दिव्य महाराष्ट्र Divya Maharashtra

  • Home
  • India
  • Barshi
  • दिव्य महाराष्ट्र Divya Maharashtra

दिव्य महाराष्ट्र Divya Maharashtra Divya Maharashtra / Yogesh Lokhande

स्वाभिमान मराठीचा,आवाज महाराष्ट्राचा
(1)

 #प्रांताधिकारी यांचे तडीपारीचे आदेश  #विभागीय आयुक्तांकडून रद्द #नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले होते तडीपार  #विभागीय आ...
15/06/2024

#प्रांताधिकारी यांचे तडीपारीचे आदेश #विभागीय आयुक्तांकडून रद्द

#नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले होते तडीपार #विभागीय आयुक्त यांचा ठपका

#प्रांताधिकारी व पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईवर प्रश्न चिन्ह?

#दिव्य महाराष्ट्र-: बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी फिरोज काझी व इब्राहिम शेख यांना पोलीस अधीक्षक सोलापूर (ग्रामीण) यांनी उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र. १ यांचेकडे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता, त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र .१ यांनी फिरोज काझी यास सहा महिन्याकरिता तर इब्राहिम शेख यास तीन महिन्याकरिता सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) केले होते.

या विरोधात काझी व शेख यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त तथा अपिलीय प्राधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून फिरोज काझी व इब्राहिम शेख यांच्यावरील तडीपारीचे आदेश रद्द केले.

फिरोज काझी व इब्राहिम शेख यांना उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर क्र-१ यांनी मार्च २०२४ मध्ये तडीपार केले होते. या आदेशा विरोधात आरोपींनी ॲड. आकाश तावडे यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. यावर झालेल्या सुनावणीत ॲड. तावडे यांनी आरोपींची बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून विभागीय आयुक्तांनी फिरोज काझी व इब्राहिम शेख यांच्या तडीपारीचा आदेश संपुष्टात आणला.

 #उजनी धरणाच्या पाणी साठ्यात होतेय मोठी वाढ  #दिव्य महाराष्ट्र - : प्रखर उन्हाळ्यात दुष्काळामुळे तहानलेल्या सोलापूर जिल्...
12/06/2024

#उजनी धरणाच्या पाणी साठ्यात होतेय मोठी वाढ

#दिव्य महाराष्ट्र - : प्रखर उन्हाळ्यात दुष्काळामुळे तहानलेल्या सोलापूर जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राचा दमदार पाऊस पडत असल्यामुळे वातावरण बदलले आहे. भीमा खोऱ्यातील पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात पाणीसाठा हळूहळू वाढत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील वरच्या भागातून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग तीन दिवसांत सुमारे आठ हजार क्युसेकवरून निम्म्याने म्हणजे ४८६७ क्युसेकपर्यंत आला आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

गतवर्षी पावसाळ्यात अत्यल्प पावसामुळे उजनी धरण ६०.६६ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा झाला होता. मात्र दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे धरणातील पाणीवाटप नियोजन चुकल्यामुळे गेल्या हिवाळ्यामध्ये जानेवारीतच धरण वजा पातळीवर गेले होते. वजा पातळीतील पाणीसाठा झपाट्याने खालावून तो वजा ६० टक्क्यांपर्यंत गेला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणात दौंडमार्गे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सुमारे आठ हजार क्युसेक विसर्गाने धरणात पाणी मिसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र धरणात मिसळणारा पाण्याचा विसर्ग ४८६७ क्युसेक पर्यंत कमी झाल्यामुळे सोलापूरकरांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा वजा ६० टक्क्यांवरून वजा ५५.८८ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तीन दिवसांत धरणात जवळपास चार टक्के म्हणजे सुमारे दोन टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या धरणात एकूण ३३.७२ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

 #उपमुख्यमंत्री  #देवेंद्र फडवणीस पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार ?
05/06/2024

#उपमुख्यमंत्री #देवेंद्र फडवणीस पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार ?

 #खासदार ओमराजे निंबाळकर यांना कोणत्या  #तालुक्यातून  किती मतांचा लीड मिळाला
05/06/2024

#खासदार ओमराजे निंबाळकर यांना कोणत्या
#तालुक्यातून किती मतांचा लीड मिळाला

27/05/2024
 #पुणे अपघात प्रकरणी मोठी कारवाई
24/05/2024

#पुणे अपघात प्रकरणी मोठी कारवाई

 #आता मोठ्या प्रमाणात बनावट मसाल्याचा सुळसुळाट
24/05/2024

#आता मोठ्या प्रमाणात बनावट मसाल्याचा सुळसुळाट

 #व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्कृष्ट शहराध्यक्ष पुरस्कारासाठी हर्षद लोहार यांची निवड #नाशिक येथे होणार सन्मानबार्शी : दि २५ म...
24/05/2024

#व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्कृष्ट शहराध्यक्ष पुरस्कारासाठी हर्षद लोहार यांची निवड

#नाशिक येथे होणार सन्मान

बार्शी : दि २५ मे २०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन नाशिक येथे संपन्न होत आहे.

दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होत असून. व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदीप काळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ व प्राचार्य श्रीकांत सोनवणे हे प्रमुख अतिथी असतील.

या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांना पुरस्कार व राज्यातील व्हाईस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व विभाग प्रमुख आदींनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनाही पुरस्कार देण्यात येणार आहेत.

यामध्ये व्हाईस ऑफ मीडियाचे बार्शी शहराध्यक्ष हर्षद लोहार यांना पश्चिम महाराष्ट्र विभाग उत्कृष्ट शहराध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.बार्शी शहराध्यक्ष म्हणून आजपर्यंत व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
,पत्रकारांची रक्त तपासणी शिबीर,पत्रकार व त्यांच्या संपुर्ण कुटुंबासाठी भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन, युवकांनी भविष्यात पत्रकारितेत करियर करावं म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविले आहेत.

लोहार यांच्या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका पदाधिकारी व सदस्यांनी तसेच साप्ताहिक,दैनिक व डिजिटल माध्यमातील सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले.

 #महिलेचा विनयभंग आरोपीचा जामिन नामंजूर  #बार्शी  - वैराग पोलीस ठाणे येथे दिनांक ७ मे २०२४ रोजी आरोपी नितीन बिभीषण संकपा...
17/05/2024

#महिलेचा विनयभंग आरोपीचा जामिन नामंजूर

#बार्शी - वैराग पोलीस ठाणे येथे दिनांक ७ मे २०२४ रोजी आरोपी नितीन बिभीषण संकपाळ रा. झरेगाव याचेवर पीडित महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण व धमकी दिल्याने भा.दं.वि. कलम-३५४, ४५२, ३२४, ५०४ व ५०६ नुसार पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपीस पोलिसांनी अटक केली.

आरोपी नितीन बिभीषण संकपाळ याने वकिला मार्फत बार्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात जामिन अर्ज दाखल केला होता.

सदरील जामिन अर्जाच्या सुनावनी दरम्यान पीडित महिलेने तिचे वकिला मार्फत लेखी म्हणणे व आरोपी विरूद्ध असलेले गुन्ह्यांची कागदपत्रे न्यायालयात दाखल करून आरोपीच्या जामिन अर्जास हरकत घेतली. सदरचा लेखी युक्तिवाद व सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एच यू यू पाटील यांनी आरोपी नितीन बिभीषण संकपाळ याचा जामिन अर्ज नामंजूर केला. याकामी फिर्यादी पीडित महिलेच्या वतीने ॲड. समाधान सुरवसे व ॲड. सुहास कांबळे यांनी काम पाहिले तसेच सरकारी वकिल ॲड. प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.

 #बार्शीची नात ठरली 'लिटल मिस इंडिया २०२४' ची मानकरी #बार्शी - मॉडलिंग विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संदीप धर्म...
15/05/2024

#बार्शीची नात ठरली 'लिटल मिस इंडिया २०२४' ची मानकरी

#बार्शी - मॉडलिंग विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संदीप धर्मा रनवे हाऊस आयोजित 'लिटल मिस इंडिया २०२४' या स्पर्धेमध्ये अनिका दर्शन सोमाणी (वय ५ वर्षे) हिने द्वितीय क्रमांक मिळवून व्यावसायिक मॉडलिंग विश्वात आपले नाव कोरले आहे. अनिका ही बार्शीकन्या सीए शिल्पा सोमाणी यांची कन्या तर बार्शीतील सीए श्री. बी.पी. जाजू यांची नात आहे.

पुणे येथील फिनिक्स मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत देशभरातून २१० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील केवळ २२ स्पर्धक हे अंतिम फेरीपर्यंत पोचू शकले. त्यामध्ये अनिका ही द्वितीय विजेती ठरली.

लहान मुलांसाठी भारतातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धा, 'लिटिल मिस इंडिया' चे आयोजन करणारी 'संदीप धर्मा रनवे हाऊस' ही भारतातील अग्रगण्य मॉडेलिंग एजन्सी आहे. या संस्थेकडून 'लिटल मिस इंडिया' या लहान मुलांच्या सौन्दर्य स्पर्धेची सन २०१८ पासून सुरुवात करण्यात आली आहे.

अनिकाने मिळविलेल्या या यशामुळे बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशासाठी सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

 #आज अक्षय्य तृतिया निमित्त श्रीमंत दगडूशेठ बाप्पा चे सुंदर विलोभनीय रूप #बाप्पाच्या मूर्ती सह मंदिरास करण्यात आली आंब्य...
10/05/2024

#आज अक्षय्य तृतिया निमित्त श्रीमंत दगडूशेठ बाप्पा चे सुंदर विलोभनीय रूप

#बाप्पाच्या मूर्ती सह मंदिरास करण्यात आली आंब्याची आरास

08/05/2024

246 बार्शी विधानसभा मतदार संघ

स्त्री मतदार :- 154734
पुरुष मतदार :- 166497
तृतीयपंथी मतदार :- 39
----------------------------------
एकूण मतदार :- 3,21,270

दिनांक 07/05/2024 रोजी झालेले एकूण मतदान

स्त्री मतदार :- 97540
पुरुष मतदार :- 112202
तृतीयपंथी मतदार :- 11
---------------------------------
एकूण मतदार :- 209753
टक्केवारी :- 65.29

07/05/2024

बार्शी विधानसभा मतदारसंघ 246

सकाळी 7 ते 3 या कालावधीत झालेले मतदान
स्त्री मतदार :- 66040
पुरुष मतदार :- 78019
तृतीयपंथी मतदार :- 3
---------------------------------
एकूण मतदार :- 144062
टक्केवारी :- 45.58

05/05/2024

धाराशिव लोकसभा निवडणुकीत
कोणाचा विजय होईल?
धनशक्ती का जनशक्ती बिनधास्त व्यक्त व्हा

04/05/2024

#कोण करतोय मराठा आरक्षणाला विरोध #मराठा आरक्षण विषयी काय म्हणाले #खासदार ओमराजे निंबाळकर

 #बार्शीत पेटल्या असंख्य मशालीबार्शी -: धाराशिव लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बार्शी शहर काँग्रेस पक...
04/05/2024

#बार्शीत पेटल्या असंख्य मशाली

बार्शी -: धाराशिव लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बार्शी शहर काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी यांच्या वतीने शहरात विशाल अशी मशाल प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत असंख्य महिला हातात मशाली घेऊन सहभागी झाल्या होत्या

या रॅलीची सुरूवात माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले माजी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले ,काँग्रेसचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली
काँग्रेस शहराध्यक्ष विजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष निखिल मस्के सरचिटणीस अजित कांबळे महिला तालुकाध्यक्ष रंजना साळुंखे शहराध्यक्ष सोनाली जगझाप,विष्णू अस्वदे, आदी महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

02/05/2024

#खा.ओमराजे निंबाळकर यांची वैराग मध्ये झाली जंगी सभा

#माजी मंत्री दिलीप सोपल यांनी ओमराजे यांना दिली नवीन पदवी

https://www.facebook.com/share/v/MmdBtv4CPpwN4HSs/?mibextid=jmPrMh

01/05/2024

#चुकीच्या पद्धतीने भाषण व्हायरल करणाऱ्यांना #आमदार राजेंद्र राऊत यांची तंबी

#काही लोकांनी निच पणाचा कळस गाठला #आमदार राजेंद्र राऊत

 #आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे या ठिकाणी श्री गणेश मूर्तीस अत्यंत सुंदर अशी महापूजा करण्य...
27/04/2024

#आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे या ठिकाणी श्री गणेश मूर्तीस अत्यंत सुंदर अशी महापूजा करण्यात आली

🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃
चंद्रोदय वेळ : १०. ०६ मि.



Ganesh city

25/04/2024

#निधी खेचून आणण्यासाठी मनगटात नेट लागते #सभापती रणवीर राऊत

#बार्शी -: धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शी तालुक्यातील उंबरगे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत बोलताना रणवीर राऊत म्हणाले आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील विकास कामांसाठी जिवाचे रान करून वेगवेगळ्या योजनेसाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये निधी आणला तालुक्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळेच हे शक्य झाले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणाऱ्याच्या मनगटात देखील नेट लागते तेव्हा कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो भविष्यातही जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत प्रयत्न करणार आहे केंद्र सरकारच्या विविध योजना व त्यासाठी लागणारा निधी मिळवायचा असेल तर तालुक्यातील जनतेने धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उभे असलेल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना बहुमताने विजयी करावे लागले असे आवाहन देखील रणवीर राऊत यांनी यावेळी मतदारांना केले

#लोकसभा2024 election
politic #अजित दादा पवार #धाराशिव #मराठवाडा #राष्ट्रवादी #अर्चनाताई पाटील #उस्मानाबाद लोकसभा Patil #राणाजगजितसिंह पाटील Patil #रणवीर राऊत

15/04/2024

#आई तुळजाभवानी मंदिर विकासाबद्दल ठाकरे सरकार विषयी #आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे गंभीर व्यक्तव्य

#बार्शी -: धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यात बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकार विषयी तुळजाभवानी मंदिर विकासाबद्दल केले गंभीर व्यक्तव्य

Patil #अर्चना पाटील #लोकसभा2024 election
politic #धाराशिव

14/04/2024

#आता बार्शीत शिवसेनेची भूमिका काय?

#लोकसभा निवडणुकीत आता बार्शी शिवसेनेची भूमिका काय? हे स्पष्ट करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख #लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पत्रकार परिषद

10/04/2024

#आता यापेक्षा जास्त मी काय कमवू तुम्ही सांगा #खासदार ओमराजे निंबाळकर

#खासदार ओमराजे निंबाळकर #लोकसभा निवडणूक #धाराशिव लोकसभा निवडणूक
update election nimbalkar of member video

24/03/2024

#मी कोणत्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

#कोणतही कसलही काम सांगा करतो - राजेंद्र मिरगणे

#राजेंद्र मिरगणे यांचे कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

#दिव्य महाराष्ट्र बार्शी -: राजेंद्र मिरगणे यांची महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली त्यामुळे मिरगणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे
त्याची नियुक्ती झाल्यानंतर राजेंद्र मिरगणे यांचे बार्शीत आगमन होताच त्यांचे कार्यकर्त्याने मोठ्या उत्साहात जंगी स्वागत केले

यावेळी राजेंद्र मिरगणे यांनी मी राजकारणात असो वा नसो परंतु माझ्या कार्यकर्त्यांना मी कधीच वार्‍यावर सोडणार नाही आणि आता तर मला पद मिळाले असल्या कारणामुळे जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील कोणतेही काम माझ्याकडे घेऊन आल्यास मी ते करेल असे आश्वासन यावेळी बोलताना राजेंद्र मिरगणे यांनी दिले

मिरगणे यांच्या या नियुक्तीमुळे येणाऱ्या काळात बार्शी शहर व राज्यामध्ये गृहनिर्माण विभागात मोठ्या प्रमाणात कामे होणार असून मिरगणे यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव या विकास कामांत मोठा उपयोगी पडणार आहे मिरगणे यांच्या निवडीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 #पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांचा सहभाग #व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शाखेचा उपक्रम  #बार्शी : येथील व्हॉ...
16/03/2024

#पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांचा सहभाग
#व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शाखेचा उपक्रम

#बार्शी : येथील व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर शाखेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंभर जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शनिवार दिनांक १६ रोजी श्री वर्धमान जैन स्थानक,सोमवार पेठ,बार्शी येथे हे शिबीर संपन्न झाले.

या आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकारांची नेत्र तपासणी, रक्ताच्या तपासणी यात हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल प्रोफाइल, लिव्हर प्रोफाइल, थायरोइड , किडनी, व डायबेटीसच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच ई.सी.जी. व ब्लड प्रेशर, इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.

व्हॉईस ऑफ मीडिया चे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव गणेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, शहर अध्यक्ष हर्षद लोहार, सचिव जमीर कुरेशी, उपाध्यक्ष विजय शिंगाडे, खजिनदार प्रवीण पावले, मयूर थोरात, अस्लम काझी, आदी उपस्थित होते.

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.शीतल बोपलकर, आनंद ऋषिजी नेत्रालय,नगरचे डॉ.भाऊसाहेब आदमाणे, महालॅबचे पंडित कागणे, युसुफ जमादार, श्री वर्धमान जैन स्थानकचे अध्यक्ष जयचंद सुराणा, दैनिक, साप्ताहिक, डिजिटल माध्यमातील पत्रकार संघटना, आदींचे सहकार्य लाभले.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्लिकार्जुन धारूरकर, प्रदीप माळी, समाधान चव्हाण, शाम थोरात, निलेश झिंगाडे, ओंकार गायकवाड, सागर गरड, राहुल भालशंकर यांनी परिश्रम घेतले.

 #आपल्या घरांवर रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा  #केंद्र सरकारच्या या अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनदिव्य महा...
11/03/2024

#आपल्या घरांवर रूफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा

#केंद्र सरकारच्या या अनुदानाचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

दिव्य महाराष्ट्र :- आपल्या घराच्यावर रूफ टॉप सोलर सिस्टिम बसवून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळविण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांनी केले आहे.

श्री. पावडे म्हणाले, वीज ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याची सूचना मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे.

रूफ टॉप सोलर सिस्टिमसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकाला एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक ७८ हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे.

महाराष्ट्रात वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा.

एक किलोवॅट क्षमतेच्या रूफ टॉप सोलर सिस्टिममधून दररोज सुमारे चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना दीडशे युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम पुरेशी आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट वीज वापर असणाऱ्या कुटुंबासाठी दोन ते तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम पुरेशी ठरते.

घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

25/02/2024

प्रा.सुरेश बिराजदार प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

#बार्शी #धाराशिव #उद्योजक #राष्ट्रवादी #लोकसभा निवडणूक

Address

Barshi 413401
Barshi
BARSHI

Telephone

+919028432609

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिव्य महाराष्ट्र Divya Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दिव्य महाराष्ट्र Divya Maharashtra:

Videos

Share