्याचाच होतो ✍️                    ✍️ सत्य मे...
21/10/2023

✍️ आज पून्हा एकदा निर्णय सत्याचाच - सत्याला त्रास होतो परंतू निर्णय कधिही सत्याचाच होतो ✍️

✍️ सत्य मेव जयते ✍️

बोईसर ग्राम पंचायती कडून काळ्या यादीतील ठेकेदार याने पडद्याच्या मागे राहून बुद्धी बळातील प्यादा राजेश चौव्हान याला पुढे सरकवित मिळवलेला एकतर्फी बेकायदेशीर वसूली कर ठेका मा. पालघर न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. कदम यांनी निर्णय दिला की, ठेकेदाराने निशाणी 05 वर केलेला अर्ज फेटाळलेला आहे.
आज साधारणपणे बोईसर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविण्यात आलेली बेकायदेशीर बाजार कर वसुली ठेका पद्धत याबाबत मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती पालघर यांनी वरिष्ठांना मार्च - 2023 रोजी सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, ग्राम पंचायतीने राबवलेली प्रक्रिया चुकीची आहे. त्यानंतर सदर विषय मा. मुख्याधिकारी, जिल्हापरिषद पालघर यांचे समक्ष सूनावणी लावण्यात आली सदर सुनावणी 03 ते साडे तीन महिने चालली त्यावेळी 03 ही पक्षकार ( ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि हरकत घेणारे महेश धोडी, निलेश विचारे ) यांचे उपस्थितीमध्ये केस चालविण्यात आली आणि निर्णय मा. मुख्याधिकारी भानुदास पालवे यांनी महेश धोडी, निलेश विचारे यांचे बाजूने दिला परंतू निर्णयाचा निकाल हातात मिळायच्या आधिच मा. न्यायालय, पालघर येथे दावा दाखल करून त्यांचे वकील श्री. पाल यांचे मार्फत "जैसे थे स्थिती" मिळवली त्याप्रमाणे ठेकेदार राजेश चौव्हान यांची बाजार कर वसुली प्रक्रिया चालू होती. सदरची ठेक्याबाबत प्रक्रिया मा. पालघर न्यायालयात चालू असताना ठेकेदाराचे वकिल श्री. पाल, बोईसर ग्राम पंचायतीचे श्रीमती. रूपाणी, जिल्हापरिषदचे वकील आणि प्रतिवादी क्रमांक 04 आणि 05 ( महेश धोडी - निलेश विचारे ) यांचे वकिल श्री. अतुल पाटील यांच्यामध्ये न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर झालेल्या युक्ती वादात मा. न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी पुन्हा एकदा संबंधित विषय मुख्याधिकारी, जिल्हा परीषद,पालघर यांच्याकडे वर्ग केला आणि ठेकेदारास स्वतःची बाजू मांडनेकामी 01 महिन्याचा वेळ देण्यात आला परंतू एक मुद्दा स्पष्टपणे ऊल्लेखण्यात आला की, तिन्ही पक्षकार ग्रामपंचायत बोईसर, ठेकेदार आणि महेश धोडी - निलेश विचारे यांनी मुख्याधिकारी भानुदास पालवे यांचे दालनात उपस्थित राहून आदेशातील दिलेल्या दिनांका रोजी उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर करावे व सादर करण्यात आलेल्या म्हणण्यावर 01 महिन्यात पुन्हा नविन निकाल द्यावा असे आदेश करण्यात आले परंतू प्रतिवादी क्रमांक 04 आणि 05 व त्यांचे वकिल अतुल पाटील उपस्थित होते आणि ग्राम पंचायत व ठेकेदार न्यायालयाने दिलेल्या दिनांका रोजी अनुपस्थित होते तरी सुद्धा मा. मुख्याधिकारी भानुदास पालवे यांनी आदेश करण्याच्या आधी ठेकेदारास पत्र देऊन म्हणणे सादर करण्यास विनंती केली सर्वांचे म्हणणे आल्या नंतर जिल्हा परीषदचे मुख्याधिकारी भानुदास पालवे यांनी नविन निर्णय देखील प्रतिवादी क्रमांक 04 व 05 ( महेश धोडी - निलेश विचारे ) यांचे बाजूने दिला परंतू पडद्या मागिल काळ्या यादीतील ठेकेदार तसेच राजेश चौहान यांस मान्य नव्हता असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला परंतू निर्णय आल्यानंतर देखील मा. पालघर न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी सदर विषयामध्ये 10 दिवसांचा वेळ घेत आणि पुराव्यांची - युक्ती वादांची पडताळणी करून दिनांक : 20/10/2023 रोजी वादी यांनी दाखल केलेल्या दाव्यावर निर्णय दिला की, आपण केलेला अर्ज रद्द केलेला आहे. परंतू वादी यांचे वकिलांनी कायद्यातील तरतुदीनुसार वरील न्यायालयात या आधीच स्टे मिळण्याकामी अर्ज केला परंतू वरील न्यायालयांनी ठेकेदारास बाजार कर वसुली करण्यासाठी स्टे दिलेला नसून वरील न्यायालयातील दिनांक : 26/10/2023 देण्यात आलेली आहे.
तरी बोईसर मधिल नागरीक आणि व्यावसायिक यांस या बातमी द्वारे सुचित करीत आहोत की, कोणीही आज दिनांक : 21/10/2023 पासून बाजार द्यायचा नाही. सदर कर यापुढे ग्राम पंचायत वसूल करणार असून बोईसर ग्राम पंचायतीच्या कामगाराला कर द्यावा. ठेकेदाराच्या कामगारांकडून किंवा ठेकेदाराकडून दम दाटी करीत कर वसुली करण्याचा प्रयत्न होत असेल तर संबंधित पोलीस ठाण्यात व्यापारी वर्गानी तक्रार दाखल करावी असे सुचित करीत आहोत. लवकरच मा. न्यायालयाचा आदेश प्रदर्शित करण्यात येईल.
हा विजय आमचा नसून आपला सर्वांचा आहे, कारण आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच आम्ही हे शक्य करू शकलो अशीच आपली सर्वांची साथ राहुदेत.......

आपले
महेश शांताराम धोडी
निलेश आर. विचारे

*बोईसर ग्रामपंचायतीने राबविलेली बोली वसूली ठेका पद्धत यास मा.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी पुन्हा एकदा मा....
14/10/2023

*बोईसर ग्रामपंचायतीने राबविलेली बोली वसूली ठेका पद्धत यास मा.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी पुन्हा एकदा मा.न्यायालयास दिलेल्या दिनांक: 12/10/2023 रोजीच्या लेखी खुलाश्यावर दिनांक : 19/10/2023 पर्यन्त बाजार कर वसुलीसाठी ठेकेदार राजेश चौव्हान यास न्यायालयाचा दिलासा....

बोईसर ग्राम पंचायत कार्यालयामार्फत राबविलेली ठेका पद्धत ही पुर्णपणे चुकीची असून याबाबत भानुदास पालवे यांनी मा. न्यायालय, पालघर यांना दिनांक : 12/10/2023 रोजी लेखी अहवाल सादर केलेला आहे. ठेकेदार राजेश चौहान याने मा. न्यायालयामध्ये दाखल केलेला दावा यास 12/10/2023 पर्यन्त स्ट्ये देण्यात आलेला असून स्टये ची मुदत कालच संपलेली होती परंतू मा. न्यायालयासमोर दिनांक: 13/10/2023 रोजी सुमारे तीन तास चाललेल्या युक्ती वादा नंतर ठेकेदार राजेश चौव्हाण यास 19/10/2023 पर्यन्त वसूली करण्यासाठी मुदत दिलेली आहे.तसेच मुदत देते वेळी मा.न्यायालयाने एक अट ठेवली आहे ती अशी की, दिनांक: 13 ते 19/10/2023 पर्यन्त करणाऱ्या बाजार कर वसुलीचा हिशोब पुराव्या सहीत न्यायालयासमोर सादर करावयाचा आहे असे आदेश झालेले आहेत याची सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी असे आपणास कळवीत आहोत.
तसेच सर्व व्यावसायिकांना, जनतेला सांगू इच्छितो की, या ठेका पद्धतीबाबत लोकशाही मार्गाने न्याय घेत असता आमच्यावर काही हितचिंतकां कडून भरपूर आरोप प्रत्यारोप करण्यात आले, पैशांनी विकत घेतले असे मेसेज लोकांमध्ये पसरविण्यात आले म्हणजेच (20 लाखाला) हितेच न थांबता, आम्हाला चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकविण्यासाठी काही राजकिय,सामाजिक स्तरावर अधिकारी घटकांना हाताशी धरून षडयंत्रही रचण्यात आला परंतू आम्हाला अडकवता येत नाही त्यानंतर आम्हाला मारण्याची सुपरीही देण्यात आली असल्याचे समजते वेळ पडल्यास नावही प्रदर्शित करण्यात येतील.....असो...
परंतू आम्ही जनतेला आणि व्यापारी वर्गाला या खुलाष्याद्वारे सांगू इच्छितो की, आमचा लढा हा वयक्तिक कोणा विरोधात नाही, आमचा लढा हा चुकीच्या प्रक्रिये विरोधात आहे. चुकीची प्रक्रिया चालु आहे ही कुठे तरी थांबली पाहिजे, बदल झाला पाहिजे, भ्रष्टाचारावर नियंत्रण आले पाहिजे यासाठी आमचा लढा आहे, जो पर्यंत आम्ही घेतलेला विषय यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आमचा लढा कायम राहील कारण सत्याला त्रास होतो परंतू निर्णय शेवटी सत्याच्याच बाजूने होतो. तसेच आमच्यावर लावलेला डाग आणि रचविण्यात आलेले षडयंत्र याचे उत्तर नियती देईल... यावर आमचा पूर्ण विश्र्वास आहे. त्यामुळे आमची न्याय प्रक्रियेत चालू असलेली लढाई यामध्ये माघार नाही हे सर्वांना लेखी कळवीत आहोत. ज्याप्रमाणे आपण सर्वांनी आमच्यावर विश्र्वास ठेवलात हाच आमच्यासाठी आशिर्वाद आहे. असाच विश्र्वास आणि प्रेम राहूदे आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असा विश्र्वास या लेखाद्वारे देत आहोत.
आमचे दोघांचे अथवा कुटूंबातील सदस्याचे जिवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार काळ्या यादीतील ठेकेदार आणि या चुकीच्या ठेका प्रक्रियेमध्ये मदत करणारे राजकीय नेते, पुढारी, कार्यकर्ते सर्वस्वी जबाबदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

*आपले*

*अध्यक्ष महेश धोडी*
जनसामर्थ्य आदिवासी संघटना.
*अध्यक्ष निलेश विचारे*
छावा मराठा योद्धा, महाराष्ट्र

*बोईसर ग्रामपंचायतीने राबविलेली बोली ठेका पद्धत यास मा.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांचा पूनच्छ दणका*.....    ...
13/10/2023

*बोईसर ग्रामपंचायतीने राबविलेली बोली ठेका पद्धत यास मा.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांचा पूनच्छ दणका*.....

बोईसर ग्राम पंचायत कार्यालयामार्फत राबविलेली ठेका पद्धत ही पुर्णपणे चुकीची असून याबाबत भानुदास पालवे यांनी मा . न्यायालय, पालघर यांना दिनांक : 12/10/2023 रोजी लेखी अहवाल सादर करण्यात आलेला आहे. ठेकेदार राजेश चौहान याने मा. न्यायालयामध्ये दाखल केलेला दावा यास 12/10/2023 पर्यन्त स्ट्ये देण्यात आलेला असून स्टये ची मुदत कालच संपलेली असून आता बोईसर ग्राम पंचायतीने कर वसूली करावयाची आहे असा नियम बोलतो परंतू अजूनही *कुंपण शेत खातच असल्याचे दिसते, असो* तसेच संबंधित ठेकेदार दावा प्रलंबित असताना सदर ठेक्याचा स्टे कायम रहावा म्हणून निर्णय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश मा.न्यायालयासमोर सादर करायच्या आधीच सेशन कोर्टात धाव घेत स्टे कायम रहावा अशी बाजू ठेकेदाराचे वकील यांनी न्यायालया समोर ठेवली असता स्टे मिळालेला नाही असा संपुर्ण घटणा क्रम मा. न्यायालयाच्या समक्ष झालेला असून याची संपुर्ण बोईसर मधिल छोटे - मोठे व्यापारी वर्गानी नोंद घ्यावी.
*नियमा प्रमाणे आता बोईसर ग्राम पंचायतीने बाजार कर वसूल करावयाचा आहे*

*पण बघुया असे होते का ?*

*अध्यक्ष महेश धोडी*
जनसामर्थ्य आदिवासी संघटना.

*अध्यक्ष निलेश विचारे*
छावा मराठा योद्धा महाराष्ट्र

✍️ पालघर :- वाडा तालुकयातील *स्वामी विवेकानंद विद्या मंदिरमध्ये*  कार्यरत सहशिक्षिका श्रीमती. नूतन सिताराम बोरसे यांचे प...
06/10/2023

✍️ पालघर :- वाडा तालुकयातील *स्वामी विवेकानंद विद्या मंदिरमध्ये* कार्यरत सहशिक्षिका श्रीमती. नूतन सिताराम बोरसे यांचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून चालू असलेले आमरण उपोषण.......
संबंधित वाडा येथिल पुर्वीपासुन स्कूलमध्ये काम करीत असता काही शिक्षण विभागातील वरिष्ठ शिक्षक वर्ग, शिक्षण कमिटी मधील काही घटक, क्लार्क यांचेकडून वारंवार सहशिक्षिका श्रीमती. नूतन बोरसे यांच्या विरोधात कट कारस्थान तसेच अन्यायाची आगळीक यासंदर्भात संबंधित शिक्षिकेने या अगोदर तीन वेळा स्वतःच्या न्याय हक्कासाठी उपोषण केलेले होते आणि आता चालू असलेले हे चौथे उपोषण असून सदर महिलेला न्याय मिळत नाही ही कुठेतरी लाजिरवाणी बाब आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. कारण वेळ ही प्रत्येकावर येतच असते. जर नूतन बोरसे या तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या असताना जिल्हा पातळीवरील कोणत्याही अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का त्यांना भेट देऊन समस्या जाणून संबंधितांना तातडीने पत्रक काढीत मिटिंग लाऊन समस्येचे निवारण करून तसे शिक्षिकेला लेखी पत्र देऊन उपोषणामध्ये मार्ग काढण्याचे ?
जर एकिकडे सरकार महिलांना आरक्षण घोषित करते आणि दुसरीकडे पालघर जिल्ह्यामध्ये एका महिलेला स्वतःच्या न्याय हक्कांसाठी उपोषणाला बसावे लागत आहे ही गंभीर आणि लाजिरवाणी बाब आहे. जर या ठिकाणी एखाद राजकीय नेता उपोषणाला बसला असता तर सर्व्ह शासन, प्रशासन सर्व कामे बाजूला ठेऊन संबंधित नेत्याला उपोषणातून परारुत्त करण्यासाठी तत्पर असतात परंतू एखादा गरीब घटक बसला तर त्याला न्याय देण्यासाठी कोणीही नाही ही शोकांतिका आहे...
आज संबंधित शिक्षिकेवर शाळेतून सुटल्यावर गेट बाहेर जीवघेणा हल्ला होतो, तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नाही, सदर शिक्षीकेवर दबाव आणला जात आहे तर त्या महिलेने व तिच्या कुटुंबाने न्याय मागायचा कोणाकडे ? सदर शिक्षिकेला आयूष्यातून संपविण्याची, गायब करण्याची भाषा करणारे राज रोसपणे समाजामध्ये ताठ मानेने मिरवत आहेत यांना कायद्याचे लगाम कधी ? तीन दिवस उपोषणाला झाले असताना पालघर शिक्षणाधिकारी भागवत मॅडम यांचे कर्तव्य किंवा जबाबदारी नाही का भेट देऊन मार्ग काढण्याचे ? किती दिवस चूकीचे काम करणाऱ्या संस्थांना आपण पाठीशी घालणार ? असा सबंधित शिक्षिकेचा शासन, प्रशासन यांस प्रश्न आहे.
उपोषणास बसलेल्या महिला शिक्षिकेला न्याय कधी मिळणार ?
शिक्षक महिलेवर जीव घेणा हल्ला करणारे आणि मारण्याची सुपारी देणारे यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून निःपक्ष चौकशी करून कारवाई होणार का ?
शिक्षक महिलेने उपोषणामध्ये उपस्थित केलेल्या मागण्या याची संबंधित अधिकारी यांनी गंभीर दखल घेत मध्य काढून उपोषणामद्ये मार्ग निघेल का ?
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होऊन सबंधित शिक्षिकेला न्याय मिळणार का ?
संबंधित शिक्षिकेने ज्यांच्या विरोधात तक्रार केली आहे त्यांची निःपक्ष सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास तातडीने आदेश पारित करून कारवाई होणार का ?
परंतू मुलांना शिक्षण देणाऱ्या, गुरूच्या जागी स्थान असणाऱ्या आणि आपल्या मुलांना चांगली दिशा देणाऱ्या शिक्षक महिलेला स्वतःच्या न्याय हक्कांसाठी जर उपोषणाला बसावे लागत असेल तर या सारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. याकडे आपली प्रत्येकाची जबाबदारी म्हणून या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर महिला शिक्षिकेवर झालेल्या अन्यायाच्या आगळीकिबाबत आपले मत नोंदवा आणि महीलेला न्याय देण्यास मदत करा.✍️✍️

Address

Chithralaya
Boisar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajniti Bhrastachar-राजनिती भ्रष्टाचार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajniti Bhrastachar-राजनिती भ्रष्टाचार:

Videos

Share


Other Boisar media companies

Show All