dalimb_shetkari

dalimb_shetkari डाळिंब उत्पादक शेतकरी माहिती चर्चा

25/02/2024

✌️ डाळिंब बागायतदार ✌️

#डाळिंब #शेतकरी

30/07/2023

✌️ डाळिंब बागायतदार ✌️

#डाळिंब #बागायतदार #शेतकरी

27/02/2023
28/10/2022

✌️ डाळिंब बागायतदार ✌️ #डाळिंब #बागायतदार #शेतकरी

27/10/2022

✌️ डाळिंब बागायतदार ✌️
#डाळिंब #बागायतदार #शेतकरी

24/10/2022

सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंब शेतकरी ग्रुप कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔

05/10/2022

✌️ डाळींब बागायतदार ✌️
#डाळिंब #बागायतदार #शेतकरी #डाळींब

28/09/2022

✌️डाळिंब बागायतदार ✌️

*.. अनार मे आने वाली स्कोर्चिंग क्या है ..*दोस्तों, आज के इस भाग में हम अनार में स्कोर्चिंग के बारे में जानकारी देखेंगे,...
27/09/2022

*.. अनार मे आने वाली स्कोर्चिंग क्या है ..*

दोस्तों, आज के इस भाग में हम अनार में स्कोर्चिंग के बारे में जानकारी देखेंगे,

अनार के विभिन्न भागों पर अजैविक तनाव के कारण कुछ रासायनिक और भौतिक बदल होते है, जिनके कारण कुछ लक्षण दिखाई देते है उसे स्कोर्चिंग कहते है।
लेकिन आज हम उन लक्षणों के बारे में संक्षिप्त जानकारी देखने जा रहे हैं जो हमारी आंखों को पत्तियों, फूलों और फलों पर दिखाई देते हैं।

*स्कोर्चिंग कई कारणों से हो सकती है -*
- स्प्रे पानी का पीएच, ईसी (टीडीएस) अनुचित
- स्प्रे दवाओं की असंगति (Incompatibility)
- फसल की अवस्था पर विचार किए बिना किसी दवा का छिड़काव करना।
- उच्च तापमान पर छिड़काव।
- दवा को पानी में मिलाकर देर तक स्प्रे न करना।
- खरपतवारनाशक और पौधोंपर छिड़काव के लिए एक ही स्प्रे पंप का उपयोग।
- दवा का द्रावण बनाते वक्त पंप, टैंक को ठीक से साफ न करना।
- स्प्रे के बुंदों का बडा आकार।
- खरपतवारनाशक का छिड़काव करते समय अनार के पेड़ पर दवा गिरने का ध्यान न रखना।

दोस्तो,
अक्सर ऐसा होता है कि हम अनार के फल के परिपक्व होने तक अनार के बाग की देखभाल करते हैं लेकिन कुछ ज्ञान की कमी के कारण हम दवा का गलत छिड़काव करते हैं, और स्कोर्चिंग के कारण (फलों, फूलों, पत्तियों पर भूरा-काला धब्बा) बाग को नुकसान पहुंचाता है और हमे उचित बाजार मूल्य नहीं मिलता है।

*स्कोर्चिंग से बचने के लिए निम्न बातों का ध्यान रखें।*

- छिड़काव से पहले स्प्रे पानी का पीएच, ईसी जांचें। दवा को पानी के साथ मिलाने से पहले, पानी का पीएच 7 (साइट्रिक एसिड का उपयोग करके) समायोजित किया जाना चाहिए। छिड़काव के लिए जादा ईसी के पानी का उपयोग करने के बाद स्कोर्चिंग की संभावना अधिक होती है।
- छिड़काव करते समय दो दवाओं की अनुकूलता जांचनी चाहिए। इसका छिड़काव तभी करना चाहिए जब दो या दो से अधिक दवाएं एक-दूसरे के लिए अनुकूल (Compatible) हों।
- तेज धूप में स्प्रे न करें।
- एक ही समूह के कीटनाशकों का लगातार उपयोग नहीं किया जाना चाहिए।
- अनार में बताई गई दवाओं का ही प्रयोग करना चाहिए।
- सिफारिश के अनुसार दवा की मात्रा लें।
- अनार के बगीचे की स्थिति और दवा के छिड़काव को ध्यान में रखते हुए छिड़काव करना चाहिए।
- स्प्रे के बुंदो का साइज 250 माइक्रोन होना चाहिए, ताकि स्प्रे अच्छा हों और दवा एक जगह न गिरे।
- अनार के बगीचे में छिड़काव और खरपतवारनाशक का स्प्रे के लिए पंप अलग-अलग होने चाहिए।

07/07/2021

*फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का ?*

पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने इतर हंगामांपेक्षा जास्त असतो. त्यात झडीचा व संततधार पाऊस रोगांचे नियंत्रण ठेवणे अवघड बनवतो.बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनर्फवारणी विषयी संभ्रम निर्माण होतो.

फवारणी

पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते :
फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला ?
फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो. रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. अशावेळी पुनर्फवारणीची करू नये.

कोणत्या रसायनाची फवारणी केली ?
ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा.

पावसाची तीव्रता व वेग :
फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते.
फवारणीनंतर एक तासाने १५-२० मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते.
थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल व फवारणीनंतर १५-२० मिनिटे पाऊस चालला तर ९५% फवारा धुवून जातो. अशावेळी हवामानाचा अंदाज बघून २-३ तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी :
हवामानाचा अंदाज बघून पाऊस येण्याआधी फवारणी टाळावी.
फळबागांवर पावसाळ्यात ३ दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक असते.
किटकनाशकापेक्षा बुरशीनाशकांचा अधिक वापर करावा.
पावसानंतर लगेच फवारणी टाळावी.कारण तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते. परिणामी वाया जाते व जमिनीत झिरपल्याने मित्रजिवाणू मारले जातात. त्याचबरोबर विहिरीत मिसळण्याचा धोकाही असतोच.
पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर, इमल्शन (चिकट द्रावण) चा उपयोग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
पावसाळ्यात कुमान एल बुरशीनाशक म्हणून फायद्याचे ठरते.

#शेतकरी #डाळिंब

*सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना* आम्ही आपनास अती महत्त्वाची माहिती देत आहोत कॄपया सर्वांनी वेळ काढून वाचुन तेल्य...
04/07/2021

*सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना*

आम्ही आपनास अती महत्त्वाची माहिती देत आहोत कॄपया सर्वांनी वेळ काढून वाचुन तेल्या रोगाचे नियंत्रण करावे.

सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सध्या पावसाचे/ढगाळ वातावरण असल्याने तेल्या रोग बागेत झपाट्याने वाढत आहे अशा परीस्थितीत बरेचशे शेतकरी बांधव स्ट्रेप्टोसायक्लीन आणि ब्रोनोपोल या दोन्ही जिवाणूनाशकांच्या फवारण्या ह्या वरील दोन्ही औषधांमधील घटकांची टक्केवारी आणि प्रती लिटर त्यांचे प्रमाण या दोन्ही मध्ये मोठा भ्रम आणि तफावत निर्माण झाली आहे याचे कारण असे की शेतकरी बांधवांना अजुनही माहीत नाही की कोनत्या जिवाणूनाशकात त्याच्या घटकातील टक्केवारीनुसार त्याचे प्रमाण प्रती लिटर कीती ग्रॅम घ्यायला पाहिजे.

यामुळे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे की औषधातील घटकांच्या टक्केवारी नुसार त्याचे प्रमाण प्रती लिटर कीती ग्रॅम घ्यायला पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांचे नुकसान, खर्च, वेळ आणि मेहनत वाया जाणार नाही.

1.स्ट्रेप्टोसायक्लीन यामध्ये
*स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आय पी.90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड आय पी. 10% एकुण =100%* हा घटक असेल तर याचे प्रमाण 0.5 ग्रॅम प्रती लीटर आहे.
5 ग्रॅम प्रती 10 लीटर आहे.
50 ग्रॅम प्रती 100 लीटर आहे.

2.स्ट्रेप्टोसायक्लीन ज्यामध्ये
*स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट आय पी.9% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड आय पी. 1% एकुण =10%* हा घटक असेल तर याचे प्रमाण 5 ग्रॅम प्रती लीटर आहे.
50 ग्रॅम प्रती 10 लीटर आहे.
500 ग्रॅम प्रती 100 लीटर आहे.

3. बॅकट्रोनाॅल-100 यामध्ये *(95% 2-ब्रोमो-2-नाईट्रोप्रोपेन-1.3 डायोल) म्हणजे ब्रोनोपोल 95%* हा घटक आहे याचे प्रमाण 0.5 ग्रॅम प्रती लीटर आहे.
5 ग्रॅम प्रती 10 लीटर आहे.
50 ग्रॅम प्रती 100 लीटर आहे.

4. ज्यामध्ये *( 2-ब्रोमो-2-नाईट्रोप्रोपेन-1.3 डायोल 27%) ब्रोनोपोल 27%* हा घटक आहे याचे प्रमाण 1.8 ग्रॅम प्रती लीटर आहे.
18 ग्रॅम प्रती 10 लीटर आहे.
180 ग्रॅम प्रती 100 लीटर आहे.

5. बॅक्ट्रीनाशक यामध्ये *(2-ब्रोमो-2-नाईट्रोप्रोपेन-1.3 डायोल) म्हणजे ब्रोनोपोल* हा घटक आहे याचे प्रमाण 0.8 ते 1.0 ग्रॅम प्रती लीटर आहे.
8 ते 10 ग्रॅम प्रती 10 लीटर आहे.
80 ते 100 ग्रॅम प्रती 100 लीटर आहे.

वरील डोस प्रमाणे जिवाणूनाशकांच्या फवारण्या कराव्यात.

बागेत अचानक तेल्या रोग आल्यास खालील फवारण्या 5 दिवसाच्या अंतराने कराव्यात. पण प्रत्येक फवारणी अगोदर तेलकट रोगाची फळे तोडुन जमिनीत खड्ड्यात टाकून मातीने बुजूनच किंवा फळे जाळुनच फवारणी करावी.

*पहिली फवारणी* : काॅपर हायड्राॅक्साइड 53.7% @2 ग्रॅम /ली. + स्ट्रेप्टोसायक्लीन 100% @ 0.5 ग्रॅम /ली.+ ब्रोनोपोल (95 -98%) 0.5 ग्रॅम /ली.+ स्प्रेडर / स्टिकर 0.5 मिली / लि.

*दूसरी फवारणी* : कार्बेन्डाझिम 50% @ 1 ग्रॅम /ली. + स्ट्रेप्टोसायक्लीन 100% @ 0.5 ग्रॅम /ली.+ ब्रोनोपोल (95-98%) 0.5 ग्रॅम /ली.+ स्प्रेडर / स्टिकर 0.5 मिली/ लि.

या फवारण्या झाल्यावर तेल्या रोग आटोक्यात येईल त्यानंतर वेगवेगळ्या बुरशीनाशकासोबत एकवेळ स्ट्रेप्टोसायक्लीन दुसऱ्यावेळी ब्रोनोपोल आणि तिसऱ्यावेळी काॅपरचा घटक असलेले कोणतेही एक बुरशीनाशक आलटून पालटून महिन्यात एक आठवड्याच्या अंतराने फवारण्या कराव्यात. आणि त्यानंतर
ICAR-NRCP IDIPM शेडुल प्रमाणे पानगळ केल्यापासून ते तुमच्या बागेतील फळें कीती दिवस वयाची आहेत तेथुन त्या नुसार फवारण्या कराव्यात.

याच बरोबर *सॅलिसीलीक एसिड 98%* शुध्दतेचे 0.3 ग्रॅम प्रती लिटर आणि *मायक्रोन्युट्रेंट मिक्सचर* 2.5 ग्रॅम प्रती लिटर हे दोन्हीही 7 दिवसाचे अंतर ठेवून आलटून पालटून 4 फवारण्या पानांच्या चौकी अवस्थेपासून ते फळे मोठी होईपर्यंत 1 महिन्याच्या अंतराने 4 वेळा आवश्य कराव्यात.

*टिप*
पावसाळ्यात नेहमी फवारण्या करतांना एक गोष्ट लक्षात घ्यावी की, फवारणी झाल्यानंतर कमीतकमी 10-12 तास पाऊस पडणार नाही या अंदाजानेच फवारणी करावी. फवारणी केल्यानंतर 10 तासांच्या आत पाऊस पडल्यास फवारणीचा जास्त काही उपयोग होत नाही. तसेच याकाळात स्प्रेडर/स्टिकर बोर्डोची फवारणी वगळता सर्व फवारण्यात वापरावे यामुळे औषधांचे द्रावण पानांवर पसरण्यास आणि चिटकण्यास मदत होते आणि औषधे फवारणीचा चांगला परिणाम मिळतो.

#डाळिंब

डाळिंब शेती योग्य व्यवस्थापन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे या ग्रुप वर तुम्हाला डेली डाळिंब विषयक माहि...
29/06/2021

डाळिंब शेती योग्य व्यवस्थापन माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे या ग्रुप वर तुम्हाला डेली डाळिंब विषयक माहिती व समस्येचे निरसन केले जाईल. ग्रुप ला जॉईन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/KaLCkRyLmjK8UFxftFB0D1

Address

Paithan
Aurangabad
431107

Telephone

+919657060090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when dalimb_shetkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to dalimb_shetkari:

Videos

Share

Category



You may also like