Dhamane Belgaum

Dhamane Belgaum Daily Live News

माजी तालुका पंचायत सदस्य रघुनाथ गुंडूनाथ बुवा यांचे निधनबेळगाव : धामणे माजी तालुका पंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य,...
20/05/2024

माजी तालुका पंचायत सदस्य रघुनाथ गुंडूनाथ बुवा यांचे निधन
बेळगाव : धामणे माजी तालुका पंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते, कलमेश्वर गल्ली धामणे येथील रहिवाशी रघुनाथ गुंडूनाथ बुवा (वय वर्षे 65) यांचे सोमवार दिनांक 20 रोजी दुःखद निधन झाले. पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने ते दोन वेळा तालुका पंचायत सदस्य व तीन वेळा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले होते. तसेच त्यांच्या पत्नीने एक वेळ तालुका पंचायत सदस्य पद भूषविले आहे. धामणे परिसरात बहुजन समाजामध्ये पौरोहित म्हणून ते कार्य करत होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. गुरुवार दिनांक 23 रोजी सकाळी ठीक 8 वाजता रक्षा विसर्जन होणार आहे.

नमस्कार 🙏🏻🙏🏻सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की वरील माहिती जास्तीत जास्त आपल्या सर्वा ग्रुप मध्ये शेअर करावं🙏🏻🙏🏻
16/11/2023

नमस्कार 🙏🏻🙏🏻सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की वरील माहिती जास्तीत जास्त आपल्या सर्वा ग्रुप मध्ये शेअर करावं🙏🏻🙏🏻

नमस्कार, सरकारी मराठी शाळेमध्ये एक विशेष कार्यक्रम श्री विजय बाळेकुंद्री माझी ग्रामपंचायत सदस यांनी आपल्या मुलगीचा वाढदि...
30/08/2023

नमस्कार, सरकारी मराठी शाळेमध्ये एक विशेष कार्यक्रम श्री विजय बाळेकुंद्री माझी ग्रामपंचायत सदस यांनी आपल्या मुलगीचा वाढदिवस शाळेमध्ये साजरा केला व सर्व मुलांना गोड जेवण दिल, तसेच शाळेसाठी एक शेगडी आठवण रूपात दिल्याबद्दल त्यांचा सर्वांचे वतीने आभार मानतो असंच सर्वांचा सहकार गावाबद्दल राहू देत "माझं गाव माजी सेवा"

धामणे विभाग म. ए. समितीचे मार्गदर्शक श्री वामन जोतिबा पाटील धामणे याच्या मातोश्री पुतळाबाई जोतिबा पाटील (वय 102) याचे आज...
29/08/2023

धामणे विभाग म. ए. समितीचे मार्गदर्शक श्री वामन जोतिबा पाटील धामणे याच्या मातोश्री पुतळाबाई जोतिबा पाटील (वय 102) याचे आज (29/08/2023) सकाळी दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
संध्याकाळी 5:30 वाजता धामणे स्मशानभूमी येते त्याची अंत्यविधी होणार आहे.

ಇಂದು ಸಂಪತ್ ಶುಕ್ರವಾರ, ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ  ವ್ರತ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ದೇವತೆಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಊರಿನ ಪ್ರಗತಿಪರ ರೈತರುಗಳಾದಂತ ಶ್ರೀ ಕೃ...
25/08/2023

ಇಂದು ಸಂಪತ್ ಶುಕ್ರವಾರ, ವರಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ವ್ರತ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ದೇವತೆಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಊರಿನ ಪ್ರಗತಿಪರ ರೈತರುಗಳಾದಂತ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಮಾರುತಿ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಪಾಂಡುರಂಗ ಸುಬ್ಬಾನಿ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನೆರವೇರಿತು.ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಮಾರುತಿ ಪಾಟೀಲ್ ಇವರು 31000/- ರೂಪಾಯಿ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ರಾಹುಲ್ ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಟೀಲ್ ಇವರು 25000/- ದೇನಿಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನ ಪನ್ಸ್ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ಸಮಸ್ತ ಊರಿನ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಂದ ಗೌರವ ಪೂರ್ವಾಕ ಧನ್ಯವಾದಗಳು🙏🏼🙏🏼💐💐

धामणे महाराष्ट्र एकीकरण समिती गेले पंधरा दिवस सतत त्याने रोज प्रत्येक गल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्त्यां...
24/02/2023

धामणे महाराष्ट्र एकीकरण समिती गेले पंधरा दिवस सतत त्याने रोज प्रत्येक गल्लीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून बैठक घेत आहे.

हाय मित्रांनो आम्ही बेळगावकर धामणे ट्रॅकर...गेली तीन वर्ष आम्ही सतत गड किल्ले मोहीम (ट्रेकिंग) म्हणून सुरू केली आहे श्री...
16/12/2022

हाय मित्रांनो आम्ही बेळगावकर धामणे ट्रॅकर...

गेली तीन वर्ष आम्ही सतत गड किल्ले मोहीम (ट्रेकिंग) म्हणून सुरू केली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर दरवर्षी आठ दिवसाची मोहीम आम्ही गेले तीन वर्ष मोहीम आम्ही सुरू ठेवली आहे. ती आज पर्यंत आम्हाला यशस्वी पणे पार पडली आहे या मोहीम मध्ये धामणे व खादरवाडी गावातील या मुलांचा सहभाग आहे.
धामणे ट्रेकर्सतर्फे गड -किल्ले मोहीम फत्ते

या भटकंतीमधे मारुती बस्तवाडकर, नागराज सालगुडे, पिराजी रेमानाचे, शंकर पाटील, पंकज सालगुडे, किशोर देसाई, प्रसाद पाटील, दीपक बेळगुंदकर, नागराज अकनोजी, प्रमोद पाटील, सचिन पाटील, अनिल बेंनाळकर आणि अमित भोसले या ट्रेकर्सचा सहभाग होता.

विश्व वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व मित्रांनी मिळून ट्रेकिंग आणि गड किल्ले सर करण्यास सुरवात केली. इतिहासातील शिवछत्रपतींच्या शौर्याची गाथा कानी पडली आणि त्या स्फूर्तीतून सतत 3 वर्षांपूर्वी आम्ही या कार्यास प्रारंभ केला. आम्ही साधारण 2020 पासून ट्रेकिंग करण्यास सुरवात 2022 पर्यंत आम्ही यशस्वीपणे पार पडली आम्ही 10- 15 ट्रेकर्स यामध्ये सहभाग होते यशस्वी धामणे व खादरवाडी गावातील मुले मोहीम ट्रेकिंग करण्यास सुरवात केली. स्वराज्यातील गड किल्ले जवळून अनुभवण्याचं चंगच आम्ही बांधला.

गड किल्ले सर करणे, ट्रेकिंग करणे जणू आमचा छंदच झाला आहे. आणि त्याबद्दल रुची आणि आवड निर्माण झाली आहे. ट्रेकिंग हा एक साहसी छंद आहे ज्याला निसर्गाची आवड आणि शिवाजी महाराजांचा आदर आहे असेच लोक करू शकतात. ट्रेकिंग एक छंद म्हणून मानले जाऊ शकते, त्यामुळे मानसिक आणि आरोग्य दोन्ही फायदे होऊ शकतात. ट्रेकिंग तणावमुक्त म्हणून कार्य करते आणि त्यामुळे आपल्याला उदासीनतांवर मात करण्यास मदत होऊ शकते. ट्रेकिंग मुळे आपली हिम्मत आणि स्वतःवरचा विश्वास वाढवते.
आजच्या तरुण पिढीला शिवछत्रपतींच्या शौर्याची ओळख व्हावी, निसर्गाविषयी आदर निर्माण व्हावा, सामाजिक भान जागृत असणारे सुजाण सुसंस्कृत नागरिक समाजात निर्माण व्हावे हे एकच उद्दिष्ट घेऊन आम्ही आमची वाटचाल सुरु केली आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रा मधील सर्व किल्ले करणे. महाराष्ट्र ट्रेकिंग साठी उत्तम ठिकाण आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असे बरेच किल्ले बघण्यासारखे आणि ट्रेकिंग साठी खूप छान आहेत. आम्ही महाराष्ट्रातील विस्तीर्ण सह्याद्रीच्या उंच उंच पर्वत रांगा, घनदाट जंगल, नद्या व धबधबे, दगडी बांधकाम आणि किल्ले पाहण्यासाठी केली आहे

सह्याद्री भटकंती 🚩 2020
1. Nashik ramghat panchvati
2. Harihar gad
3. Saptshrungi gad (vani)
4. Bhandardara
5. Ratangad
6. Harishchandra gad
7. Shivneri gad junnar

सह्याद्री भटकंती 🚩 2021
1. Dhodap gad
2. Salher gad
3. Ramshej gad
4. Anjaneri parvat
5. Trambkeshwar
6. Kalsubai shikhar
7. Jejuri

सह्याद्री भटकंती 🚩 2022
1) Lohgad
2) EkVira Aai Lonavala
3) Kalavantin
4) vikat (Peb)
5) GorkhaGad
6) Jivadhan Gad
7) Bhima Shankar

असे आम्ही गड कोट किल्ले केले आहे
साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे.
- धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच किल्ला आहे. (प्रथम - साल्हेर - १५६६ मी. (५१४१ फूट))
धोडप किल्ला हा १४५१ मी. (४७६० फूट) उंची असलेला हा पेशवाई किल्ला ९४५ हेक्टर परिसरात कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यांच्या परिक्षेत्रात पसरलेला आहे.
कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. अशा अवघड ठिकाणी वरती जाऊन आम्ही ही मोहीम राबवलेली आहे आहे

15/12/2022

धामणे ट्रेकर्सतर्फे गड -किल्ले मोहीम फत्ते

धामणे ट्रेकर्स या गडकोट किल्ल्यांची भ्रमंती करणाऱ्या पथकाने महाराष्ट्रातील विविध गड -किल्ले भ्रमंतीची मोहीम नुकतीच यशस्वीरित्या पार पाडली.

धामणे ट्रेकर्सनी लोहगडपासून आपल्या ट्रेकिंग मोहिमेला सुरवात करण्यात आली. प्रारंभी धेयमंत्र म्हणून हर हर महादेवच्या गजरात मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लोहगडपासून एकवीरा आई लोणावळा, कलावंतीण दुर्ग, पेब विकट गड, गोरख गड, जीवधन किल्ला मार्गे भीमा शंकर ज्योतिर्लिंग मंदीर येथे ट्रेकिंग मोहिमेची सांगता झाली. या मोहिमेचा हे तिसरे वर्ष होते. या भटकंतीमधे मारुती बस्तवाडकर, नागराज सालगुडे, पिराजी रेमानाचे, शंकर पाटील, पंकज सालगुडे, किशोर देसाई, प्रसाद पाटील, दीपक बेळगुंदकर, नागराज अकनोजी, प्रमोद पाटील, सचिन पाटील, अनिल बेंनाळकर आणि अमित भोसले या ट्रेकर्सचा सहभाग होता.

धामणे गावातील सर्वांना कळविण्यात येते की गावांमधून जो नाला गेलेला आहे तो माननीय श्री आमदार अभय पाटील साहेबांच्या कडून कर...
14/12/2022

धामणे गावातील सर्वांना कळविण्यात येते की गावांमधून जो नाला गेलेला आहे तो माननीय श्री आमदार अभय पाटील साहेबांच्या कडून करण्यात आला होता तो आज प्रारंभ झालेला आहे..

धामने बेळगाव मधील गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव  तर्फे सर्व मंडळांना "भगव...
09/09/2022

धामने बेळगाव मधील गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिली आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव तर्फे सर्व मंडळांना "भगवा स्वाभिमान मराठी मनाचा" हे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले

Pandharpur vari yellur, Dhamane
06/07/2022

Pandharpur vari yellur, Dhamane

माध्यमिक विद्यालय धामणे एसएससी परीक्षा 2021-22
24/05/2022

माध्यमिक विद्यालय धामणे एसएससी परीक्षा 2021-22

16/04/2022

आज रोजी धामणे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे...

https://youtu.be/NjyArRzjI5g बसवेश्वर यात्रा धामणे
28/03/2022

https://youtu.be/NjyArRzjI5g बसवेश्वर यात्रा धामणे

Jatra Dhamane | Dhamane Belgaum Live | Belgaum Live | Mela | जत्रा 28 March 2022

देवगन हट्टी धामणे गडा
28/03/2022

देवगन हट्टी धामणे गडा

*लेकीसाठी वैकुंठातुन*👨‍👧                  -----------------------------------         भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुका...
14/03/2022

*लेकीसाठी वैकुंठातुन*👨‍👧
-----------------------------------
भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.
काही काळजी आहे का संसाराची?पोरींची?तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले,आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत.योग्य वेळ येवू द्यावी लागते.परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले.तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला.
अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला म्हणाले, नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तु तुकाराम महाराजाची मुलगी आहे. भागिरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांच जीवन पुन्हा पुर्ववत सुरु झालं.भजन किर्तन नामस्मरण नित्य सेवा सुरु झाली.
भागिरथीचं यलवडी गाव जवळच होतं पण येणंजाणं नव्हतं.देहुची माळीण भाजी विकायला यलवडीला जायची. राञी देहुमध्ये झालेलं आपल्या बापाचं,तुकाराम महाराजांच किर्तन ऐकण्यासाठी भागिरथी माळीणबाईची आतुरतेने वाट पाहायची.महाराजांच किर्तन, उपदेश ऐकून भागिरथीचे डोळे बापाच्या आठवणीनं भरून यायचे.माळीणबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं,महाराजाचं रोज दर्शन होतय या भावनेनं भागिरथी कृतकृत्य व्हायची.
अखेर तो दिवस आला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा.फाल्गुन वैद्य द्वितीया, सोमवार चा दिवस होता. प्रथमप्रहर,प्रात:काळ.बीजेच्या दिवशी शेवटचं किर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला.भागिरथी ला सांगाव,पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही.म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहु गावचं रत्नं गेल.
देहु गाव शोकसागरात बुडून गेल.सर्व निश्चल बसलेले.कुणाच कशात लक्ष लागत नाही.
पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीणबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली. आणि जड पाऊलाने भागिरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माळीणबाई का आली नाही?माळीणबाई तुझा चेहरा का उतरला?असा प्रश्न भागिरथीने माळीणबाईला विचारला.जड अंतकरणानं माळीणबाई म्हणाली,भागिरथी तुझे बाबा माझे गुरू,जगतगुरू तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले.
आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागिरथी धायमोकलुन रडु लागली.परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचाराणं भागीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला.आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकुन तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले.नारायणाची परवानगी घेऊन भुतलावरच कार्य पुर्ण करण्यासाठी महाराज भागिरथीच्या घरी आले.
भागिरथी असा आवाज दिला.वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकुन भागिरथीने धावत येवून तुकाराम महाराजांना कडकडुन मिठी मारली,आनंदाश्रु घळघळ वाहु लागले.भागिरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती ञास करून घेतलास.तशी भागिरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय?कुणासाठी जगावं?तुकाराम महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला.भागिरथी म्हणाली,बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवन करते.महाराज म्हणाले भागिरथी मी आता न जेवणा-या गावी गेलो.आपल्या भागिरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत,परत हाक मारू नको अशी विनंती केली.तशी भागिरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय अस वाटु देऊ नका,मी हाक मारणार नाही.भागिरथीला आशिर्वाद दिला.
भागिरथीच जिवन परिपूर्ण झालं.हे बाप-लेकीच अलौकिक नातं आहे.मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते.बाप आपलं दु:ख आईच्या ह्रदयासमान लेकीला सांगुन मन हालक करत असतो.जगतगुरू तुकाराम महाराज आणि भागिरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं ह्रदयस्पर्शी उदाहरण आहे.म्हणून अस म्हणतात कि बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत,कारण एका *लेकीसाठी* एका बापालाही *वैकुंठहुन* यावा लागलं होतं !!

यासाठीच,
मित्रानो,
*बोलत राहा, भेटत राहा* . *"मरायच* सर्वांना आहे, परंतु ... *मरावंसं* कोणालाच वाटत नाही.. *आजची* परिस्थिति तर फार गंभीर आहे.. *"अन्न"* सर्वांनांच हवंय..पण.. *"शेती"* करावीशी कोणालाच वाटत नाही.. *"पाणी"* सर्वांनाच हवंय.पण.. *"पाणी"* वाचवावे कोणालाच वाटत नाही.. *"सावली"* सर्वांनाच हवीय..पण.. *"झाडे"* लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. *"सुन"* सर्वांनाच हवीं आहे.. पण.. *"मुलगी"* व्हावी कोणालाच वाटत नाही.. *विचार* करावा असे प्रश्न...पण.. *विचार* करावा असं कोणालाच वाटत नाही..हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु *forward* करावा असं कोणालाच वाटत नाही.

🍃🍃🍃🙏 *एक सत्य*🙏 🍃🍃🍃🌹

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रमसंपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटीलजन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथ...
17/01/2022

प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.
प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा जीवनक्रम

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.
डॉ. एन.डी. पाटील साहेब यांना श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनियर कॉलेज, कालकुंद्री यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹

06/01/2022

सिंधुताई....

7 ऑक्टोंबर 2021 आज रोजी धामणे गावामध्ये घटस्थापनेचा पहिला दिवशी दुर्गामाता दौड मोठ्या प्रमाणात पार पडली..श्री दुर्गा मात...
07/10/2021

7 ऑक्टोंबर 2021 आज रोजी धामणे गावामध्ये घटस्थापनेचा पहिला दिवशी दुर्गामाता दौड मोठ्या प्रमाणात पार पडली..
श्री दुर्गा माता की जय प्रेम से बोलो जय माता दी प्यार से बोलो जय माता दी सभी मिल के बोलो जय माता दी......

Address

Dhamane S. Belgaum
Belgaum
590005

Telephone

+919901199232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhamane Belgaum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhamane Belgaum:

Share

Category


Other Newspapers in Belgaum

Show All