
12/05/2024
अहमदनगर दक्षिण लोकसभा यंदा पुन्हा गाजणार, सुजय विखे यांच्याविरुद्ध निलेश लंके लढणार...
अहमदनगर दक्षिण लोकसभा 2024 लोकसभा निवडणूक यंदाच्या वर्षी सुजय विखे यांचे विरुद्ध निलेश लंके हे लढणार आहेत. यामध्ये बाजी कोण मारणार हे पाहणे खूप महत्त्वाचे असणार आहे , कारण अहमदनगर जिल्हा सुजय विखेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तर निलेश लंके यांना पारनेर तालुक्यातील लाडाचे आमदार व सामान्य माणसांचा भरपूर प्रमाणात पाठिंबा आहे ( पब्लिक फिगर) , असे दिसते, यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा 2024 मध्ये कोण बाजी मारणार याचे कुतूहल अहमदनगर जिल्ह्याला लागले आहे...