Vijeta Times

Vijeta Times जनसामान्यांचा आवाज
MH32D0024065
(4)

महाराष्ट्र विद्यालयाचे NMMS व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश...हिंदवी समाचार : बार्शी,महाराष्ट्र राज्य परीक्षा...
16/04/2024

महाराष्ट्र विद्यालयाचे NMMS व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश...

हिंदवी समाचार : बार्शी,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील एकूण १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले तर ९२ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक झाले. एकाच शाळेतील एवढे जास्त प्रमाणात उत्तीर्ण व शिष्यवृत्तीधारक झालेली बार्शी तालुक्यातील पहिली शाळा आहे.

१६ विद्यार्थ्यांना रुपये ६०००० प्रमाणे ९६०००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ९२ विद्यार्थ्यांना ३८४०० प्रमाणे ३५३२८०० रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
एकूण ४४,९२,८०० शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.सचिन देशमुख, श्री.सुरेश डिसले,श्री.संग्राम देशमुख व श्री.सुजीत लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय. यादव,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील,बी.के.भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री.एस.सी.महामुनी,पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादनहिंदवी समाचार : बार्शी,विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, मह...
16/04/2024

गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन

हिंदवी समाचार : बार्शी,
विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सूरज भालेराव प्रमुख पाहुणे नितीन साठे प्रमुख उपस्थित बाळकृष्ण पिसे हे होते. प्रमुख पाहुणे नितीन साठे , सूरज भालेराव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे, शिका , संघटित व्हा , संघर्ष करा आशा संदेश दिला. बाबासाहेबानी सर्व घटकासाठी कार्य केले. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. भीम जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे. आपल्या देशाला मोठी राज्यघटना दिली असे बोलत होते. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी उपाध्यक्ष रणजीत चौधरी, किरण खुरंगळे, समाधान चौधरी, गुलाब शेख , बाळकृष्ण पिसे , कमेश चौधरी, राजेंद्र भोसले, अविनाश चौधरी इतर मान्यवर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर अभारप्रदर्शन रणजीत चौधरी यांनी केले.

अवघे अवघे या..! श्रीराम नवमी निमित्त बार्शी शहरांमधून निघणारा भव्य दिव्य अशी शोभायात्रा...हिंदवी समाचार : बार्शी,श्रीराम...
16/04/2024

अवघे अवघे या..!
श्रीराम नवमी निमित्त बार्शी शहरांमधून निघणारा भव्य दिव्य अशी शोभायात्रा...

हिंदवी समाचार : बार्शी,
श्रीराम नवमी निमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समिती बार्शी आयोजित भव्य दिव्य शोभायात्रा बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी, दुपारी 4:00 वाजता श्री भगवंत मंदिर मार्ग बार्शी येथून निघणार आहे. सदर शोभायात्रे चे मुख्य आकर्षण भगवान श्रीरामाची 9 फुटाची मूर्ती तसेच भगवान हनुमान जी ची 7 फुटाची मूर्ती आहे.

सदर शोभायात्रा श्री राम मंदिर भगवंतमंदिर मार्ग , महाद्वार चौक ऐनापुरमारुती, तेल गिरणी चौक ,शिवाजी आखाडा ,एसटी स्टँड चौक, पोस्ट ऑफिस चौक, जुने पोलीस स्टेशन, पांडे चौक, नगरपालिका, तानाजी चौक, संकेश्वर उद्यान, एकविराई मंदिर मार्गे भगवंत मंदिरासमोर समारोप होईल.

तरी बार्शी शहर व परिसरातील तमाम हिंदू बंधू भगिनींनी अबाल वृद्धांनी सदर शोभायात्रेत सहकुटुंब सहभागी व्हावे अशी विनंती. शोभा यात्रेत सहभागी होताना महिलांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी व्हावे तसेच पुरुषांनी पांढरा शर्ट आणि भगवी टोपी परिधान करावी अशाप्रकारचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बार्शी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन...हिंदवी समाचार : बार्शी,उन्हाळ्याच्या सुट्टीच्य...
16/04/2024

बार्शी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन...

हिंदवी समाचार : बार्शी,
उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात बार्शी शहर व परिसरातील खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी येथील भगवंत क्रिकेट असोसिएशन संचलित फिनिक्स क्रिकेट अकॅडमी तर्फे 4 ते 19 वर्षे गटातील मुले व मुलींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिराचा कालावधी हा 18 एप्रिल ते 5 जून 2024 पर्यंत असणार आहे.

सदर उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये सोलापूर तसेच पुणे येथील 8 नामवंत खेळाडू व प्रशिक्षकांकडून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी प्रशिक्षणार्थींना मिळणार असून याचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भगवंत क्रिकेट असोसिएशन संचलित फिनिक्स क्रिकेट अकॅडमी ही मुले व मुलींना अत्याधुनिक व तंत्रशुद्ध क्रिकेट प्रशिक्षण देणारी तालुकास्तरावरील एकमेव प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रशिक्षणार्थींना सराव करण्यासाठी आधुनिक आर्टिफिशियल टॅर्फच्या दोन खेळपट्ट्या तसेच ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन द्वारे प्रशिक्षण दिले जाते.

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने दर रविवारी एक सराव सामना तसेच आठवड्यातून एक वेळा स्विमिंग सेशन घेतले जाणार आहे. शिबिर काळात प्रत्येक प्रशिक्षणार्थीस एक टूर सामना खेळण्याची संधी दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण संपविल्यानंतर ट्रॉफी व सर्टिफिकेट प्रदान केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

संपर्क : गोविंदा भिसे 9405358958

10/04/2024
06/04/2024

#उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा निवडणूक 2024
#राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. #अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य सत्कार व #महिला मेळावा Live

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी! डिजिटल मीडिया संपादक ...
28/03/2024

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी!

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न!

विजेता टाईम्स : बार्शी, दि.28/03/24
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना बार्शी तालुका कार्यकारिणीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्यात आली. तसेच बार्शी येथील खमक्या इंडिया च्या प्रधान कार्यालयामध्ये बार्शी तालुका कार्यकारणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण हे होते तर राज्य कार्यकारणी सदस्य संतोष सूर्यवंशी, कोर कमिटीचे मार्गदर्शक तथा खमक्या इंडियाचे कार्यकारी संपादक अमित इंगोले, संघटनेचे कार्यालयीन सचिव शशांक शिंगाडे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अजय पाटील, सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजय कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी 2024 - 25 सालाकरिता नवीन कार्यकारणीची निवड, शासन स्तरावर डिजिटल मीडियातील पत्रकारांना अधिकृत राजमान्यता, संघटनेच्या सदस्यांकरिता आरोग्य विमा, पत्रकारांसाठी विविध योजना व सवलती, पत्रकारांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन करणे, संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेणे, संघटनेचा वर्धापन दिन साजरा करणे, नवीन सदस्य नोंदणीसाठी नियमावली व संहिता ठरवणे आदी प्रकारच्या विषयावर सकारात्मक चर्चा होऊन बैठकीतील विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली चांदा ते बांदा पर्यंत पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी संघटना कार्यरत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती असून त्यांच्या विचारधारेवर काम करत, कार्यकारणी सदस्यांनी आपले उद्देश, नियमावली, विविध कार्यशाळा, सामाजिक उपक्रम व कार्यप्रणाली याच्या संहितेचे पालन करणे गरजेचे असून, आपल्या सर्वांच्या प्रत्येक अडचणी वेळी संघटना आपल्या पाठीशी राहणार असल्याचे अमित इंगोले यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना मुरलीधर चव्हाण म्हणाले की, पत्रकारितेमध्ये काम करत असताना आपणास आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची प्रतिकृती असलेले संतोष सूर्यवंशी नेहमीच आपल्या सोबत आहेत. संघटनेच्या संहितेचे पालन करून संघटनेची कार्यप्रणाली व कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करावेत तसेच, आगामी वर्षाची नविन कार्यकारिणीची घोषणा राजा माने यांच्या उपस्थितीत होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धीरज शेळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश मेटकरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी भैरवनाथ चौधरी, सिद्धार्थ बसवंत, अभिजीत शिंदे, गणेश शिंदे, किरण माने, अक्षय बारंगुळे, वैशाली ढगे आदींनी परिश्रम घेतले.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याची विद्यार्थ्यांना संधी - सचिन वायकुळेहिंदवी समाचार : बार्शी, व्ह...
26/03/2024

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याची विद्यार्थ्यांना संधी - सचिन वायकुळे

हिंदवी समाचार : बार्शी, व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज येथील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणानंतर भवितव्याच्या वाटा निवडताना सकारात्मक पत्रकारितेतून नवीदिशा “व्हॉईस ऑफ मीडिया सोबत समाजाचा आवाज व्हा” हा मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यात ज्येष्ठ पत्रकार व स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे यांनी मार्गदर्शन केले. मंगळवार दिनांक 26 रोजी बी.पी.सुलाखे कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना सचिन वायकुळे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी करीयरच्या वाटा शोधताना अनेक क्षेत्रे असली तरी पत्रकारिता हे देखील असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपल्याला सर्वच क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा आढावा घेऊन स्वत:चे मत व्यक्त करण्याची व समाजाला सकारात्मक दिशा देण्याची संधी उपलब्ध आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी सध्या तरी किमान पात्रता ही सर्वसामान्य आहे. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या योग्य उमेदवारास मंत्रालयात देखील अधिकारी पदावर काम करण्याची संधि उपलब्ध आहे. याप्रसंगी समाजातील घडणार्‍या अनेक घडामोडींची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्नोत्तर स्वरुपात त्यांच्या भावना समजून घेतल्या. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची योग्य उत्तरे दिली त्यांना पुस्तकांची भेट देण्यात आली.

प्रास्ताविकात अजित कुंकूलोळ यांनी व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना अल्पावधीतच जागतिक स्तरावर पोहोचली आहे व पत्रकारांच्या मूलभूत समस्या सोडवत आहे याची माहीती दिली. तसेच लवकरच बार्शीत व्हॉईस ऑफ मीडियाचे स्वत:चे आकाशवाणी केंद्र सुरू होत असल्याची माहिती देऊन यामध्ये विद्यार्थ्यांसाठी करियरची संधी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी बी. पी. सुलाखे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवित आहे. आजचा उपक्रम हा अत्यंत सकारात्मक असून व्हॉईस ऑफ मीडिया ही व्हॉईस ऑफ इंडिया होऊन सर्व सामान्यांचा आवाज व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, महासचिव गणेश शिंदे, शहराध्यक्ष हर्षद लोहार, प्रा. संजय करंडे, प्रा.एन.आर. सारफळे, प्रा. के. बी. चपटे, प्रा.बी.डी. लांडे, प्रा.एम.ए.ढगे, प्रा. के.एम.माळी, प्रा.के.बी.चक्कावार, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमीर कुरेशी, विजय शिंगाडे, मल्लिकार्जुन धारूरकर, शाम थोरात, प्रवीण पावले, विक्रांत पवार, श्रीशैल माळी, लखन शेंडगे, संगीता पवार, भूषण देवकर, समाधान चव्हाण, आदिनी परिश्रम घेतले.

13/03/2024

बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बार्शी शहरांमध्ये रूट मार्च

श्री. भगवंत भक्त आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाला यश : श्री. भगवंत भक्त निवास साठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर...बा...
13/03/2024

श्री. भगवंत भक्त आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाला यश : श्री. भगवंत भक्त निवास साठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर...

बार्शी:- नगरपरिषद क्षेत्रातील भगवंत मंदिराजवळ भक्त निवास बांधकाम करणे यासाठी ''नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजतेअंतर्गत ९ कोटी निधी मंजूर झाल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण भारतात व बार्शी शहर व तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले, प्रसिध्द, प्राचीन कालीन मंदीर व भारतातील एकमेव भगवंताचे मंदीर म्हणुन सर्वदूर परिचित असलेले बार्शी शहराचे ग्रामदैवत भगवंताच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भक्त निवास बांधण्यासाठी ''नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजतेअंतर्गत ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

बार्शी शहर, तालुका तसेच महाराष्ट्रातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या भगवंताच्या भाविक भक्तांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी श्री. भगवंतावर मोठी श्रद्धा असलेले भगवंत भक्त आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने ९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सदर भक्त निवास पुर्ण झाल्यावर भाविकांचीही राहण्याची व्यवस्था होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून शिंदे-फडणवीस-पवार सरकार कामगीरी दमदार अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातील जनतेतून व्यक्त होत आहे.

श्री भगवंत भक्त निवास साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार व्यक्त केले.

03/03/2024

मनोज जरांगे पाटील यांचे बार्शीमध्ये मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत

02/03/2024

बार्शीतील हेल्थ क्लब आयोजित भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धा ...

29/02/2024

बार्शीतील जैन मंदिर ते जामगाव हद्दीपर्यंत चा रोड मंजूर आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती

24/02/2024

हेल्थ क्लब, बार्शी च्या वतीने बार्शीमध्ये प्रथमच इंटरनॅशनल लेव्हलच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन...

बार्शी:-आपल्या परिवारासहित बार्शी मध्ये मॅरेथॉनचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी...

वैशिष्ट्ये
* बार्शी मधील रनर्स साठी स्वतंत्र बक्षीस आहे...
* बार्शी रनर्स यांच्यासाठी 10% डिस्काउंट
(डिस्काउंट काही कालावधीसाठीच उपलब्ध आहे)
* ग्रुप ने रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी 10% डिस्काउंट
* प्रथमच टाईम चीप (BIB) सह स्पर्धा व टाईमिंग नुसार नंबर व बक्षिसे
* प्रथमच बार्शी शहरात 5 की.मी. 10 की.मी. 21 की.मी. मॅरेथॉन
* वयोगटानुसार स्पर्धा
* प्रत्येक स्पर्धकाला, टी शर्ट, टाईम चीप, मेडल, ई सर्टिफिकेट, नाष्टा
* विजेत्यांना एकूण 2 लाखांपर्यंत बक्षिसे व ट्रॉफी
* झुंबा
* ऑनलाईन रजिस्ट्रेशन, QR कोड स्कॅनिंग द्वारे
* आपल्या व्यवसायाच्या ब्रॅण्डिंग साठी उत्तम संधी

चला तर मग स्वतःसाठी, आपल्या बार्शी साठी आजच आपली ऑनलाईन नाव नोंदणी करूया.....

व्हॉइस ऑफ मिडियाचे संस्थांतर्गत पुरस्कार जाहिर, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी  बार्श...
20/02/2024

व्हॉइस ऑफ मिडियाचे संस्थांतर्गत पुरस्कार जाहिर,

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी बार्शी तालुक्याची निवड, संदिप मठपती उत्कृष्ट संघनायक !

बार्शी :-व्हॉइस ऑफ मिडिया ही संस्थाध्यक्ष संदीप काळे यांच्या दूरदृष्टीमुळे निर्माण झालेली पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी, सकारात्मक पत्रकारितेसाठी दिशादर्शक असलेली जागतिक पातळीवरील संघटना असून, मागील तीन वर्षांच्या अल्पकाळातही जागतिक स्तरावरुन पत्रकारांच्या सर्वंकष उन्नतीसाठी कार्य करणारी अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिक निर्माण केलेली संस्था ठरली आहे. संस्थांतर्गत कार्य करणाऱ्या विविध शाखांना मार्गदर्शन करीत असतांनाच त्यांच्यातील संघनायकांच्या उत्तम कार्याची दखल घेत, त्यांची प्रशंसा करण्यासाठी, इतरांना बरोबर घेवून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या नेत्रत्वाचा सन्मान करण्यासाठी संघटनेने विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ व राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात
बार्शी शहर आणि तालुक्यात संघटनेची शाखा स्थापन झाल्यापासून पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन व कार्यशाळा, पत्रकारांच्या परिवाराची आरोग्य तपासणी, विमा कवच, शिक्षण, घरकुलांसाठी प्रयत्न, पत्रकार भवनसाठी पाठपुरावा, आंदोलनामध्ये सहभाग असे विविध उपयुक्त उपक्रम राबवून संस्थेचा नावलौकिक निर्माण करण्यासाठी व इतरांना प्रेरणा देवून बार्शीचा नावलौकिक निर्माण केला आहे. बार्शी तालुका पत्रकार संघाने मागील दोन वर्षात ग्रामीण भागातील पत्रकारांचे उत्कृष्ट संघटन केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाचा पुरस्कार बार्शीने पटकाविला आहे. *पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाचा पुरस्कार व्हॉइस ऑफ मिडिया, बार्शी शाखेला मिळाला आहे.* येत्या 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्यदिव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबाबत तालुकाध्यक्ष तथा उत्कृष्ट संघनायक संदिप मठपती यांना अभिनंदनाच्या लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर तर्फे राजा माने यांचा गौरव !अभिषेक बच्चन, गोविंदा,अरबाज खान,मिका सिंग,रविना टंडनची उपस्थिती*मु...
20/02/2024

चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर तर्फे
राजा माने यांचा गौरव !

अभिषेक बच्चन, गोविंदा,अरबाज खान,मिका सिंग,रविना टंडनची उपस्थिती*

मुंबई,दि. :- येथील चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आणि फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय संपादक राजा माने यांचा सेंटरचे प्रमुख अजय कौल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तब्बल ४३ वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेच्या ४१व्या वार्षिक स्नेहसोहळ्यात सहा हजार विद्यार्थी-पालकांच्या उपस्थितीत मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देवून राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.यावेळी ख्यातनाम अभिनेते अभिषेक बच्चन, गोविंदा, अभिनेत्री रविना टंडन, प्रसिद्ध गायक मिका सिंग, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

19/02/2024

विघ्नहर्ता प्रतिष्ठान च्या वतीने भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा साजरा

Address

2311/12 Hede Galli, Barshi
Barsi
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijeta Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijeta Times:

Videos

Share


Other News & Media Websites in Barsi

Show All