18/11/2024
*236 अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ प्रचार अभियान टप्पा दोन*
*जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
मनसेचे अधिकृत उमेदवार डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी संपूर्ण अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ एक वेळ पिंजून काढल्यानंतर आता त्यांचा प्रचाराचा दुसरा टप्पा चालू आहे.आज त्यांनी रोकडा सावरगाव जिल्हापरिषदेमधील अनेक गावी खाजगी भेटी देत आपला वचननामाही जनतेमध्ये वाटप केला व धानोरा आदी गावांमध्ये जनतेला संबोधितही केले.या प्रसंगी मनवीसे जिल्हासंघटक डॉ यश भिकाने, मनवीसे तालुकाध्यक्ष अजय तुपकर,तालुकाउपाध्यक्ष सावेरगावे नारायण आदींसह मतदारसंघातील अनेक प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.