Swamini News

Swamini News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swamini News, Media/News Company, Barsi Police Head Quarters.

स्वच्छ प्रतिमा… सक्षम नेतृत्व…जनतेचा विश्वास — राकेश नवगिरे!प्रभाग क्रमांक 9 मध्ये जोरदार चर्चा!प्रामाणिक, तत्पर आणि कार...
27/10/2025

स्वच्छ प्रतिमा… सक्षम नेतृत्व…जनतेचा विश्वास — राकेश नवगिरे!

प्रभाग क्रमांक 9 मध्ये जोरदार चर्चा!

प्रामाणिक, तत्पर आणि कार्यक्षम नेतृत्वाची ओळख म्हणजेच राकेश नवगिरे — गेली दहा वर्षे प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने झटणारे एक खरे जनसेवक.

राकेश नवगिरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी केवळ निवेदनं देऊन थांबले नाहीत, तर आवश्यक तेथे आंदोलन करूनही प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवला.

🔹 प्रभागातील अनियमित व दूषित पाणीपुरवठा या गंभीर समस्येवर त्यांनी नगरपालिकेकडे निवेदन देऊन तत्काळ उपाययोजना करून घेतल्या.
🔹 मेन पाईपलाईन लिकेज (शाळा क्र. 8 समोर) हा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न केवळ पाच दिवसांत मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
🔹 शंतनू मोटर्ससमोरील मेन लिकेज, तसेच स्ट्रीट लाईट बसविणे — हे सर्व प्रश्न त्यांनी निश्चयाने सोडवले.
🔹 प्रभागातील रोड व पावसाळी गटारांची नवीन होण्याकरिता नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
🔹 सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान व भव्य मोफत आरोग्य शिबिर, पोलीस बांधवांचा सत्कार, महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार, आणि महापुरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू वाटप अशा अनेक उपक्रमांनी त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

कोरोना काळात राकेश नवगिरे यांनी बार्शी येथील रेड लाईट वस्ती, सोलापूर रोड, 422 तसेच इतर भागांमध्ये अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केले.
त्याचबरोबर दोन वेळा कोरोना लसीकरण शिबिरे आयोजित करून नागरिकांना मोठा दिलासा दिला.
प्रभागातील घरकुल मंजुरी व विविध नागरी समस्यांवर त्यांनी नेहमीच ठामपणे भूमिका घेत जनतेचा आवाज बुलंद केला आहे.

राकेश नवगिरे यांचे ध्येय केवळ सामाजिक सेवा नव्हे, तर युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये सक्षम करणे आहे. ते सांगतात,

> “प्रभागातील प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि मी पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे.”

आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वत्र चर्चा आहे —

> “जनतेतून आलेला, प्रामाणिकपणे काम करणारा नवीन चेहरा — राकेश नवगिरे!”

आगामी बार्शी नगरपरिषद निवडणुकीत राकेश नवगिरे संपूर्ण ताकदीने मैदानात उतरायला सज्ज आहेत.
स्वच्छ प्रतिमा, सक्षम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास —
हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे.

सिल्व्हर मध्ये रंगला सिल्व्हर ज्युबिली सोहळाबार्शी: 1999 सालच्या दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साह...
26/10/2025

सिल्व्हर मध्ये रंगला सिल्व्हर ज्युबिली सोहळा

बार्शी: 1999 सालच्या दहावी ‘अ’च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च 1999 मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज 25 वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते.

धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात व्यस्त असले तरी शाळेच्या आठवणी कायम मनात असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

या वेळी मुख्याध्यापक चाटी सर यांनी मनोगतात सांगितले की, “सर्व माजी विद्यार्थी निरोगी राहा, एकमेकांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडा. आता तुम्ही सर्व पालकाच्या भूमिकेत आहात आणि तुमची जबाबदारी वाढली आहे. समाजाच्या सर्व स्तरात यशस्वी विद्यार्थी हीच सिल्व्हरची खरी ओळख आहे,” असे ते म्हणाले.

दहावी ‘अ’च्या बॅचमधील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वबळावर उद्योग उभे केले, तर काहीजण राजकारणातही पुढे गेले आहेत. याच बॅचमधील सुवर्णा मुंडे या कळंब नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा तर राजश्री माळगे या बार्शी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. काहीजणी शिक्षक, तर काही गृहिणी असून सर्वगुणसंपन्न माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा दिवाळीच्या आनंद पर्वणीसारखा ठरला.

25 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेतील गमती-जमती, शिक्षकांच्या शिक्षा, जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांसोबत क्षण साजरे केले.

या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, माजी मुख्याध्यापक एस. एम. गणाचार्य, तळे सर, निबंर्गी सर, अनुराधा शिलवंत, जाधवर सर, मेनकुदळे सर, विश्वास चौधरी सर यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समाजातील योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

या मेळाव्यास दहावी ‘अ’च्या बॅचचे सुमारे 50 विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात वेगळी छाप उमटवली असून, त्यांचा अभिमान असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. गीत-संगीत, नाट्यछटा, मिमिक्री, विनोदी केबीसी, डायलॉग आणि नृत्य सादरीकरणांमुळे वातावरण रंगतदार झाले. जुन्या काळातील प्रसंग आणि शिक्षकांच्या आठवणींनी सर्वांना पुन्हा 25 वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाम थोरात यांनी मानले.

23/10/2025

#राजेंद्र_राऊत

23/10/2025
मराठा योध्दा तरुण मंडळ व गुरुजी प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम...बार्शी:- शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे या उद्देशाने ...
23/10/2025

मराठा योध्दा तरुण मंडळ व गुरुजी प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम...

बार्शी:- शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे या उद्देशाने "एक हात मदतीचा" 'मराठा योध्दा तरुण मंडळ' व
'गुरुजी प्रतिष्ठान' यांनी आयोजित केला होता.

मागील ५ वर्षांपासून सुरू असलेली ही सुंदर परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि प्रेमाने पार पडली, गावातील अंबाबाईचीवाडी येथील एकुण ६० ग्रामस्थांना किराणाचे किटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी दिपक कापसे,शाहुराजे बाबर, संदिप कापसे,गणेश कापसे यांच्या पुढाकाराने अंबाबाईचीवाडी ग्रामस्थांना किटचे वाटप करण्यात आले अशी माहिती संदिप कापसे यांनी दिली.

सदर उपक्रम हा मंगळवार दिनांक २१/१०/२०२५ अंबाबाईचीवाडी गावात पार पडला.

या उपक्रमातून बार्शी तालुक्यातील सर्वच भागातून त्यांचे कौतुक होत असून ही समाजसेवा अशीच अखंडीत सुरू राहिल असे सांगण्यात आले.

यावेळी अंबाबाईचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

22/10/2025

युवा मित्र
शुभम मुठाळ
(खामगावकर)
यांच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!युवराज तात्या बारंगुळे उद्योजक बार्शी. #दिवाळी_पाडवा
22/10/2025

बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

युवराज तात्या बारंगुळे
उद्योजक बार्शी.

#दिवाळी_पाडवा

वसुबारस निमित्त श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोशाळा, बार्शी येथे गोपूजन व लोगो चा शुभारंभबार्शी : वसुबारस निमित्त श्री नवकार...
18/10/2025

वसुबारस निमित्त श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोशाळा, बार्शी येथे गोपूजन व लोगो चा शुभारंभ

बार्शी : वसुबारस निमित्त श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोशाळा, बार्शी येथे भक्तिभावाने गोपूजन, आरती तसेच गोशाळेच्या नव्या लोगो चा शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे , तसेच बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थेचे ट्रस्टी प्रदीप बागमार यांनी सांगितले की, गोरक्षणामध्ये जनावरे तळ हातासारखी सांभाळली जातात. ही गोशाळा गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहे. जैन समाजासह इतर समाजही या कार्यात सहकार्य करत आहेत. येथे सुमारे २५०–३०० जनावरे आहेत. ही सर्व जनावरे भाकड किंवा कत्तलखान्याकडे जाताना गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली जातात. काही जनावरे मृत अवस्थेत असतात, तर काही गंभीर जखमी अवस्थेत आढळतात आणि गोशाळेत पाठवली जातात.

गोरक्षणाचे उत्पन्न मुख्यतः शेणखतावर आधारित असते; बाकीचा खर्च समाजाच्या दातृत्वातून भागवला जातो. समाज आपल्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, बैलपोळा, वसुबारस, नवीन व्यापाराची सुरुवात, नोकरी लागल्याचा आनंद किंवा पुण्यतिथी अशा प्रसंगी गोशाळेला मदत करतो. येथे विविध जातींच्या गायी आहेत. मध्यंतरी कत्तलखान्याकडे जाताना तालुका पोलीस स्टेशनने पकडलेल्या ३० लहान खोंडांचे संगोपन गोशाळेत चालू आहे. काही खोंडांना पंधरा दिवसांपासून संस्थेचे ट्रस्टी संचालक युवक पवन श्रीश्रीमाळ यांनी बाटलीने दूध पाजून, चारा खाऊ घालून वाढवले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर म्हणाले, “पांगरी, माढा, वैराग, बार्शी तालुका व शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलीस कर्मचारी स्थानिक युवा गोरक्षकांसह मिळून कत्तलीकडे जात असलेल्या जनावरांना पकडतात. हे गोरक्षक ती जनावरे पोलिसांच्या ताब्यात देतात आणि पोलिस ती सुरक्षितपणे श्री नवकार जैनसेवा गोशाळेकडे सुपूर्द करतात. ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. गोशाळा आणि पोलीस प्रशासन यांचे सहकार्य समाजातील युवकांना समाजसेवेस प्रोत्साहित करते. बार्शीतील युवक कोणत्याही संघटनेशी जोडलेले असून समाजहितासाठी कार्यरत आहेत, हेच शहराची खरी ताकद आहे.”

बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले, “गाय ही फक्त प्राणी नसून आपली जननी आहे. तिच्या माध्यमातून दूध, शेणखत, मूत्र, शेती आणि पर्यावरणाला लाभ होतो. गोमाता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणतेही सण असले तरी पोलीस अधिकारी व कर्मचारी सुट्ट्या घेत नाहीत; दिवाळीतही ते घरी जाऊ शकत नाहीत. पण दिवाळीच्या पहिल्या दिवशी श्री नवकार जैनसेवा गोशाळेत येऊन वसुबारसचे पूजन करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद झाला. या दिवाळीची सुरुवात खूप खास झाली.” त्यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टी पवन श्रीश्रीमाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन अध्यक्ष धन्यकुमार शहा यांनी मानले.

कार्यक्रमाला शहरातील जैन समाजासह विविध सामाजिक संस्था, नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी कार्यक्रमात अध्यक्ष धन्यकुमार शहा, संस्थेचे ट्रस्टी प्रदीप बागमार, संदीप सुराणा, गोविंद बाफना, पवन श्रीश्रीमाळ, निरव छेडा, तसेच गोशाळेचे सेवक बाळासाहेब ओहाळ, संतोष वागलगावे, सोमनाथ काजळे यांनी अथक परिश्रम घेतले.

18/10/2025

#तहसिलदार एफ आर शेख...
#महत्वाचे

17/10/2025
17/10/2025

Address

Barsi Police Head Quarters

Telephone

+919011907787

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swamini News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swamini News:

  • Want your business to be the top-listed Media Company in Barsi Police Head Quarters?

Share