Fridayfilms Production

Fridayfilms Production Fridayfilms Production - Production House
(2)

14/11/2024

बालपण म्हणजे गोड आठवणी..
त्या आठवणी जपायच्या असतात, जगायच्या असतात !

आज बालदिनाच्या निमित्ताने आमची एक गोड कलाकृती खास तुमच्यासाठी पहिल्यांदा थेट फेसबुक वर प्रदर्शित करीत आहोत..'लाडू'
आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धांमधून गाजलेली, दिग्गज परीक्षकांनी गौरवलेली आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याची, लाडकी आणि अप्रतिम कलाकृती...
नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा !

✌️Thank you so much 🌼 .raja_officialfor this beautiful momento and kind gesture.Means a lot !  Thankyuuuuuu team  🩵
10/11/2024

✌️

Thank you so much 🌼 .raja_official
for this beautiful momento and kind gesture.
Means a lot !




Thankyuuuuuu team 🩵

06/11/2024

" Holidays in Alibag " 🏝️

Starting from 8th November.

Please subscribe & Stay tuned with us :
https://www.youtube.com/

उठा उठा.. दिवाळी आली 🤩आमच्या सर्व कलाकार व तंत्रज्ञ मित्र मैत्रिणींना, मायबाप रसिक प्रेक्षकांना ही दिवाळी आनंदाची, समृद्...
29/10/2024

उठा उठा.. दिवाळी आली 🤩

आमच्या सर्व कलाकार व तंत्रज्ञ मित्र मैत्रिणींना, मायबाप रसिक प्रेक्षकांना ही दिवाळी आनंदाची, समृद्धीची आणि लखलखत्या दिव्यांसारखी जावो !

🌟 दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !! 🌟

🤩Gorgeous, Talented & Renowned Theatre, Tv & Screen Actress  is going to be the anchor of this show.  🏝️Shortly on our Y...
18/10/2024

🤩

Gorgeous, Talented & Renowned Theatre, Tv & Screen Actress is going to be the anchor of this show.

🏝️

Shortly on our YouTube channel, stay tuned.

 अलिबाग आणि आजुबाजूच्या गावात तुमचं cattage, Homestay किंवा Resort आहे का? जर आहे, तर मग,ही Special Series तुमच्यासाठीच ...
16/10/2024



अलिबाग आणि आजुबाजूच्या गावात तुमचं cattage, Homestay किंवा Resort आहे का? जर आहे, तर मग,

ही Special Series तुमच्यासाठीच आहे !

फ्रायडेफिल्म्स निर्मित
"Holidays in ALIBAG" 🏝️

पर्यटकांना अलिबागमध्ये राहण्यासाठी निवडक आणि सर्वोत्तम ठिकाणांची मालिका, लवकरच आपल्या YouTube Channel वर..

Channel link in bio, please check and subscribe.

आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहचण्यासाठी आजचं या विशेष मालिकेचा भाग व्हा !!

Let's Experience the Gate Way of Konkan.."Alibag" 🏝️मिनी गोवा वगैरे नाही, आमचं अलिबाग.. अलिबाग आहे !पर्यटनाच्या बाबतीत भ...
12/10/2024

Let's Experience the Gate Way of Konkan.."Alibag" 🏝️

मिनी गोवा वगैरे नाही, आमचं अलिबाग.. अलिबाग आहे !
पर्यटनाच्या बाबतीत भारतातल्या पहिल्या दहा मधे येणारं, सर्वात लोकप्रिय पर्यटन क्षेत्र म्हणून आज अलिबागची ओळख आहे.
इथली खाद्यसंस्कृती, इथला निसर्ग, या भूमीला लाभलेला इतिहास यासोबतच इथलं आदरातिथ्य सुद्धा पर्यटकांना पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठी भाग पाडतं.
याच कारणांमुळे अलिबाग आणि आजुबाजुला असलेल्या गावांमधून लहान मोठे असे अनेक stay options निर्माण झाले आहेत.. या सर्वांना creatively showcase करण्यासाठी आणि पर्यटकांना उत्तम stay options देण्यासाठी आम्ही ही खास मालिका घेऊन येत आहोत !!

Extremely happy to announce our next series,
Named.. " Holidays in Alibag " | " हॉलिडेज इन अलिबाग " 🤩
for Cottages | Homestays | Resorts

लवकरच येत आहोत..
fridayflims production या youtube channel वर !!!

नेहमीप्रमाणेच तुमचं प्रेम आणि support अपेक्षित आहे. ❤️

टीप : अलिबाग मधील ज्या कॉटेजेस, होमस्टेज आणि रिसॉर्ट्स धारकांना आमच्या या सिरीज मधे सहभागी व्हायचं असेल, अथवा याबद्दल कोणतीही माहिती हवी असेल त्यांनी कृपया आमच्या फेसबूक अथवा इंस्टाग्राम पेज वर मेसेज करावा.



नवरात्र विशेष या मालिकेच्या शेवटच्या अर्थात नवव्या माळेला आम्ही पुन्हा एकदा येऊन पोहोचलोय हिगलाज मातेच्या डोंगरावर..दिवस...
11/10/2024

नवरात्र विशेष या मालिकेच्या शेवटच्या अर्थात नवव्या माळेला आम्ही पुन्हा एकदा येऊन पोहोचलोय हिगलाज मातेच्या डोंगरावर..

दिवस नववा : देवी अन्नपूर्णा l देवी आशापुरा🌻

सुबक ठेंगण्या या प्राचीन मंदिरात वाकून जाण्याचा एक वेगळा अनुभव मिळतो. मातेची सुंदरशी मुर्ती डोळ्यात साठवून घ्यवीशी वाटते. मंदिरा शेजारी लेण्याही आहेत, पुरातन आणि प्राचीन अश्या या मंदिरात येऊन एक वेगळंच समाधान मिळतं जे प्रत्यक्ष येऊन तुम्हीही नक्की अनुभवा !

व्हिडियो साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DA95uDqquZL/?igsh=MWR0eXFzamhjbnd5ZQ==

या special series ला तुम्ही जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात, त्यासाठी खरचं खूप खूप मनापासून आभार.
लवकरच नवीन काहीतरी घेऊन तुमच्या भेटायला नक्कीच येऊ !!

धन्यवाद !!!

रौद्र रूपात असलेल्या महाकाली देवीची मंदिरात प्रतीष्ठापना केली आणि ती शांत झाली अशी अख्याईका या देवीबद्दल सांगितली जाते.द...
10/10/2024

रौद्र रूपात असलेल्या महाकाली देवीची मंदिरात प्रतीष्ठापना केली आणि ती शांत झाली अशी अख्याईका या देवीबद्दल सांगितली जाते.

दिवस आठवा : देवी महाकाली 🌹

मालिकेच्या आठव्या दिवशी आपण दर्शन घेणारं आहोत देवी महाकालीचे. नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला मंदिराचा परीसर अगदी ऐसपैस आहे, आत महाकाली अवतारातली विशेष मुर्ती आहे. मंदिराबाहेरची सुंदर पोखरण येणाऱ्या भाविकांना आपसूकच त्या वातावरणाच्या प्रेमात पाडते.

व्हिडियो साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DA7Vtc9C7wU/?igsh=MTZ3d3R6ZGVrZmlmYQ==

नवरात्रीच्या काही दिवसच आधी या मालिकेचं शूट आम्ही केलं असल्याने बऱ्याच मंदिरांमध्ये डागडुजीची कामं सुरू होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोजक्याच गोष्टी आम्ही चित्रित करू शकलो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अर्थातच या सगळ्या मंदिरांना वेगळीच झळाळी आलेली असते..किंबहुना देवींचे सजलेलं आणि मोहक रूप सुद्धा याच काळात आपल्याला पाहायला मिळते.

#चौल

"One day you will realise that material things mean nothing. All that matters is the well-being of the people you love."...
10/10/2024

"One day you will realise that material things mean nothing. All that matters is the well-being of the people you love."

- Padma Vibhushan Mr. Ratan Naval Tata.

a truly uncommon leader whose immeasurable contributions have shaped not only the Tata Group but also the very fabric of our nation !

Aum Shanti 🌼

निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या माथ्यावर वसलेली आई हिगलाज माता अर्थात हिंगूळजा माता अलिबाग किंवा रायगड नव्हे तर महाराष्ट्र...
09/10/2024

निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या माथ्यावर वसलेली आई हिगलाज माता अर्थात हिंगूळजा माता अलिबाग किंवा रायगड नव्हे तर महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांच श्रध्दास्थान आहे.

दिवस सातवा : हिंगुळजा देवी 🪷

चौल मधल्या कोणत्याही मंदिरापेक्षा हे मंदीर अधिक उंचावर आहे. तिथपर्यंत पोहचताना, तिथल्या आल्हाददायक निसर्गाचा.. आजूबाजूच्या हिरवळीचा आनंद घेत पायऱ्या चढत वर पोहचल की तीथल्या निसर्गरम्य वातावरणाने चढवाचा सगळा क्षीण कुठच्याकुठे पळून जातो. मंदिराचं वातावरण, समोरची दिपमाळ, त्रीशूल, तुळशीवृंदावन सगळंच प्रसन्न करणारं आहे. मंदिरात देवीची प्राचीन मुर्ती आहे, जागृत असणारी ही हिगलाज माता नवसाला पावते अशी भावीकांची श्रद्धा आहे.

व्हिडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DA4xFEjCNUa/?igsh=MWk1OG9oaTE0MjE2NA==

आत्तापर्यंतच्या व्हिडीओला येणाऱ्या likes, shares च्या रुपात मिळणाऱ्या आपल्या प्रतिसादावरून आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडतोय हे कळतं, तरीही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही अधिक उत्सुक आहोत !

भाविकांच्या प्रचंड श्रध्देच असं चौल मधलं आणखीन एक जागृत देवस्थान म्हणजे शितला देवी माता मंदिर !दिवस सहावा : शितला देवी 🌺...
08/10/2024

भाविकांच्या प्रचंड श्रध्देच असं चौल मधलं आणखीन एक जागृत देवस्थान म्हणजे शितला देवी माता मंदिर !

दिवस सहावा : शितला देवी 🌺

गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे सुंदर मंदिर उभारलंय. मंदिराबाहेरच स्थानिक विक्रेत्यांकडून देवीच्या ओटीला लागणारं सामान, परीसरातली खास ताजी फुलं, चौलची प्रसिध्द चिक्की नारळीपाक सगळं इथे मिळतं. मंदिरात प्रवेश करताचं कम्मालीच प्रसन्न वाटतं.
गाभाऱ्यातला देवीचा चांदीचा मुखवटा लक्ष वेढून घेतो. प्रदक्षीणा मारताना गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला कौल लावण्याचीही इथे प्रथा आहे. मंदिराबाहेर गुलमादेवी, खोकलूदेवी, खरजूदेवीच्या पाषाण मुर्ती आहेत ज्याला गुळ, आलं आणि खजूर असा नैवद्य दाखवला जातो. नवरीत्रोत्सव आणि गोपीळकाला हे सण इथे विशेष साजरे केले जातात याशीवाय वर्षभर इथे येणाऱ्या भावीकांची गर्दी दिसून येते !

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DA2MiV9CXCo/?igsh=Mm54YzZ3anAzbmJr

पाचव्या माळेला आम्ही तुम्हाला घेऊन आलोय चौलमधलं एक जागृत देवस्थान म्हणजेच जाखमाता मंदिरामध्ये !दिवस पाचवा : देवी जाखमाता...
07/10/2024

पाचव्या माळेला आम्ही तुम्हाला घेऊन आलोय चौलमधलं एक जागृत देवस्थान म्हणजेच जाखमाता मंदिरामध्ये !

दिवस पाचवा : देवी जाखमाता 🪻

ही देवी स्वयंभू असून, दगडाची प्राचीन आणि रेखिव मुर्ती इथे आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला पुजनीय शिळेचं ही दर्शन घेता येतं. आजूबाजूला असलेल्या नारळीपोफळीच्या बागा आणि त्यामुळे परिसरातलं थंड वातावरण ही या मंदिराची विशेष खासीयत म्हणता येईल.

व्हिडीओ साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DAznEo0Kn3g/?igsh=MWprYmF4ZjF0N2Vudg==

अपेक्षा आहे आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय, आवडत असल्यास आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा किंबहुना आमच्यापर्यंत पोहचवा !!

"नवदुर्गा" या आपल्या नवरात्र उत्सवाच्या विशेष मालिकेतला आजचा चौथा दिवस, आणि आज आपण दर्शन घेणार आहोत गोलबा देवीचं. दिवस च...
06/10/2024

"नवदुर्गा" या आपल्या नवरात्र उत्सवाच्या विशेष मालिकेतला आजचा चौथा दिवस, आणि आज आपण दर्शन घेणार आहोत गोलबा देवीचं.

दिवस चौथा : गोलबादेवी 🍁

या मंदिराची पुर्नबांधणी २०१९ मध्ये झाल्यामुळे मंदिराची वास्तू ही नवीच वाटते. पांढऱ्याशुभ्र वस्त्रातली देवीची मुर्ती पाहीली की मन अगदी प्रसन्न होतं. पुजना साठी इथे मुर्तीसोबतच देवीचा धातूचा मुखवटा आणि काही शिळा सुध्दा पहायला मिळतात.
भक्तिमय वातावराणासोबत चौलमधली शांतता ही या मंदिरात निवांतपणे अनुभवता येत !

पुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.instagram.com/reel/DAxBpEmqIs6/?igsh=MXU3a3hrMmc2Z2xkNQ==

चौल विशेष मालिकेतला आजचा भाग, आजची reel कशी वाटली ते comment नक्की सांगा !!

चौल गावाच्या वेशीवर आलं की सगळ्यात पहिल मंदीर आपल्या नजरेस पडतं, ते म्हणजे कृष्णाई मातेच्या मंदिराची छोटीशी पण लोभस वास्...
05/10/2024

चौल गावाच्या वेशीवर आलं की सगळ्यात पहिल मंदीर आपल्या नजरेस पडतं, ते म्हणजे कृष्णाई मातेच्या मंदिराची छोटीशी पण लोभस वास्तू !

दिवस तिसरा : देवी कृष्णाई 🏵️

अगदी मुख्य रस्त्यालगतच्या कोपऱ्यात असाणारं हे छोटंसं मंदिर, बाजूलाच असणाऱ्या हिरव्यागार डोंगरामुळे पटकन भुरळ पाडतं. मंदिरातली देवीची मुर्ती ही दगडाची असून संगमरवरी चौथऱ्यावर स्थापित आहे. नवरात्रीत देवीसमोर भजन किर्तन तसेच आईच्या जागराचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.

ज्यांनी ज्यांनी चौल गावातील ही पुरातन देवळ बघितली नाहीयेत, त्याच्यासाठी खास ही Special Reel Series आम्ही बनवली आहे. जास्तीत जास्त भाविक इथे दर्शनाला इकडची शांतता अनुभवायला यावीत, जेणेकरून चौलच किंबहुना अलिबागच्या पर्यटनाला आणखी चालना मिळेल.

उद्देश आणि उपक्रम आवडला असेल तर व्हिडीओ like आणि share नक्की करा !!!

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील link वर click करा.
https://www.instagram.com/reel/DAuee-GiixF/?igsh=MWVoMHNhMHNrZXYyMw==

Address

Alibágh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fridayfilms Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fridayfilms Production:

Videos

Share

Nearby media companies


Other Alibágh media companies

Show All