22/02/2020
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचग दर्शनासाठी भाविकांची गर्दी
रात्री १२ वाजतापासून मंदिर भाविकांसाठी खुलं
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा महासागर उसळलाय. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलीये.
व्हीओ : अंबरनाथचं शिवमंदिर हे तब्बल ९६० वर्ष जुनं असून हे हेमांडपंथी मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना मानलं जातं. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीतही या मंदिराचा समावेश आहे. त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामुळेच महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी इथे ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. रात्री १२ वाजता मंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने पूजा केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं, मात्र यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आलेला नाहीये. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराचा परिसरही सजवण्यात आलाय. महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी अंबरनाथ शहरात ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जत्राही भरते. त्यासाठीही लाखो लोक अंबरनाथला येत असतात.
Website link : http://vruttabharari.in/
Follow On page : https://www.facebook.com/vruttabharar...
Follow On Instagram :https://www.instagram.com/vruttabharari/
Credits :
background songs :https://www.youtube.com/watch?v=VbzRRLc3Bjc