27/03/2021
“ ्रतिज्ञा_देवासाठी आणि ्याग_आईवडिलांच्या_आनंदासाठी”
#विठ्ठला_शप्पथ उद्या दुपारी २८.०३.२०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता #सोनी_मराठीवर...
मी विजय साईराज, बरोबर ५ वर्षांपूर्वी मी माझ्या जीवनाचं एक वेगळं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या #वडिलांनी ( #साईराज_कंक) आकाश पाताळ एक केलं आणि स्वप्नाला पूर्णत्वाकडे घेऊन करण्याचं काम #दिग्दर्शक_चंद्रकांत_पवार यांनी केलं. “मला चित्रपट सृष्टीत नशीब आजमावायचं होतं”.
परंतु वास्तवाला अस्तित्वात आणताना समजलं, "नशीब असं काहीच नसतं , स्वप्नांच्या पुर्तेतेसाठी करावे लागतात फक्त निष्काम प्रयत्न. तेच प्रयत्न आम्ही केले आणि स्वप्न सत्यात उतरलं, “विठ्ठला शप्पथ” हा फक्त चित्रपट नसून एक प्रतिज्ञा आहे.
कदाचित अतिशोयोक्ती ठरेल तरीही सांगायलाच हवं म्हणून,
१) #देवदत्ताची भीष्म प्रतिज्ञा, मी आजन्म ब्रम्हचारी राहीन, गाडीची कधीही अभिलाषा बाळगणार नाही आणि सदैव कुरुकुलाच्या गादीची निष्काम सेवा करेन.
२) तुमचं, माझं, आपलंच नव्हे तर जगातील संपूर्ण क्रांतिकारकांच आराध्य देवैत, “ #छत्रपती_शिवाजी_महाराज” त्याचीही प्रतिज्ञाच, “हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा”.
३) #लोकमान्य_टिळकांची प्रतिज्ञा, “ स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच”
४) तसेच माझीही एक आपुलकीची प्रतिज्ञा, “वडील आणि त्यांचं विठ्ठल मंदिर यापुढे माझ्या प्रेमाची काय किंमत, क्षणिक सुखासाठी मी आई-वडिलांच्या चेह-यांवरच हासू, हरवून देणार नाही”
“या सुखा कारणे देव वेडावला, देवा ववैकुंठ सोडूनी संता सदनी राहिला”
बस्स तोच विठ्ठला शप्पथ, उद्या दुपारी २८.०३.२०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता सोनी मराठीवर...
जरूर पहा, यातील सर्वच गाणी तुम्हांला भुरळ घालतील, “छक्कास छोकरा” या गाण्याला २०१७ चा बेस्ट कोरिओग्राफर म्हणून “ #उमेश_जाधव” यांना पुरस्कार देखील मिळाला आहे.
तेंव्हा जरूर पहा, “एक प्रतिज्ञा देवासाठी आणि एक त्याग आईवडिलांच्या चेह-यावरील आनंदासाठी”
“विठ्ठला शप्पथ”