Ahamdnagar news

Ahamdnagar news या पेजवर अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या दिल्या जातात

https://youtu.be/jYcwmQOvVOM
28/10/2021

https://youtu.be/jYcwmQOvVOM

| किन्नर आणि गे यांच्या मध्ये काय फरक आहे.| हिजडा लोकांची माहीती.{In this video, I’ll show you {video title}. Enjoy! {0.1:1.0 introduction1.0:1.5 कि...

13/02/2021

जिल्हानिहाय ठळक घडामोडी*

*Ahmednagar news*

● नगर शहराच्या विकासासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपये देण्याची घोषणा केली

● नगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांसाठी होणार निवडणूक, 17 जागा बिनविरोध

● पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब राजळे

● मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पंडित प्रदीप जाधव व मोहटादेवी ट्रस्टचा तत्कालीन विश्वस्त संदीप पालवे यांना अटक

● आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी देण्यात आली

12/02/2021

एकनाथ शिंदे आज नगरच्या दौऱ्यावर*

*News Ahmednagar*

▪️ नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आज अहमदनगर शहर दौर्‍यावर आहेत.

▪️ महापालिकेबरोबरच जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायतीअंतर्गत एकत्रित नियमावली अंमलबजावणी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहेत.

▪️ याशिवाय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा हा दौरा नगर शिवसेनेला बळ देणारा ठरणारा आहे.

10/02/2021

जिल्हानिहाय ठळक घडामोड़ी**

▪️ आफ्रिकन शेळीने नेवाशातील शेतकऱ्याचे नशीब पालटले; आफ्रिकन शेळी तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांना विकली

▪️ आ. रोहित पवार यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार; जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या नमिता गोपाळघरे यांची निवड

▪️ नगर तालुक्यातील निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका अजय लामखडे यांची निवड; तर उपसरपंचपदी बाळासाहेब जगन्नाथ कोतकर यांची बिनविरोध निवड

▪️ पारनेर तालुक्यातील वाळवणे गावात पती-पत्नी झाले गावचे कारभारी; पत्नी जयश्री यांची सरपंचपदी तर पती सचिन पठारे यांची उपसरपंचपदी निवड

▪️ अहमदनगर कॉलेजमध्ये ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद; या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रमुख डॉ.प्रमोद लोणकर व्याख्याते म्हणून लाभले

08/02/2021

*जिल्हानिहाय ठळक घडामोडी*

Ahmednagar*

● अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी वर्गणीच्या नावाखाली भाजपचे पुढारी खंडणी गोळा करत आहेत. श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचे खळबळजनक वक्तव्य

● तहसीलदारांना पकडलेला वाळूचा ट्रक एका तासात गायब, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील घटना

● खडीक्रशर यांचा बेमुदत बंद; वीजबिलावर रॉयल्टी भरण्यास व्यावसायिकांचा विरोध

● भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात

● रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली

07/02/2021

*जिल्हानिहाय ठळक घडामोडी*

* Ahmednagar*

● आठ दिवसांत दररोज 1 हजार 808 कर्मचाऱ्यांना लस दिली तरच पूर्ण होईल पहिला टप्पा

● जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला

● राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील हाॅटेलच्या आडोशाला देशी दारूची बेकायदेशीर विक्री करणा-या दोन अड्ड्यावर राहुरी पोलिसांनी छापा टाकुन 1560 रूपये किमतीच्या 30 बाटल्या जप्त केल्या

● भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू ओम बाबासाहेब करांडे याची राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड

● भराेसा सेलमध्ये पती- पत्नीचे समुपदेशन सुरू असताना माेबाइलवर शुटींग केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल; स्वप्निल जनाधन ताजने असे आरोपीचे नाव

05/02/2021
05/02/2021

जिल्हानिहाय ठळक घडामोडी*

*Ahmednagarnews

● 33 के.व्ही मुळाडॅम वाहिनीचे तांत्रिक दुरुस्तीच्या कारणाने शनिवार दि 6 फेब्रुवारी पासून मंगळवार दि 9 फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होणार

● गेले कित्येक दिवसापासून बाजारसमितीचे बंद असलेले गेट अखेर शिवसेनेने केले खुले; बंद प्रवेशव्दारामुळे व्यापार्‍यांना, शेतकर्‍यांना मोठी अडचण निर्माण होत होती

● मोहोटा येथील जगदंबा देवी मंदिर संस्थानच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टने पोलीस प्रशासनाला देवस्थानमधील सुवर्णयंत्र गैरव्यवहारप्रकारणी तत्कालीन विश्वस्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

● पाचवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या 33 वर्षाच्या नराधमास अटक; राहता तालुक्यातील निर्मल पिंप्री परिसरात घडली घटना

● वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या 'टाळे ठोको' आंदोलनात सर्व वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा;भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

*बाजार समितीचे बंद गेट शिवसेनेने उघडले Ahmednagar*  ▪️ अहमदनगर शहराती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्य...
04/02/2021

*बाजार समितीचे बंद गेट शिवसेनेने उघडले Ahmednagar*

▪️ अहमदनगर शहराती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या एका बाजूचे दोन-तीन वर्षांपासून बंद असलेले गेट आज शिवसेनेने आंदोलन करत खुले केले आहे. By

▪️ मागील अनेक दिवसांपासून हे गेट खुले व्हावे याची बाजार समितीतील व्यापाऱ्यांबरोबर स्थानिकांची मागणी होती.

▪️ परंतु त्यावर प्रत्यक्ष प्रशासनाकडून कारवाई होत नव्हती. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रवेशद्वारातील बंद असलेले हे गेट खुले केले.

▪️ यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

▪️ दरम्यान, बाजार समितीचे बंद असलेले कुलूप दिलीप सातपुते यांनी स्वतः तोडून कुळे करताना पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

04/02/2021

पाणीपुरवठा पाईपलाईन नादुरुस्त साल्यामुळे नियोजित वेळेनुसार शहराला पाणीपुरवठा होणार नाही. शहराला पुढीलप्रमाणे पाणीपुरवठा होईल...

● बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर, या भागात शनिवारी (दि. 6) ऐवजी रविवारी (दि. 7) ला पाणीपुरवठा होईल.

● शहराच्या मध्यवर्ती भागातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली दरवाजा, नालेगाव, चितळेरोड, खिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरूडगाव रोड परिसर व सावेडी गावठाण या भागाला रविवारी (दि. 7) ऐवजी सोमवारी (दि. 8) पाणीपुरवठा होईल.

● मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसीपल हडको, या भागाला सोमवार (दि. 7) ऐवजी मंगळवारी (दि. 7) पाणीपुरवठा होईल.

📌 आवाहन :- नागरिकांनी या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

31/01/2021

* Ahmednagar News*
*जिल्हानिहाय ठळक घडामोडी*
*🗞️ जिल्हानिहाय ठळक घडामोडी▪️ शेतकऱ्यांनी थकीत वीज बिल भरल्यास त्यावर शेतकऱ्यांना व्याज व दंड आकारणी यात सवलत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

▪️ शिर्डीजवळील गावात सात दिवस लॉकडाउन; शहरालगत पिंपळवाडी गावात कोरोनाने उच्छाद मांडल्यानंतर 15 दिवसांनंतर सरकारी यंत्रणेला जाग

▪️ मालवाहतुकीने एसटी झाली मालामाल; नगर विभागाला मागील आठ महिन्यांत सुमारे पावणेदोन कोटींचे उत्पन्न मिळाले

▪️ आयुर्वेदिक कच्चा माल, हर्बल ऑइल खरेदीच्या बहाण्याने बनावट ई-मेलद्वारे ऑनलाइन व्यवहारात केडगाव येथील एकास 14 लाख 17 हजार 500 रुपयांना गंडा

▪️ पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थानाच्या वार्षिक यात्रोत्सवाची मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत काठ्यांच्या मिरवणूकीने झाली सांगता

▪️ वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यात वारंवार होणारे बदल व त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी व्यापारी वर्ग, कर सल्लागार, सीए यांच्यातर्फे देशासह राज्यभर निषेध आंदोलन

30/01/2021

* Ahmednagar News*
*जिल्हानिहाय ठळक घडामोडी*
● कोरोना लॉकडाऊनमध्ये बंद असलेली मंदिरं दर्शनासाठी खुली झाल्यानंतरच्या अवघ्या 71 दिवसांत शिर्डीतील साईबाबांच्या झोळीत तब्बल 33 कोटींचे दान जमा

● ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मागे; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी

● जीएसटी कायद्यातील क्लिष्ट, किचकट पद्धतीचा विरोध करत नगरमधील व्यापारी, सीए आणि कर सल्लागारांनी जीएसटी भवन येथे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले

● श्रीगोंदे तालुक्यातील बांगर्डे येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या पॅनेलला मतदान न करता विरोधी पॅनेलला मतदान केले, घरात घुसून महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

● बर्ड फ्लूमुळे जिल्ह्यात मेलेल्या कोंबड्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश जि. प. अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिले

मास्क न वापरणाऱ्यांपुढे डोके फोडून घेऊ का?; अजित पवार भर सभेत भडकले*Ahmednagar*Newsकोरोना काळात सुरुवातीपासून दक्षता घेण...
30/01/2021

मास्क न वापरणाऱ्यांपुढे डोके फोडून घेऊ का?; अजित पवार भर सभेत भडकले*
Ahmednagar*News

कोरोना काळात सुरुवातीपासून दक्षता घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार अद्यापही काळजी घेताना दिसतात. एवढेच नाही तर इतरांनी काळजी घ्यावी, असा त्यांचा अग्रह असतो.

आज राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आयोजित कार्यक्रमात मास्क नसलेले लोक पाहून पवार चांगलेच भडकले.

‘हे बघा हे पठ्ठे, येथे बिनमास्कचे फिरत आहेत. आता त्यांच्यापुढे डोके फोडून घ्यावे का ?,’ असा आपल्या खास शैलीत त्यांनी संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी कोरोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले.

🗣️ *पवार म्हणाले* :

▪️ कोरोना आणि त्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचेच हाल झाले. त्यातूनही मार्ग काढत राज्य सरकारने उपाययोजना केल्या.

▪️ पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, या काळात आर्थिक विकासाचा दर खाली आला. सरकारी तिजोरीत पैसे येणे कमी झाले.

▪️ केंद्र सरकारकडे 25 हजार कोटी रुपये येणे बाकी आहेत. तरीही आपले महाविकास आघाडीचे सरकार वचन पाळणारे सरकार आहे.

▪️ राज्य सरकारचा सर्वांत मोठा खर्च पगार आणि निवृत्ती वेतनावर होतो. दरमहा सुमारे 12 हजार कोटी रुपये यासाठी लागतात. त्यानंतर उरलेल्या पैशातून कामे करावी लागतात.

▪️ असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाला हसण्यावारी घेऊ नका. आपण कोरोनाची काळजी घेणे आवश्यक आहे.

भाजप नेत्यांकडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्न*भाजप नेत्यांकडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्नAhmednagar*ज्...
29/01/2021

भाजप नेत्यांकडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्न*भाजप नेत्यांकडून अण्णा हजारे यांच्या मनधरणीचे प्रयत्न
Ahmednagar*

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे.

मात्र अण्णांच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन हे राळेगण सिद्धीमध्ये दाखल झाले आहेत.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, अण्णांची समजूत काढण्यासाठी आज केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले असून अण्णांसोबत बैठकीला सुरवात झाली आहे.

28/01/2021

27/01/2021


*अवतार मेहेरबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा रद्द** Ahmednagar news*नगर येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा या...
27/01/2021

*अवतार मेहेरबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा रद्द*

* Ahmednagar news*

नगर येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी दरवर्षी पुण्यतिथी सोहळा होतो. यावर्षी मात्र कोविडमुळे हा सोहळा होणार नाही, अशी माहिती मेहेरबाबा ट्रस्टने दिले आहे.

मेहेरबाबा यांचा 52 वा पुण्यतिथी सोहळा यावर्षी 30 जानेवारी 1 फेब्रुवारीपर्यंत होणार होता. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार नसून दि. 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत समाधी दर्शनासाठी बंद राहणार आहे.

या तीन दिवसात होणारे कार्यक्रम हे सर्व ऑनलाइनपद्धतीने व्हर्च्युअल दृक्श्राव्य पद्धतीने होतील. 31 जानेवारीला दु. 12 ते 12.15 पर्यंत अवतार मेहेरबाबा यांच्या मौन कालावधीत प्रत्येक मेहरप्रेमींनी आपल्या निवासस्थानातून मौन धरावे.

तीन दिवस येथे कुठल्याही प्रकारचे भजन, आरती, गायन, वादन, नृत्य आदी कुठलाही कार्यक्रम होणार नाही. भाविकांनी संस्थेचे संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

27/01/2021

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातून 11 हजार 874 लाभार्थ्यांना 76 कोटी 09 लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप

▪️ जिल्ह्यात 1400 ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरू करणार; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

27/01/2021

कोरोना उपचारादरम्यान काल एका जणाचा मृत्यू; जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 92 जणांचा मृत्यू

27/01/2021

जिल्ह्यात गेल्या 36 तासांमध्ये 126 जणांना कोरोना संसर्गाचे निदान; सध्या 951 जणांवर उपचार सुरू

27/01/2021

जिल्ह्यात काल 85 रुग्णांना कोरोना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले; आतापर्यंत 69 हजार 731 रुग्ण कोरोनातून बरे

27/01/2021

जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या दहा पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव

27/01/2021

जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 45 रुग्णवाहिका, तर नावीन्यापूर्ण योजनेतून पोलीस दलासाठी 20 वाहने खरेदी होणार

26/01/2021

*जिल्हानिहाय ठळक घडामोडी
Ahandnagar news

● आरोग्य सेविका ज्योती पवार पहिल्या मानकरी पहिल्याच दिवशी 88 कर्मचार्‍यांना कोरोना लस आठवडाभर सर्व 80 जणांना लस

● तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव - ना. बाळासाहेब

● विशेष मोहिमे अंतर्गत शहर वाहतूक शाखेने केली 784 वाहन चालकांवर कारवाई करत सव्वा दोन लाखांचा दंड केला वसूल

● हॉटेल वर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची केली होती मागणी; शिर्डी पोलीस ठाण्याच्या या दोन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात

*नगर शहरात पुढे वाहतूक कोंडी चा प्रश्न प्रश्न*Ahmednagar*,newsअहमदनगर शहरातील माळीवाडा बसस्थानक ते स्टेट बँक चौकापर्यंत ...
26/01/2021

*नगर शहरात पुढे वाहतूक कोंडी चा प्रश्न प्रश्न

*Ahmednagar*,news

अहमदनगर शहरातील माळीवाडा बसस्थानक ते स्टेट बँक चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
शहरातील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटचा दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी गर्दी आहे.

तसेच शहरातील स्टेट बँक चौकापासून ते चांदणी चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

परिणामी येथेही वाहतूक कोंडी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही वाहतूक कोंडी झाली आहे.

शहरातील ही वाहतूककोंडीची आज दि.25 रोजी दुपारी बारा वाजल्यापासून अशीच परिस्थिती आहे.

दरम्यान, माळीवाडा बस स्थानकापासून ते स्टेट बँक चौक मार्गावर वाहतूक कोंडी असल्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

25/01/2021

*🗞️ जिल्हानिहाय ठळक घडामोडी*
NewsAhmednagar*

▪️ देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणावर ठाम; 30 जानेवारीच्या उपोषणावर ठाम

▪️ राहुरी शहराचा कायापालट करण्यासाठी, अंतर्गत रस्ते व गटार योजनेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर; जनतेला दिलेला शब्द पाळणार : मंत्री तनपुरे

▪️ केंद्र सरकारच्या लेखी आश्वासनांवर विश्वास राहिला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शरीरात प्राण असेपर्यंत लढा देण्याचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा निर्धार

▪️ जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू; माजी आमदार शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग आदी नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज केले दाखल

▪️ पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील 239 पोलीस पाटलांच्या जागा मंजूर आहेत; दोन्ही तालुक्‍यातील गावचा कारभार फक्त 54 पाटील सांभाळत आहेत, 185 जागा रिक्त

▪️ राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान गटनेत्या डॉ. उषा तनपुरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्त

24/01/2021


*💁‍♂️ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवार-फडणवीस आमनेसामने!*         जिल्हा सहकारी बँक निवडणुकीला यंदा पहिल्यांदाच राजकीय रंग...
24/01/2021

*💁‍♂️ जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवार-फडणवीस आमनेसामने!*






जिल्हा सहकारी बँक निवडणुकीला यंदा पहिल्यांदाच राजकीय रंग चढला आहे. राज्याप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

त्यातच माजी आमदार शिवाजी कर्डीले हे स्वत: या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्डीले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी नगर तालुक्यातील 109 पैकी 100 मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा कर्डीले यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

तर रविवारी शरद पवार नगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे. अहमदनगर जिल्हा बँकेतील संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी आहे. तर 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान बँकेच्या निवडणुकीत दरवेळी विखे-पाटील विरुद्ध थोरात असं चित्र पाहायला मिळत. पण यावेळी पवार आणि फडणवीसांमधील संघर्षही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो.

22/01/2021





*चिचोंडी पाटीलमधील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच*

*Ahmednagarnews*

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

खबरदारी म्हणून प्रशासन या भागातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे वीस हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर त्यावर कार्यवाही होईल.

गेल्या दहा दिवसांपूर्वी मिडसांगवी, निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड येथे सुमारे पावणे दोनशे कोंबड्या मृत आढळल्या होत्या. याशिवाय श्रीगोंदे, जामखेड, तसेच नगर तालुक्यात काही वन्य पक्षी मृत सापडले होते.

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आतापर्यंत कोंबड्यांमध्ये मात्र बर्ड फ्लू असल्याचे आढळले नव्हते.

चिचोंडी पाटीलमध्ये मृत झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

        *💁‍♂️ सिग्नलला चपलांचा हार घालून अनोखे आंदोलन*l Ahmednagar*नगर शहरात वाहतूक शाखेतर्फे मोठा गाजावाजा करत वाहतूक स...
22/01/2021






*💁‍♂️ सिग्नलला चपलांचा हार घालून अनोखे आंदोलन*

l Ahmednagar*

नगर शहरात वाहतूक शाखेतर्फे मोठा गाजावाजा करत वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जात असतांना शहरातील सर्व मोठ्या प्रमुख चौकातील सिग्नल बंद आहेत.

याचा निषेध करत जागरूक नागरिक मंचाने सक्कर चौकामध्ये बंद पडलेल्या सिग्नलला चपलांचा हार घालून अनोखे आंदोलन केले.

वाहतूक सुरक्षा अभियान व नगर वाहतूक शाखेचा वर्धापन दिवसाचा मुहूर्त साधत वाहतूकीचा उडालेला बोजवारा, वाहतूक शाखा, मनपा, प्रशासन व निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध यावेळी करण्यात आला.

सुहास मुळे यांनी स्वत: शिडीवर चढून सिग्नलला चपलांचा हार अर्पण करून त्यावर निषेधाचा फलक लावला.

🗣️ *मुळे म्हणाले* : पाच वर्षापासून 25 लाख रुपये खर्चून उभारलेले सिग्नल गंजत, सडत बंद अवस्थेत उभे आहेत. कायनेटिक चौक, सक्कर चौक व स्वस्तिक चौक इत्यादी अतिमहत्वाच्या चौकामध्ये कायम वाहतुकीची कोंडी व अपघात होत आहेत.

नाटकी निष्क्रिय ढोंगी वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानाचे फोटो सेशन करण्यात पोलीस प्रशासन मग्न आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या नगरच्या रस्त्यांची, वाहतुकीची व गंजलेल्या खांबांवरील बंद सिग्नलची बिकट अवस्था झाली आहे.

या अवस्थेतही वाहतूक सुरक्षा सप्ताह, रस्ते सुरक्षा अभियान वगैरे असे सरकारी ढोंगी अभियान राबवले जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. यावेळी जेष्ठनेते वसंत लोढा, प्रा.सुनील पंडित, मिलिंद मोभारकर, नितीन भूतारे आदी सहभागी झाले

10/01/2021

  lanke
16/12/2020

lanke

Ahandnagar news
15/12/2020

Ahandnagar news

राज पवार, विशाल सोनवणे, बाजीराव बरकडे व प्रतिक नरसिंग शिंदे या अपघातात ठार झाले. हे चौघे जण मोटारसायकलवर होते. नगर-दौंड ...
09/12/2020

राज पवार, विशाल सोनवणे, बाजीराव बरकडे व प्रतिक नरसिंग शिंदे या अपघातात ठार झाले. हे चौघे जण मोटारसायकलवर होते. नगर-दौंड महामार्गावर पवारवाडीजवळ ऊसाच्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.

🙎‍♂️ राज पवार, विशाल सोनवणे, बाजीराव बरकडे हे जागीच ठार झाले. प्रतिक शिंदे हा गंभीर जखमी झाला. याला दौंडकडे उपचारासाठी नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. घटनास्थळी श्रीगोंदे पोलीस दाखल झाले असून कारवाई सुरू होती

अहमदनगर शहराचे खासदार सुजय दादा विखे चला हवा येऊ द्या च्या मंचावरचला हवा येऊ द्या" च्या मंचावर अभिनेते श्री. स्वप्नील जो...
08/12/2020

अहमदनगर शहराचे खासदार सुजय दादा विखे चला हवा येऊ द्या च्या मंचावर
चला हवा येऊ द्या" च्या मंचावर अभिनेते श्री. स्वप्नील जोशी, भाजप राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, कर्जत-जामखेडचे आमदार श्री. रोहित पवार यांच्यासह सुजय दादा विखे व धनश्री. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर दिनांक १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता होणार आहे.

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahamdnagar news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby media companies



You may also like