CCW BEED LIVE

  • Home
  • CCW BEED LIVE

CCW BEED LIVE Live news Beed

ट्रक चालकाला पोलिसांकडून मारहाण प्रकरणी चालकाला रात्री उशिरा 'मॅनेज' केल्याची चर्चा?बीड प्रतिनिधी:बीड जिल्ह्यातील पाडळशि...
04/01/2025

ट्रक चालकाला पोलिसांकडून मारहाण प्रकरणी चालकाला रात्री उशिरा 'मॅनेज' केल्याची चर्चा?

बीड प्रतिनिधी:

बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोल नाक्यावर ट्रक चालकासोबत झालेल्या मारहाणीचे प्रकरण गाजत होते. चार ते पाच पोलिस कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकाला मारहाण केली, ज्यामुळे त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. जखमी चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ट्रक चालकाने पोलिसांवर आरोप करताना, "हजार रुपये न दिल्यामुळे मला मारहाण करण्यात आली," असे म्हटले होत. यासंदर्भाचा व्हिडिओ ही समोर आला होता.

या घटनेमुळे टोल नाक्यावर कार्यरत काही कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात आली अशी माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या भीतीने त्यांनी खाजगी लोकांच्या माध्यमातून चालकाला 'मॅनेज' केल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरा त्या चालकाला जिल्हा रुग्णालयातून हलवून तवेरा ॲम्बुलन्सद्वारे त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आले.दरम्यान, गेवराई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (पीआय) रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात चालकाचा जवाब नोंदवण्यासाठी आले होते. मात्र, खाजगी लोकांच्या हस्तक्षेपामुळे नेमका काय जवाब नोंदवला गेला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ही घटना समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होत असून, ट्रक चालकाला दिलासा मिळावा आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांवर चौकशी करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.

15/03/2024

तुतारीला चांगली संधी आहे परंतु बजरंग सोनवणे म्हणजे मॅनेजमेंट

09/06/2023

@बीड : तासी २९ किमी गतीने वादळी वारे वाहू लागले आहेत...
स्त्रोत : गुगल वेदर ॲप. तीन दिवस पावसाचा अंदाज

*कोविड-१९ मेडिकल किट घरी आवश्यक आहे:*  १. पॅरासिटामोल २. माउथवॉश आणि गारगल साठी बीटाडाइन ३. व्हिटॅमिन सी आणि डी 3 ५. बी ...
30/03/2021

*कोविड-१९ मेडिकल किट घरी आवश्यक आहे:*

१. पॅरासिटामोल
२. माउथवॉश आणि गारगल साठी बीटाडाइन
३. व्हिटॅमिन सी आणि डी 3
५. बी कॉम्प्लेक्स
६. वाफ + वाफ + कॅप्सूल
७. ऑक्सिमीटर
८. ऑक्सिजन सिलिंडर (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी)
९. आरोग्य सेतु अ‍ॅप
१०. व्यायाम व्यायाम

*कोविड चे तीन टप्पे:*

*१. केवळ नाकातील कोविड -*
बरे होण्यासाठी वेळ अर्धा दिवस आहे. (स्टीम इनहेलिंग, व्हिटॅमिन सी) सहसा ताप येत नाही. एसिम्प्टोमॅटिक.

*२. घशातील कोविड -*
घसा खवखवणे. बरे होण्यासाठी वेळ 1 दिवस. (गरम पाण्याचा गार्गल, पिण्यास गरम पाणी, जर ताप असेल तर पॅरासिटामोल, व्हिटॅमिन सी, बी कॉप्लेक्स, लक्षणे जास्त तीव्र असल्यास अँटीबायोटिक.)

*३. फुफ्फुसातील(Lung) कोविड-*
खोकला आणि श्वसनासाठी त्रास, दम 4 ते 5 दिवस. (व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, गरम पाण्याचे गार्गल, ऑक्सिमीटर, पॅरासिटामॉल, ऑक्सिजन सिलेंडर गंभीर असल्यास, भरपूर गरम पाणी आवश्यक आहे. श्वासोच्छवासाचा प्राणायाम कपालभारती सारखे व्यायाम करा.)

*इस्पितळात कधी जायचे अशी अवस्थाः*

ऑक्सिजनच्या पातळीवर (सामान्य पातळी 98-100) लक्ष ठेवा. जर पातळी 93 च्या जवळ गेली तर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यक लागणार आहे. जर सिलेंडर घरी उपलब्ध असेल तर इतर कोणत्याही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणार नाही.

*निरोगी रहा, सुरक्षित रहा!*

*कृपया भारतातील आपल्या संपर्कांवर चर्चा करा. ह्याची कोणाला मदत होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही.*

*टाटा समूहाने चांगला उपक्रम सुरू केला आहे. ते गप्पांच्या माध्यमातून डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला सल्ला देत आहेत. ही सुविधा आपल्यासाठी सुरू केली गेली आहे; जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरीच सुरक्षित राहाल.*

*खाली लिंक आहे. मी सर्वांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विनंती करतो.*
*https://www.tatahealth.com/online-doctor-consultation/general-physician*

*+91 74069 28123* *विलगिकरण रुग्णालयातील सल्ला, आम्ही घरी करू शकतो.*

*पुढीलऔषधे रुग्णालयात घेतली जातात-*
*१. व्हिटॅमिन सी -1000
*२. व्हिटॅमिन ई (ई)
*३. (10 ते 12 तासांतून) उन्हात 15-20 मिनिटे बसा
*४. अंड्याचे(Egg) जेवण, रोज एकदा.
*५. आम्ही किमान 7-8 तास विश्रांती घेतो/झोपतो
*६. आम्ही दररोज 1.5 लिटर पाणी पितो
*७. सर्व जेवण उबदार(थंड नाही) असावे.

*रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये इतकेच करतो.*

*लक्षात घ्या की कोरोनाव्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते*

*म्हणूनच, व्हायरसच्या उच्चाटनासाठी आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे; व्हायरसच्या आंबटपणाच्या पातळीपेक्षा जास्त क्षारीय पदार्थांचे सेवन करणे. जसे:
*केळी
*हिरवा लिंबू - 9.9 पीएच
*पिवळा लिंबू - 8.2 पीएच
*एवोकॅडो - 15.6 पीएच
*लसूण - 13.2 पीएच
*आंबा - 8.7 पीएच
*टेंजरिन - 8.5 पीएच
*अननस - 12.7 पीएच
वॉटरक्रिस - 22.7 पीएच
संत्री - 9.2 पीएच

आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली हे कसे कळेल?
*१. घसा खवखवणे
*२. कोरडा घसा
*३. कोरडा खोकला
*४. उच्च ताप
*५. श्वास लागणे
*६. गंध वास कमी होणे

*कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच व्हायरसला सुरवातीलाच नष्ट करते

तुमचंही Whatsapp अचानक बंद झालंय का? Facbook आणि Insta सह तीनही सेवा ठप्प; जगभरात अनेक ठिकाणी समस्या मुंबई, 19 मार्च : र...
19/03/2021

तुमचंही Whatsapp अचानक बंद झालंय का? Facbook आणि Insta सह तीनही सेवा ठप्प; जगभरात अनेक ठिकाणी समस्या

मुंबई, 19 मार्च : रात्री अचानक मोबाईलवरचं व्हॉट्सअॅप बंद झालेलं लक्षात आलं असेल. सुरुवातीला इंटरनेट बंद झालं असं वाटत असेल. पण प्रत्यक्षात फक्त तुमच्याच फोनला नाही, तर जगभरात अनेकांना हा अनुभव आला. शुक्रवारी रात्री 11 नंतर जगभरात अनेक ठिकाणी whatsapp, facbook, instagram या सेवा ठप्प झाल्या. या तीनही सेवा सध्या फेसबुक ही एकच कंपनी देत आहे. नेमका काय तांत्रिक समस्या निर्माण झाली हे लक्षात आलेलं नाही.
जगभरात अनेकांनी हा इश्यू असल्याचं लक्षात येताच twitter च्या माध्यमातून मांडला. हा व्हायरसचा हल्ला आहे की काही तांत्रिक समस्या आहे, हे अद्याप लक्षात आलेलं नाही. फेसबुककडून अजूनही औपचारिकपणे काही प्रतिक्रिया आलेली नाही.

एखाद्याच्या प्रेमात पडल्याबद्दल त्याला शिक्षा देणं हा गुन्हा; सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मतनवी दिल्लीएखाद्या व्यक्तीच्या प्...
07/01/2021

एखाद्याच्या प्रेमात पडल्याबद्दल त्याला शिक्षा देणं हा गुन्हा; सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत

नवी दिल्ली
एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे किंवा एकमेकांचा सहवास लाभण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांना शिक्षा देणं हा कायद्यानं गुन्हा आहे, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.
एका खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत. "तुम्ही एखाद्याला प्रेमात पडल्याबद्दल शिक्षा करू शकत नाही", असं शरद बोबडे म्हणाले. तशी शिक्षा केल्यास तो गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरेल, असंही ते पुढे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय घटनापीठासमोर आज एका गावातील खाप पंचायतीमधील ११ सदस्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली.

*शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे नि...
18/12/2020

*शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश*

मुंबई, दि. 18 : सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे आदी उपस्थित होते.

शासकीय निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. ही पदे मंजूर करताना केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर निवासी शाळेसाठीच्या शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली. त्यानुसार निवासी शाळेच्या लेखा परिक्षणात विभागांतर्गत निवासी शाळांचा अभ्यासक्रम हा राज्य शिक्षणमंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याचे निदर्शनास आल्याने महालेखापरिक्षकांनी निवासी शाळेतील शिक्षकांची वेतनश्रेणी सुधारित करण्याबाबत सूचना केली होती.

समाजकल्याण आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार शासकीय निवासी शाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला होता. त्यानुसार वित्त विभागाने निवासी शाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास मान्यता दर्शवली असून शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती दिली. स्वयंसेवी संस्था संचलित अनुसूचित जातीच्या मुलामुलींकरिता चालविण्यात येणाऱ्या अनुदानित प्राथामिक, माध्यमिक आश्रमशाळांमधील ‍शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली असून यानुसार निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळामधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन स्तरावर एक महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

०००००

*पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*बीड दि.२९::-...
29/11/2020

*पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल-- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

बीड दि.२९::- पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या केंद्रामध्ये निवडणूक मतदानामुळे एक दिवसाचा बदल झाला आहे. यासंदर्भात सर्व संबधितांनी नोंद घ्यावी,
दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजीच्या मतदानामुळे खालील प्रमाणे परीक्षा केंद्रास बदल पुढील प्रमाणे आहे.

1) भगवान विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००३ (इ,. १०वी.) ऐवजी भा.वा.सानप प्राथमिक विद्यालय, धानोरा रोड, बीड. ( भगवान विद्यालय,धानोरा रोड बीड समोर)
2) चंपावती विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००० (इ,. १०वी.) ऐवजी चंपावती इंग्लिश स्कुल, बीड (चंपावती विद्यालय, बीड शेजारी)
3) बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्र क्रमांक २०९ (इ,. १२वी.) ऐवजी मिल्लिया कन्या शाळा,किल्ला मैदान, बीड ( बलभीम महाविद्यालय शेजारी)
4) श्री सिध्देश्‍वर विद्यालय, माजलगाव केंद्र क्रमांक २५०२ (इ,. १०वी.) ऐवजी सिध्देश्‍वर महाविद्यालय, माजलगाव ( श्री सिध्देश्‍वर विद्यालय शेजारी ,)
5) न्यू हायस्कूल थर्मल, परळी वै केंद्र क्रमांक २१४६ (इ,. १०वी.)ऐवजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी ( न्यू हायस्कूल शेजारी)
6) जि.प. मा.शाळा शिरूर कासार केंद्र क्रमांक २६२५ (इ,. १०वी.) ऐवजी जि.प. कन्या शाळा, शिरूर (का.) ( जि.प. मा.शाळा शेजारी)
या बदला नुसार आणि बदल झाल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत

तसेच परीक्षार्थींनी हा बदल केवळ दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग-1 आणि बारावीच्या गणित व संख्याशास्त्र भाग-2 या पेपर पुरताच आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी केले आहे.
००००

*बीड जिल्हयात मनाई आदेशांना 31 डिसेंबर पर्यंत वाढ* *--जिल्हाधिकारी राहूल रेखावार* बीड, दि,29:- (जि.मा.का.) कोरोनाच्या पा...
29/11/2020

*बीड जिल्हयात मनाई आदेशांना 31 डिसेंबर पर्यंत वाढ* *--जिल्हाधिकारी राहूल रेखावार*

बीड, दि,29:- (जि.मा.का.) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्यामूळे बीड जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये जे आदेश लागू आहेत त्या सर्व मनाई आदेशात वाढ करण्यात येत असून ते दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले.
जिल्ह्यात यापूर्वी सदर कलमान्वये दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत त्यात वाढ होऊन दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत लागू राहतील.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुण खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
*-*-*-*-*-*-*

जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु- जिल्हाधिकारी राहूल रेखावार- सुरु राहण्याच्या वेळाबाबत...
16/11/2020

जिल्हयातील कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु
- जिल्हाधिकारी राहूल रेखावार

- सुरु राहण्याच्या वेळाबाबत स्थानिक तहसीलदारांच्या संमतीने निर्णय

कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक सूचना


बीड,दि. 16 :- (जि.मा.का) राज्य शासनाने प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. या अनुषंगाने बीड जिल्हयातील केवळ कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 पासून खुली करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस आधीन राहून परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे खुले राहण्याच्या वेळेबाबत संबंधित विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी स्थानिक तहसिलदार यांच्या संमतीने निर्णय घ्यावा. मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे कडील दिनांक 29 जून 2020 रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्हयातील परिस्थिती प्रमाणे संबंधीत जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना जिल्हयातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत.दयापूर्वीच्या आदेशानुसार जिल्हयातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 वा. पर्यंत वाढविणेत आहे.

सर्व संबंधित कंटेनमेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांचे कडून पुढिलप्रमाणे नमुद मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करणेचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थानी देण्यात आले असून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यामधील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.
शासनाच्या 14 मार्च 2020 अन्वये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतूदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमित करणेत आली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्याचे कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी होणारा कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक सूचना

धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया संख्येने लोक एकत्र येत असतात. अशा ठिकाणी ठिकाणांच्या आवारात कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे.
कंन्टेनमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील.
कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपायासोबतच या विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजनांचा ही समावेश करण्यात आलेला आहे. फक्त कंन्टेनमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरू करणेस परवानगी असेल. 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोव्हीड-19 विषाणू संसर्ग थांबविण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनां बरोबरच सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे.
यामध्ये खालील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश असेल- या सर्व सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल. चेहरापट्टी, मास्क यांचा वापर करणे बंधनकारक असेल. हात अस्वच्छ दिसत नसले तरी साबणाने वारंवार हात धुणे (किमान-40 ते 60 सेंकदापर्यंत) बंधनकारक असेल. त्याचबरोबर सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझर चा वापर (किमान-20 सेंकदापर्यत) करावा. श्वसनसंबंधित शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. यामध्ये शिकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल याची दक्षता घेणे तसेच वापरलेला टिश्यू पेपरची योग्य त्या पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक कामगार, भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असलेस स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनास कळविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. तसेच याचे उल्लघंन केलेस स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वानी आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा.
सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे या ठिकाणी खालील प्रमाणे उपाययोजना करतील. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशव्दारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल, धार्मिक, प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी फक्त कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी, मास्कचा वापर केला असेल तरच या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी द्यावी.
सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोव्हीड -19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायोजना पोस्टर्सच्या माध्यामातून दर्शनी भागात लावण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी कोव्हीड-19 विषाणू संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओ च्या माध्यमातून जनजागृतीसाठी वारंवार ऐकवल्या,प्रसारित केल्या जाव्यात. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेश देणेबाबत अभ्यागत, भाविकांबाबत निश्चित धोरण ठरवावे. त्या ठिकाणी निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा, याबाबतचा निर्णय धार्मिक, प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करावे.
चप्पल, बुट, पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबांची पादत्राणे एकत्रित नेमून दिलेल्या कप्प्यांमध्ये स्वत: ठेवाव्यात. (इतरांमार्फत ठेवू नये) वाहन पार्किंगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणेत यावे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने स्टॉल, कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळे सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणेसाठी योग्य मार्किंग करावे. भाविक, अभ्यागतांसाठी धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे.
धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील भाविकांच्या, अभ्यागातांच्या प्रवेशासाठीच्या रांगामध्ये किमान 6 फुटाचे शारिरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. यासाठी धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणारी संस्था जबाबदार असेल. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांनी प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने धुवावेत. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत, भाविकांना बसण्याची व्यवस्था करत असताना योग्य सामाजिक अंतर राखावे. वातानुकुल यंत्र, वायुविजनसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेत यावे. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान 24°C ते 30°C पर्यत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता 40-70% पर्यत असेल. जास्तीत-जास्त ताजी हवा, क्रॉस व्हेन्टीलेशन याची पुरेसी व्यवस्था करावी.
पुतळे, मूर्ती, पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही.
धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी किंवा जमाव जमविण्यास परवानगी असणार नाही. संसर्गाचा विचार करता शक्य त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले भक्ति संगीत, गाणी वाजविली जावीत आणि समूहगान करण्यास परवानगी देणेत येवू नये. एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळावा. धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, सतरंजी वापर सामूहिकपणे करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा सतरंजी आणावी जी प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या बाबींना परवानगी असणार नाही.
धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी असलेले सामुदायीक भोजन व्यवस्था, लंगर, अन्नदान, अन्नछत्र इत्यादी ठिकाणी अन्न तयार करताना व वितरण करताना योग्य शारिरिक अंतर राखणेत यावे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रभावी स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापकाव्दारे परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जतुकीकरण केले जावे. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील इमारतीतील जमिन, फरशी व इतर आवारात वारंवार स्वच्छता केली जावी.
अभ्यागत, भाविक, सेवेकरी, कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरा पट्टी, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे याची दक्षता घेणेत यावी. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोव्हीड-19 सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा आहे. त्याचबरोबर कामावर येणे अगोदर तसेच ज्यांचा लोकांशी जास्त संपर्क येतो त्या सर्व कर्मचाऱ्यांची आठवडयातून एकदा कोव्हीड -19 चाचणी करणे आवश्यक असेल. खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक असेल, प्रत्येक धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. आजारी व्यक्तीला इतरांपासून दूर असे स्वतंत्र खोलीत किंवा जागेत ठेवावे. डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क,चेहरापट्टी वापर करणे बंधनकारक असेल. तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल/क्लिनिक) केंद्रात कळवावे. तसेच स्थानिक, जिल्हा प्रशासनास हेल्पलाईनद्वारे कळवावे. संबंधीत क्षेत्रातील वैद्यकीय अधिक्षक,प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदर रुग्णामुळे होणाऱ्या संसर्गाचे जोखीम मूल्यांकन केले जाईल. त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. सदर रुग्ण कोव्हीड-19 विषाणू बाधित (पॉझिटिव्ह) असल्याचे निष्पन्न झाल्यास त्वरीत सर्व परिसरात निजतुकीकरण करण्यात यावे.

*-*-*-*-*-*-*-*

*कोरोना पासून बचाव होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे--जिल्हाधिकारी राहूल रेखावार**सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दी ...
01/11/2020

*कोरोना पासून बचाव होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे--जिल्हाधिकारी राहूल रेखावार*

*सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत असल्यामुळे केले आवाहन*

बीड, (जिमाका) दि. १::--जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी अनेक व्यवसाय, संस्था, कार्यालये, उद्योग, व्यापार आदींना अटी-शर्ती सह परवानगी दिली आहे, महत्त्वाचे कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर संबंधितांनी यावेळी कोरोना पासून बचाव होण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

सध्या सणांच्या निमित्ताने बाजार तसेच खरेदीसाठी गर्दी होत असल्यामुळे आणि बर्‍याच ठिकाणी प्रतिबंधात्मक निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सदर आवाहन केले आहे.

घराबाहेर पडलेनंतर नागरिकांनी प्रवास, खरेदी आणि कामा दरम्यान मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटाइजर ने अथवा साबणाने हात स्वच्छ धुवावे तसेच विविध नियमांचे व निर्देशांचे पालन करून स्वतःचा आणि कुटुंबातील सदस्यांचा बचाव करावा.

राज्य शासनाने "माझे कुटूंब -माझी जबाबदारी" अभियान राबविले असून दुसरी लाट थोपवण्यासाठी व संसर्ग कमी होण्यासाठी आपणच आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. प्रशासन तर कार्यवाही करत आहे पण नागरिकांनी देखील नियम पालन केले तर कोरोनाचा संकटापासून बचाव करण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी सांगितले आहे.
०००००

*रेशनद्वारे धान्य मिळविण्यासाठी पात्र नागरिकांनी  संबंधित रेशन दुकानदारकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन*बीड,  दि. ५ (जिम...
05/07/2020

*रेशनद्वारे धान्य मिळविण्यासाठी पात्र नागरिकांनी संबंधित रेशन दुकानदारकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन*

बीड, दि. ५ (जिमाका) :--ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये एपीएल शेतकरी योजनेचा स्थानिक मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने डाटा एन्ट्री करताना जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थी एपीएल शेतकरी योजनेत समाविष्ट करावेत अशा सूचना सर्व रेशन दुकानदार यांना देण्यात आलेल्या आहेत.
आपल्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल याची जबाबदारी संबंधित रेशन दुकानदार यांची असेल. सर्व पात्र नागरिकांनी तात्काळ रेशनद्वारे धान्य मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे संबंधित रेशन दुकानदार यांचेकडे जमा करावेत असे आवाहन केले आहे.

शासनाकडून मंजूर अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना व एपीएल शेतकरी योजनेअंतर्गत सर्व धान्य वाटप हे केवळ ई-पॉस ही मशीन द्वारेच मिळेल, इतर कोणत्याही मार्गाने किंवा लेखी पावत्यांच्या आधारे कोणालाही धान्य मिळणार नाही. सदरील मशिनद्वारे धान्य वाटप करताना मशीन मधून ही पावती निघते ती पावती पात्र कार्ड धारकासाठीची आहे आणि ती प्रत्येक रास्त भाव दुकानदाराने लाभार्थ्यांना देणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येकाने स्वतःचा हक्क समजूनच मागून घेतली पाहिजे. या पावतीवर संबंधित कार्ड धारकाला किती धान्य देण्यात येत आहे आणि त्यासाठी त्याने किती रक्कम दुकानदाराला द्यावी हे दिलेले असते. जर राशन दुकानदार ही पावती देत नाही अशी तक्रार प्राप्त झाल्यास व तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल.

दरमहा 14 तारखेला रास्त भाव दुकान निहाय नवीन डाटा एंट्रीला अतिरिक्त इष्टांक ग्राह्य धरून मंजुरी देण्यात येईल व शिल्लक अतिरिक्त इष्टांक जिल्हास्तरावर राखून ठेवण्यात येईल. त्यामुळे दरमहा गाव निहाय रास्त भाव दुकाननिहाय शिधापत्रिका संगणकीकरणाद्वारे लाभार्थी यादी मधील होणाऱ्या बदलाच्या आधारे (वाढ किंवा घट या दोन्हीची) धान्य मंजुरी देण्यात येणार आहे. या पद्धतीने दरमहा कार्यवाही सुरू झाल्याने शिल्लक इष्टांक पूर्णपणे वापरता येणार आहे. मा. जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे दि.20 जून पासून दि. 4 जुलै 2020 रोजी पर्यंत शिधापत्रिका व लाभार्थी संख्येत ८७२ वरून ८३१२ इतकी वाढ झाली आहे.

वरील शिल्लक इष्टांकाचे वाटप करताना प्रथम येणाऱ्या पात्र लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने इष्टांक वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच प्रथम Onlineडाटा एन्ट्री करून घेणारे पात्र नागरिक येणाऱ्या पुढील महिन्यात धान्य घेण्यास पात्र ठरणार आहेत. कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व राशन दुकानदार यांनी योजनानिहाय डाटा एन्ट्री करावी.

पात्र नागरिकांनी तात्काळ रेशनद्वारे धान्य मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे संबंधित रेशन दुकानदार यांचेकडे जमा करावेत

१. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रती
२. दारिद्र्य रेषे मध्ये नाव समाविष्ट असल्यास ग्रामसेवकाचा दाखला ( केवळ अंत्योदय अन्न योजनेचे साठी)
३. शिधापत्रिकेमध्ये नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी पूर्वी असलेल्या शिधापत्रिकेतील नावे कमी केल्याचा तहसीलदार किंवा रेशन दुकानदार यांचा दाखला.
४. अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 व 8अ चा उतारा.
५. पूर्वीची शिधापत्रिका असल्यास शिधापत्रिकेची छायांकित प्रत.
६. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
७. कुटुंबातील जेष्ठ श्री यांच्या नावे केलेला अर्ज (स्वयंघोषणापत्रसह)
८. अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रीचे चे दोन फोटो, त्यावर अर्जदाराची सही करून जोडावे.
९. तलाठी /मंडळ अधिकारी यांचा अभिप्राय.
१०. रहिवासी पुरावा (लाईट बिल/ पीटीआर /भाडे पत्र /आधार कार्ड इ.)
११. गॅस कार्डची छायांकित प्रत, असे सचिन खाडे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी कळविले आहे .
०००००

*राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय**कार्यपद्धती निश्चित करणे सुरु -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* -----------...
05/07/2020

*राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय*

*कार्यपद्धती निश्चित करणे सुरु -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

-------------
*हॉटेल्स असोसिएशनसमवेत बैठक*

मुंबई दि ५: *मिशन बिगीन अगेन* मध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.

*स्वयंशिस्तही महत्वाची -आदित्य ठाकरे*

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले कारण . पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या श्हरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे.

मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, हॉटेल्स १०० टक्के लगेच सुरु करत येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करतो आहोत. प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, हॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे आहे

इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले की या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे.

आज आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरीत कामगार आहे.काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टोंरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरु करायला परवानगी द्यावी, इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते. त्यामुळे पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहावे जेणे करून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल.

विवेक नायर म्हणाले की, विजेची देयके कमी करावीत. हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावा. कमलेश बारोट म्हणाले की, या उद्योगाला खुले केल्यास अनेक फायदे होतील. हॉटेल्स आणि रेस्टोंरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीतकमी मर्यादा असावी अन्यथा उत्पन्न आणि कर मिळणार नाही. हॉटेल्स आणि रेस्टोंरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी. सध्या ६ लाख कोटींपेक्षा जास्त फटका हॉटेल्स आणि रेस्टोंरंट उद्योगाला बसत आहे. विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे. फ्लाईटमध्ये प्रवाशांना 8 -8 तास एकत्र बसावे लागते. हॉटेल्समध्ये एखादे कुटुंबीय सर्व प्रकारची काळजी घेऊन आणि सुरक्षितता ठेवून येऊ शकते. टेबल्सची मांडणी त्यादृष्टीने केल्यास, स्वच्छता ठेवल्यास काहीही अडचणी येणार नाही

एस पी जैन म्हणाले की, हॉटेल्समधील सुविधा उद्योग आणि व्यवसायही वापरू शकते, त्यामुळे उत्पन्न वाढू शकेल. मुंबईतील हॉटेल्स सध्या पालिकेने कोविड काळासाठी घेतल्या आहेत शिवाय काही सुविधा स्वत:हुन आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत, याचा कमीतकमी मोबदला काही प्रमाणात मिळाला तर आम्हालाही येणारे खर्च भागवता येतील. पुनीत चटवाल म्हणाले की, अनेकांना त्यांच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांत कपात करावी लागत आहे त्यामुळे हॉटेल्स काही प्रमाणात सुरु केल्यास व्यवसाय वाढेल. देवेंद्र भरमा, प्रदीप शेट्टी, हरप्रीत सिंग, तेज टकले यांनी देखील आपल्या सुचना केल्या.

*लॉकडाऊनचा कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ**कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश कायम**जिल्हाधिकारी राहुल रेखावार*बीड...
30/06/2020

*लॉकडाऊनचा कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ*

*कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश कायम*
*जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

बीड, दि. ३०:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ जुलै २०२० रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून त्यानुसार जिल्हयात दिनांक ३१ जुलै २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड
संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत.
त्यामुळे आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत कायम राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

यापूर्वी आदेशानुसार जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या कालावधीत
३१ जुलै २०२० पर्यत वाढ झाली आहे.

राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 खंड 2 , 3 व 4 नुसार 13 मार्च 2020 पासून प्रतिबंध लागू केले आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
००००

Address


Telephone

+917020955822

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CCW BEED LIVE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CCW BEED LIVE:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share