08/10/2023
|| ॐ जनार्दनाय नमः ॥
प.पू. बाबाजींची ही विधी म्हणजे (अमृतकुंभ) श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनास ज्याप्रमाणे *'सर्वोनिषधोगावो दोग्धा गोपालनंदना'*
गितामृत पाजले. तद्वतच ही विधी कृपामृत म्हणून सद्गुरुकडून वरदान लाभलेले आहे.
गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, वेद, उपनिषदे, शास्त्रपुराण यातील
तंतोतंत मंत्र असल्याकारणाने वेगळे यास नवीन म्हणता आले नाही, तरी मात्र अनेक पक्वान्न व नाविण्याचे सर्व साधन, पदार्थ समोर असताना त्यातून योग्य तो पदार्थ उपयोगात घेवून श्री बाबाजींनी सर्वांना सकस व रुचेल असे गोड वेगळे पक्वान्न बनविले.
पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यापासून तर झोपेपर्यंत सर्वच मंत्रांची
सुत्रबध्द मांडणी केलेली आहे. लहान थोरांनी दररोज नित्यनेमाने पहाटे ५ वा पवित्र होवून श्रवण, मनन व पठण करून श्री बाबाजींच्या पंगतीला बसण्याचा संकल्प करावा.
*"ज्याच्या मुखी विधी जाण । तोची खरा पुण्यवान ॥"*
अनेक प्रकारच्या साधनांपेक्षा सोपे, सुलभ व अल्प असे हे विधी
नियमाचे साधन अंगी पैलतिरास जाण्याचा योग मिळवावा. ही हृदयी
बाणून असलेल्या भगवान शिवास प्रार्थना आहे.
सद्गुरुंच्याच मुखातील ब्रह्मवाक्य आहे.
*"जो माझ्या नेमा, पडेल मी त्याच्या कामा!"*
जय बाबाजी ! जय बाणेश्वर !!
।। ॐ जनार्दनाय नमः ॥
*विधी ऐकण्या साठी :* खालील लिंक ला भेट द्या
श्री श्री १००८ स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून(श्री) प. पु. बाबाजींच्या स्वमुखातून म्हणून त्या ज्.....